Sushmita Sen Birthdate  Esakal
Premier

Sushmita Sen : "तो माझा दुसरा जन्म..." अभिनेत्री सुश्मिता सेनने बदलली इन्टाग्रामवरील जन्मतारीख; कारण सांगत म्हणाली...

Sushmita Sen changed her birthdate : अभिनेत्री सुश्मिता सेनने तिच्या जन्मतारखेत बदल करत नवीन जन्मतारीख शेअर केली. काय आहे यामागील कारण जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Sushmita Sen : सध्या सोशल मीडिया हे सेलिब्रिटी आणि चाहत्यांमधील संवादाचं प्रभावी माध्यम बनलं आहे. सेलिब्रिटीज त्यांच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यातील अपडेट्स कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतात तर त्यांच्या प्रोफाइलमध्ये घडणाऱ्या बदलांवरही चाहते लक्ष ठेवून असतात. सोशल मीडियावर कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री सुश्मिता सेनने नुकतीच इंस्टाग्रामवर तिची जन्मतारीख २७ फेब्रुवारी २०२३ ला ठेवलीये. तिने हा बदल का केला यावर तिने भाष्य केलं.

गेल्यावर्षी सुश्मिताच्या आयुष्यात एक महत्त्वपूर्ण घटना घडली. एका वेबसिरीजचं शूटिंग करत असताना सुश्मिताला हृदयविकाराचा झटका आला. यातून सावरल्यानंतर सुश्मिताने एका फार्मास्युटिकल कंपनीच्या मदतीने एक व्हिडीओ तयार केला असून यात तिने तिची जन्मतारीख का बदलली हे सांगितलं.

या व्हिडिओमध्ये सुश्मिता म्हणते,"माझं आयुष्य ती गोष्ट आहे जी मी स्वतः लिहिली आहे. पण कधी कधी गोष्टींमध्ये ट्विस्ट येतो. शूटिंग दरम्यान मला गंभीर हृदयविकाराचा झटका आला. माझ्या आयुष्यातील सगळ्यात दीर्घ ४५ मिनिटं. एका क्षणी वाटलं कि माझी कहाणी आता संपली पण तस झालं नाही. पण माझ्या डॉक्टरांमुळे माझा जीव वाचला. माझी गोष्ट अजूनही सुरु आहे. माझ्या डॉक्टरांनी मला दुसरं आयुष्य दिलं आणि २७ फेब्रुवारी २०२३ ही माझी दुसरी जन्मतारीख बनली. हा दिवस मी सर्व डॉक्टरांना समर्पित करणार आहे. कारण, याचदिवशी माझा दुसरा जन्म झाला."

सुश्मिताचं वय आता ४८ वर्षं असून तिला हृदयविकाराचा झटका आल्यावर तिच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात तिला ‘आर्या ३’च्या शूटिंगदरम्यान हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. वेळेवर उपचार झाल्यामुळे सुश्मिताचे प्राण वाचले.

सुश्मिताला रीनी आणि अलिसा या दोन मुली आहेत. या दोन्ही मुली तिने दत्तक घेतल्या आहेत. रीनीला तिने वयाच्या २४ व्या वर्षी दत्तक घेतलं होतं. तिच्या या कृतीच खूप कौतुक झालं होतं. रीनी आता २१ वर्षांची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AAP vs Raghav Chadha : राघव चढ्ढा पंतप्रधान मोदींविरोधात बोलायला घाबरतात, 'आप'चे आपल्याच खासदारावर गंभीर आरोप

Video : अन्नपूर्णा आजी कमळीला घरातून हाकलणार ! प्रोमो पाहून प्रेक्षकांना बसला शॉक; "आता मालिका बघणं बंद"

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 39 लाख; या शेअरने दिला 3900% रिटर्न! अजूनही 80% वाढण्याचा ब्रोकरेजचा अंदाज

School Development: शासनाचा निर्णय! माजी विद्यार्थ्यांच्या बळावर होणार शाळांचा कायापालट; शाळांमध्‍ये संघाची स्थापना..

Sangli Civil Hospital : सांडपाणी प्रकल्प रखडला; ‘सिव्हिल’कडून साडेचार कोटींचा दंड भरला

SCROLL FOR NEXT