Alia Bhatt - Anil Kapoor Sakal
Premier

Alia Bhatt: आलिया नव्या अ‍ॅक्शनपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला; अनिल कपूरही साकारणार 'या' कलाकाराची गाजलेली भूमिका

Anil Kapoor: अनिल कपूर आणि आलिया भट नव्या अ‍ॅक्शनपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Alia Bhatt - Anil Kapoor: सध्या बॉलिवूडमध्ये अ‍ॅक्शन थ्रिलर सिनेमांचा ओघ वाढलाय. स्पाय सिरीज, क्राईम सस्पेन्स अशी कथानक असलेल्या सिनेमांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होतेय. गंगुबाई काठियावाडी, रॉकी और रानी कि प्रेमकहाणी, या सिनेमानंतर अभिनेत्री आलिया भट्ट एका अ‍ॅक्शन सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

राझी नंतर बऱ्याच काळाने आलिया स्पाय सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. विशेष म्हणजे या सिनेमात तिच्यासोबत अभिनेते अनिल कपूर सुद्धा काम करत आहेत.

यशराज पिक्चर्स या सिनेमाची निर्मिती करत असून त्याच्या स्पाय युनिव्हर्समधील हा नवीन सिनेमा असेल ज्यात अनिल कपूर रॉ चिफच्या भूमिकेत दिसणार आहेत. या आधी अनिल यांचा फायटर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आलेला. त्यातील त्यांची वायुदल प्रमुखाची भूमिका सगळ्यांना आवडली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "अनिल कपूर यशराजच्या स्पाय युनिव्हर्स सिनेमांमध्ये काम करत आहेत. आतापर्यंत सिनेसीरिजमधील सगळ्यात जास्त गाजलेलं रॉ चीफची भूमिका ते या सिनेमात साकारणार आहेत. ज्येष्ठ दिवंगत अभिनेते गिरीश कर्नाड यांच्या जागी ते काम करतील, ज्यांनी टायगर सिनेमातील रॉ चीफची भूमिका एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली होती."

या सिनेमाचं नाव अजून निश्चित झालेलं नाहीये. अभिनेत्री आलिया भट्ट या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. यासोबतच अनिल 'वॉर २' या सिनेमात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.

इतकंच नाही तर सूत्रांच्या माहितीनुसार अनिल यांनी यशराज स्टुडिओज सोबत करार केला असून या करारानुसार अनिल आता यशराजच्या प्रत्येक स्पाय फिल्ममध्ये दिसणार आहेत.

आलिया सुद्धा बऱ्याच काळाने पुन्हा एका सिनेइंडस्ट्रीत कमबॅक करतेय. मुलीच्या जन्मानंतर तिने काही काळ सिनेविश्वातून ब्रेक घेतला होता, पण पुन्हा एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास ती सज्ज झालीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uttar Pradesh :  कर विभागात फील्डवर ‘अशा’ अधिकाऱ्यांचीच करा भरती; CM योगी आदित्यनाथ यांनी दिले कडक आदेश

Uttrakhand : उत्तराखंडची ही ठिकाणं पहाल तर स्वित्झर्लंड विसरून जाल; हे पाच सुंदर लोकेशन्स एकदा पहायलाच हवेत

Crime News : जळगाव-अजिंठा रोडवर गोळीबार: कुसुंबा गावात ८ ते १० जणांच्या टोळक्याची दहशत; दुचाकी दगडांनी ठेचली

Malegaon Nagarpanchyat Election : माळेगाव नगराध्यक्ष पदाचा पहिला मान ओबीसी महिलेला

Santosh Deshmukh Case: ''आरोपींच्या विरोधात शब्दही न बोलणारे लोकप्रतिनिधी...'', धनंजय देशमुखांचा मुंडेंवर घणाघात

SCROLL FOR NEXT