Vicky Kaushal & Katrina Kaif  Esakal
Premier

Vicky Kaushal & Katrina Kaif : "घरच्यांचा दबाव..."; कथित प्रेग्नेंसीमुळे विकीची 'ती' मुलाखत पुन्हा चर्चेत

अभिनेत्री कतरीना कैफ प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांमुळे विकीने बाळाबद्दल दिलेलं उत्तर पुन्हा चर्चेत आलंय

सकाळ डिजिटल टीम

सेलिब्रिटी कपल विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरीना कैफ (Katrina Kaif) यांचा लंडनमध्ये फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून त्यांच्या प्रेग्नेंसीच्या चर्चांनी जोर धरलाय. कतरीना प्रेग्नेंट असल्याची बातमी सगळीकडे फिरत असून अजून याबाबत या दोघांनीही कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाहीये.

त्यातच आता विकीने काही महिन्यांपूर्वी बाळाबाबत केलेलं वक्तव्य पुन्हा चर्चेत आलंय.

विकी आणि कतरिनाच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण होण्यापूर्वी विकीने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये विकीला बाळाविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावेळी विकीने "आमच्यावर बाळासाठी दोन्ही कुटुंबांकडून बिलकुल दबाव नाही. ते सगळे खूप कुल आहेत" असं उत्तर दिलं.

त्यानंतर बराच काळ विकी आणि कतरीना यांच्या प्रेग्नेंसीच्या चर्चा थांबल्या होत्या. पण आता या व्हिडीओमुळे पुन्हा चर्चा झालीये.

अशी सुरु झाली प्रेग्नेंसीची चर्चा आणि सूत्रांकडून माहिती

लंडनमध्ये हातात हात घेऊन फिरतानाचा त्यांचा व्हिडीओ चर्चेत आहे आणि त्यातील कतरीनाचा लूक बघून अनेकांनी ती प्रेग्नेंट असल्याचा कयास बांधलाय आणि सोशल मीडियावर ही गोष्ट खूप चर्चेत आहे. बेबी बंप लपवण्यासाठी कतरीनाने लॉँग ओव्हरकोट घातला असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगलीये.

झूम टीव्हीच्या हवाल्याने सूत्रांनी दिलेल्या बातमीनुसार,"कतरीना आणि विकी त्यांच्या पहिल्या बाळाला लंडनमध्ये जन्म देणार आहेत. त्यांनी ही बातमी लपवण्याचा प्रयत्न केला पण अखेर ही गोष्ट उघड झालीये. विकी कतरीनासाठी लंडनला गेलाय आणि ती तिथेच बाळाला जन्म देणार आहे."

2021 मध्ये विकी आणि कतरिनाने राजस्थानमध्ये लग्न केलं. त्यांच्या लग्नाला अतिशय मोजकी मित्रमंडळी आणि कुटूंबीय होते. बॉलिवूडमधील फार कमी कलाकरांना या लग्नाचं आमंत्रण देण्यात आलं होतं. त्यांच्या लग्नाबद्दल बरीच गुप्तता सुरुवातीच्या काळात राखण्यात आली होती. सोशल मीडियावर या जोडीच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले होते. विकीचा लवकरच 'छावा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमात तो छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT