Swwapnil Joshi Esakal
Premier

Swwapnil Joshi : सहा बायका फजिती ऐका ! स्वप्नील म्हणतोय 'बाई गं'; सिनेमाचं पोस्टर चर्चेत

Swwapnil Joshi New Movie : अभिनेता स्वप्नील जोशीच्या नव्या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं.

सकाळ डिजिटल टीम

Swwapnil Joshi : सध्या मराठी इंडस्ट्रीत स्त्री प्रधान सिनेमांची लाट आहे असं म्हणायला हरकत नाही. 'बाईपण भारी देवा', 'नाच गं घुमा' हे स्त्रियांच्या आयुष्यावर भाष्य करणारे सिनेमे मागील काही काळात प्रेक्षकांच्या भेटीस आले आणि आता असाच एक हटके सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

'बाई गं' असं या सिनेमाचं नाव असून या सिनेमात सहा भन्नाट अभिनेत्री आणि एक मराठीतील आघाडीचा कलाकार पाहायला मिळणार आहे.

सिनेमाचं पोस्टर चर्चेत

अभिनेता स्वप्नील जोशींची या सिनेमात मुख्य भूमिका असणार हे आधीच जाहीर करण्यात आलं होतं आणि आता नुकतंच सिनेमाचं नवीन पोस्टर रिलीज करण्यात आलं. या पोस्टरमध्ये चक्क सहा मराठीतील आघाडीच्या अभिनेत्री नवरीच्या वेषात नटलेल्या दिसत आहेत. सुकन्या मोने, नेहा खान, अदिती सारंगधर, नम्रता गायकवाड, प्रार्थना बेहरे आणि दीप्ती देवी यांच्या या सिनेमात भूमिका आहेत आणि या सगळ्या स्वप्निलच्या बायकोची भूमिका साकारणार आहे.

सहा लग्न केलेल्या एका पुरुषाची गोष्ट या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. स्वप्नील यात धनुष ही भूमिका साकारत असून अभिनेता सागर कारंडे त्याच्या मित्राची भूमिका साकारणार आहे.

प्रत्येकीची हटके ओळख

या सिनेमाचे एकूण सात पोस्टर्स काल सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले आणि या पोस्टरवर प्रत्येकीची स्वतंत्र ओळख करून देण्यात आलीये. सुकन्या मोने यांची सौदामिनी , नेहा खान हिची नागपूरची मुलगी, अदिती सारंगधरची बिझनेसवुमन, नम्रता गायकवाडची सुगरण, दीप्ती देवीची भरवशाची बाई आणि प्रार्थना बेहरेची सोज्वळ आणि सालस अशी ओळख करून देण्यात आलीये.

आता या सगळ्या बायका आणि स्वप्नीलची जुगलबंदी सिनेमात कशी रंगणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. डॉ. आशिष अग्रवाल, नीतीन प्रकाश वैद्य आणि ओ. एम. जी मीडिया चेंबर्स यांनी या सिनेमाची निर्मिती केलीये. १२ जुलै २०२४ ला हा सिनेमा रिलीज होतोय.

स्वप्नील म्हणाला..

या सिनेमाविषयी अभिनेता स्वप्नील जोशी म्हणाला," 'नाच गं घुमा’नंतर मी लगेच ‘बाई गं’सारखा चित्रपट करणं ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. लवकरच या चित्रपटात माझी भूमिका काय आहे हे सर्वांसमोर स्पष्ट होईल. २०२४ मध्ये मी खूप काम करतोय आणि तुमचं न थांबता मनोरंजन करता येतंय या सारखं वेगळं सुख काय असणार ना! ‘बाई गं’मध्ये नक्कीच काहीतरी खास असणार आहे परंतु यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट बघावी लागणार आहे. लवकरच या चित्रपटाबद्दल पुढच्या अपडेट्स आम्ही शेअर करू."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University: चला रे पोट्टेहो कुलगुरूंच्या घरी जेवायला... पुणे विद्यापीठात गॅस संपला? विद्यार्थ्यांचा इशारा! खानावळी बंद होणार?

MSRTC Recruitment: तरुणांना सरकारी नोकरी मिळणार, एसटीत १७,७४२ पदांची मेगाभरती; परिवहन मंत्र्यांचा प्रस्ताव सादर

'ऑपरेशन सिंदूर'ची खिल्ली ते शिखर धवनचं तोंड फोडण्याची इच्छा! Abrar Ahmed चे कारनामे माहित असूनही काव्या मारन अशी का वागली?

Mojtaba Khamenei : इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई कोमात ? पाय कापल्याच्या दाव्याने खळबळ

Tajmahal Name: ताजमहलचे नाव बदलणार? मोदी सरकारचा सर्वात मोठा खुलासा! संसदेत दिले थेट उत्तर

SCROLL FOR NEXT