Shubhangi Gokhale & Mohan Gokhale Esakal
Premier

Shubhangi Gokhale & Mohan Gokhale : पहिल्याच भेटीत केलं प्रपोज ; मोहन-शुभांगी यांची सुंदर प्रेमाची गोष्ट

Shubhangi & Mohan Gokhale's beautiful lovestory : अभिनेत्री शुभांगी गोखले आणि अभिनेते मोहन गोखले यांची लव्हस्टोरी खूप सुंदर आहे. जाणून घेऊया त्यांची लव्हस्टोरी.

सकाळ डिजिटल टीम

Shubhangi Gokhale & Mohan Gokhale : मराठी इंडस्ट्रीमधील एक अनुभवी आणि हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे शुभांगी गोखले. अतिशय उत्तम अभिनेते असलेल्या मोहन गोखले यांचं अकाली निधन झालं. त्यांच्या अकाली जाण्यानंतर शुभांगी यांनी एकटीने संसाराचा डोलारा सांभाळत अभिनेत्री म्हणून नाव कमावलं.

पण शुभांगी आणि मोहन यांची लव्हस्टोरी खूपच हटके होती.

पहिल्या भेटीतच प्रपोज

शुभांगी आणि मोहन यांची पहिली भेट झाली झाली पुण्यात. नाटकात काम करण्यासाठी शुभांगी पुण्यात दाखल झाल्या. त्या त्यांच्या भावाच्या पुण्यातील घरी राहत होत्या आणि त्यांच्या बाजूलाच मोहन यांचे मित्र सुधीर फाटक राहायचे. एकदा त्यांच्याकडेच ते आले असताना मोहन यांनी पहिल्यांदा शुभांगी यांना पाहिलं आणि पाहताच क्षणी शुभांगी त्यांना आवडल्या. त्यांच्याशी बोलत असताना मोहन यांना शुभांगी नाटकात काम करत असल्याचं कळलं.

एके दिवशी मोहन अचानक मोहन शुभांगी यांच्या नाटकाला आले आणि ते पहिले शुभांगी यांच्या मेकअप रूममध्ये गेले आणि त्यांना बघून शुभांगी खूपच चकित झाल्या. त्यांनी शुभांगीला स्वतःची ओळख करून दिली आणि लगेच "मला तू आवडतेस. आपण लग्न करूया खूप मज्जा येईल." असं म्हंटलं आणि पहिल्याच भेटीत त्यांनी प्रपोज केल्यामुळे त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

पुढे त्या दोघांचं रिलेशनशिप सुरु झालं. काही काळ ते एकत्र राहिले. त्यानंतर १९८९ मध्ये त्यांनी लग्न केलं आणि त्यांना १९९३ साली मुलगी झाली.

फ्लाईटमध्ये दिलेलं व्हॅलेंटाईनचं गिफ्ट

लग्नानंतर शुभांगी गोखले एका नाटकात काम करत होत्या आणि त्यांचं विमानाचं तिकीट वेटिंग वर होतं. उदयपूरला ते प्रयोग करत होते आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा मुंबईत प्रयोग होता. तिकीट कन्फर्म नसल्यामुळे त्यांनी टॅक्सीने अहमदाबादला प्रवास करायचं ठरवलं. त्या प्रवास करत असताना एक मोठा ५० किलोमीटरचा ट्रॅफिक जाम लागला होता. त्यावेळी कसंतरी त्या ट्रॅफिक जॅममधून वाट काढत त्यांनी प्रवास सुरु ठेवला. मधल्या वेळेत त्यांनी मोहन यांना फोन करून त्यांचं फ्लाईट सुटेल ही भीती व्यक्त केली. त्यांना रडताना बघून त्यांनी त्यांच्या अर्चना नावाच्या मैत्रिणीला फोन केला आणि तिच्या ओळखीने त्यांनी जेटच विमान विमानतळावर अर्धा तास थांबवलं.

शुभांगी विमानतळावर पोहोचताच त्यांना स्टाफने विमानात नेलं आणि त्या सीटवर बसताच त्यांना मोहन यांनी पाठवलेलं गिफ्ट त्यांना दिलं. ते बघून शुभांगी यांना आश्चर्याचा धक्का बसला.

मोहन यांचं २९ एप्रिल १९९९ ला वयाच्या ४५ व्या वर्षी निधन झालं. त्यांना झोपेतच हृदयविकाराचा झटका आला. त्यापूर्वी बराच काळ ते हृदयविकाराशी संबंधित आजाराचा सामना करत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

B.Ed student suicide attempt: खळबळजनक! विभागप्रमुखाच्या लैंगिक छळाने त्रस्त बी.एडच्या विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल; भर कॉलेजमध्येच स्वतःला घेतलं पेटवून

IND vs ENG 3rd Test: रिषभला जसं बाद केलं तसंच करायला गेले, पण सहावेळा तोंडावर आपटले; इंग्लंडची चूक भारताच्या पथ्यावर Video

Pune News: माेठी बातमी! 'संजय जगताप यांचा पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा'; पुरंदर-हवेली मतदारसंघात खळबळ

Solapur: राष्ट्रवादीच्या दोन जिल्हाध्यक्षपदाचा तिढा सोमवारी सुटणार?; बळिराम साठे ज्येष्ठ नेते शरद पवारांना भेटणार

Latest Marathi News Updates : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का; माजी आमदार संजय जगताप यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा दिला राजीनामा

SCROLL FOR NEXT