Babu Movie Esakal
Premier

Babu : Upcoming Marathi Movie : आता राडा करायला येतोय बाबू ; मोशन पोस्टर लाँच करत जाहीर केली सिनेमाची रिलीज डेट !

Babu movie motion poster out : अभिनेता अंकित मोहनची मुख्य भूमिका असलेल्या बाबू सिनेमाचं मोशन पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं.

सकाळ डिजिटल टीम

Ankit Mohan : अभिनेता अंकित मोहन त्याने साकारलेल्या ऐतिहासिक भूमिकांसाठी ओळखला जातो. त्याच्या अनेक ऐतिहासिक भूमिका गाजल्या आहेत आणि आता अंकित एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. त्याचा 'बाबू' हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमाचं नुकतंच मोशन पोस्टर रिलीज करत सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली.

सिनेमाचं मोशन पोस्टर

अस्सल आगरी कोळी भाषेत आपला जलवा दाखवाणारा स्टायलिश बाबू प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘बाबू नाय, बाबू शेठ…’ असणाऱ्या ‘बाबू’ची स्टाईलच निराळी असून बाबूची भूमिका साकारणारा अंकित मोहन या चित्रपटात एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. ‘बाबू’ची ही झलक नुकतीच सोशल मीडियावर शेअर करण्यात आली. सिनेमाच्या मोशन पोस्टरवर रेतीचा ट्र्क आणि पिवळ्या रंगाची बाईक दिसत असून त्याच्यासमोर उभा राहिलेल्या डॅशिंग बाबू दिसतोय. पांढरा शर्ट, पांढरी पॅण्ट, गळ्यात आणि हातात सोन्याचे दागिने अशा अंकितच्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

हा सिनेमा ॲक्शनपट असून एक लव्हस्टोरीही या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. श्री समर्थ कृपा प्रोडक्शन प्रस्तुत 'बाबू' या चित्रपटाची निर्मिती सुनीता बाबू भोईर, बाबू कृष्णा भोईर यांनी केली आहे. तर या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा मयूर मधुकर शिंदे यांनी सांभाळली आहे.

या सिनेमाविषयी सिनेमाचे दिग्दर्शक मयूर शिंदे म्हणाले कि,"मराठी चित्रपटात भावनिकता, विनोद, कमाल कथा या सगळ्यांचा समावेश असतोच परंतु 'बाबू' चित्रपटातून जबरदस्त ॲक्शन, स्टाईल, यांचा धमाकेदार संगम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यात अंकित मोहन सारखा जबरदस्त हिरो असल्याने हा ‘बाबू’ अधिकच रंगला आहे."

अतिशय भन्नाट मोशन पोस्टर असलेला हा सिनेमा २ ऑगस्टला रिलीज होणार असून या सिनेमात अंकितबरोबर नेहा महाजन आणि रुचिरा जाधव यांच्या मुख्य भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Water News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ८ ते १० दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार; पाणीटंचाईची भीती

Amol Mitkari : विमान अपघातावर मिटकरींचे गंभीर प्रश्न; सहा मृतदेहांपैकी एकाचा ठावठिकाणा अद्याप अज्ञात

Sangli Hit And Run : गणपती पेठेत ‘हिट अँड रन’चा थरार, चार पोलिसांसह अकरा जखमी; नशेतधुंद कार चालकास जमावाने तुडवले

Rohit Shetty House Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबारप्रकरणी पुण्यातून पाचजण ताब्यात, गॅंगस्टर बिश्नोई टोळीशी संबंधाचा संशय

Baramati Crime News : बारामतीत चोरटयांनी 25 लाखांचे दागिने केले लंपास; अजित पवार यांच्या अंत्यविधीप्रसंगी चोरटयांचा धुमाकूळ....

SCROLL FOR NEXT