Bharti Singh back from hospital after treatment on gallbladder stone 
Premier

Bharti Singh : डिस्चार्ज मिळताच भारतीची शूटिंगला हजेरी; डॉक्टर म्हणाले "ऑपरेशन... "

अभिनेत्री भारती सिंहला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला असून तिने लगेच रिअॅलिटी शोच्या शूटिंगला हजेरी लावली. तिच्या आजाराबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

कॉमेडी क्वीन भारती सिंहची तब्येत काही काळापासून बरी नव्हती. तिच्या पोटात पित्ताशयाचे खडे झाले होते आणि त्याचा तिला त्रास होत होता. यामुळे तिला काही काळ हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. पण आता भारती बरी झाली असून तिला हॉस्पिटलमधून सोडण्यात आलं आहे. युट्युब चॅनेलवरील तिच्या व्लॉगवर तिने याबाबतची बातमी शेअर केली.

भारतीला गेल्या काही काळापासून पोटाचा त्रास सुरु होता. तपासणी केल्यानंतर तिच्या पोटात पित्ताशयाचे खडे झाल्याचं तिला डॉक्टरांनी सांगितलं. तिचं पोट दुखत असल्याने काही काळासाठी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथे तिच्यावर उपचार झाल्याचं आणि काही महत्त्वाच्या तपासण्या करण्यात आल्याचं भारतीने तिच्या व्लॉगमध्ये सांगितलं.

इतकंच नाही तर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर दुसऱ्याच दिवशी भारतीने पुन्हा शूटिंग करायला सुरुवात केलीये. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच भारती खूप खुश झाली आणि अखेर तिला तिच्या मुलाला गोलाला पाहायला मिळणार म्हणून तिने तिचा आनंद व्लॉगमध्ये व्यक्त केला.

भारती सध्या डान्स दिवाने आणि लाफ्टर शेफ्स या दोन शोजचं सूत्रसंचालन करतेय. या शोजच्या शूटिंगसाठी ती डिस्चार्ज मिळाल्यानंतर दुसऱ्याचं दिवशी सेटवर परतली.

लवकरच होणार भारतीवर शस्त्रक्रिया

भारती हॉस्पिटलमध्ये दाखल असताना तिच्या अनेक चाहत्यांना तिची काळजी वाटत होती. भारतीने तिच्या सगळ्या चाहत्यांचे तिच्या तब्येतीसाठी प्रार्थना केल्याबद्दल आभार मानले आणि तब्येतीविषयीची माहिती शेअर केली.

ती म्हणाली,"मी अखेर घरी परत जातेय म्हणून मी खूप खुश आहे. मी माझा मुलगा गोला आणि माझ्या कुटूंबाला भेटण्यासाठी उत्सुक आहे. पण लवकरच माझ्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. माझ्या पित्ताशयाच्या आवरणावर खड्यांमुळे इन्फेक्शन झालं होतं. पण आता अखेर सगळं ठीक आहे आणि मला डिस्चार्ज मिळाला आहे." पण भारतीवर लवकरच शस्त्रक्रिया होणार असून ती त्यासाठी पुन्हा हॉस्पिटलमध्ये भरती होणार आहे.

काय घडलं होतं नेमकं?

भारतीने तिच्या व्लॉगमध्ये सांगितलं की, गेल्या तीन दिवसांपासून तिचं पोटात दुखत होते. तिला असह्य वेदना झाल्या. त्यानंतर तिची टेस्ट करण्यात आली. पित्ताशयात खडा झाल्याचं या टेस्टच्या रिपोर्टमधून तिला कळालं. व्लॉगमध्ये तब्येतीचे अपडेट देताना भारती भावूक झाली होती. गेल्या तीन दिवसांपासून माझी तब्येत बिघडल्यानं मी कोणालाही झोपू दिले नाही, असंही भारतीनं व्लॉगमध्ये सांगितलं.

व्लॉगमध्ये मुलाबद्दल बोलताना भारती म्हणाली, "मी रात्री उशिरा 10-11 च्या सुमारास रुग्णालयात गेले आणि त्यावेळी माझा मुलगा गोला गाढ झोपला होता. गोला मला घरी शोधत आहे." असं सांगताना ती भावूक झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Doctor Case: 'आरोपींवर कुठलीही दया दाखवली जाणार नाही', Rupali Chakankar संतापल्या | Sakal News

Satara : महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी अंबादास दानवेंचे गंभीर आरोप, थेट भाजपच्या माजी खासदाराचं नाव घेतलं

Latest Marathi News Live Update : भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे वक्तव्य — “आमचे मार्गदर्शक भुजबळसाहेब” म्हणत गोंधळ

Ishwarpura News : बाळासाहेब ठाकरेंची अखेर इच्छा पूर्ण, इस्लामपूरचे झाले ‘ईश्वरपूर’; सर्व दस्ताऐवजांमध्ये होणार बदल

AUS vs IND 3rd ODI: भारताचे गोलंदाज चमकले, ऑस्ट्रेलियाला अडीचशेच्या आत रोखले; आता व्हाईटवॉश टाळण्याचं लक्ष्य

SCROLL FOR NEXT