dharmaveer 2 sakal
Premier

Dharmveer 2: 'धर्मवीर २'च्या नव्या टीझरची सोशल मीडियावर चर्चा; पण नेटकऱ्यांनी पकडली व्हिडिओमधील मोठी चूक, तुम्हाला कळली का?

Dhamveer 2 Teaser Mistake: 'धर्मवीर २' मधील एक चूक नेटकऱ्यांनी पकडली आहे जी सहज कुणाच्याही लक्षात आलेली नाही.

Payal Naik

लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे याने दिग्दर्शित केलेला 'धर्मवीर' प्रचंड गाजला. या चित्रपटाने अभिनेता प्रसाद ओक याला एक वेगळी ओळख मिळवून दिली. या चित्रपटामुळे आनंद दिघे घराघरात पोहोचले. आतल्या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांचा भेटीला येणार आहे. 'धर्मवीर २' ९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच या चित्रपटाचा दुसरा टीझर प्रदर्शित करण्यात आला. २४ तासात हा टीझर लाखो लोकांनी पाहिला. मात्र या टीझरमध्ये एक मोठी चूक झाली आहे. ही चूक नेटकऱ्यांनीच लक्षात आणून दिली आहे. तुम्हाला कळली का ही चूक?

भाग २ मध्ये अभिनेता प्रसाद ओक पुन्हा एकदा आनंद दिघे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. आनंद दिघे यांनी केलेली कामं आणि त्यांच्या मृत्यूचं गूढ या चित्रपटातून उलगडणार आहे. त्यात 'धर्मवीर २'चा नवा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. यात त्यांचा जबरदस्त अंदाज पाहायला मिळतोय. मात्र या चित्रपटाच्या दुसऱ्या टीझरमध्ये एक चूक झाली आहे. अनेक नेटकऱ्यांनी ही चूक पकडली आहे. ती चूक म्हणजे चित्रपटात दाखवण्यात आलेली लोकल ट्रेन.

आनंद दिघे आणि बऱ्याच महिला या रेल्वे ट्रॅकच्या बाजूने चालत जातानाचा एक सीन टीझरमध्ये दाखवण्यात आला आहे. यात समोरून एक बम्बार्डियर लोकल येताना दिसतेय. जी मुंबईच्या सेवेत २०१४ - १५ साली आली होती. तर त्यापूर्वी मुंबईत जुन्या डीसी लोकल धावत होत्या ज्या चॉकलेटी आणि क्रिम कलरच्या होत्या. पिवळ्या आणि निळ्या रंगातील लोकल तेव्हा नव्हत्या. त्यामुळे आनंद दिघे यांच्या काळात या लोकल आल्या कुठून असा प्रश्न नेटकरी विचारताना दिसतायत. एवढी मोठी चूक त्यांच्या लक्षात कशी आली नाही असा प्रश्न आता विचारला जातोय. तर दुसरीकडे प्रेक्षकांची या चित्रपटासाठीची उत्सुकता वाढतच चालली आहे. ९ ऑगस्ट रोजी हा चित्रपट सगळीकडे प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Release : कोयना धरणाच्या सांडव्यावरून 18,337 तर वीज गृहातून 1,050 क्युसेक विसर्ग; सहा वक्र दरवाजे चार फुटांवरून तीन फुटांपर्यंत आणले खाली

Maharashtra Farmer Loan Waiver : वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर; 10 कोटी 20 लाखांचा लाभ मंजूर

Amazon Great Freedom Sale 2026: आजपासून मेगा सेल! Galaxy S25 Ultra 40 हजारांनी स्वस्त, पाहा कोणत्या वस्तूंवर मिळतोय मोठा डिस्काउंट

Marathi News Live Updates : भंडारा येथे तीन वर्षीय बालिकेवर अत्याचार, आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी भव्य आक्रोश मोर्चा

Koyna Dam Tailrace Water Issue : समुद्रात जाणारे कोयनेचे पाणी कोकणाला मिळणार का? पुन्हा नवे सर्वेक्षण सुरू; 'हा' निर्णय ठरवणार भविष्य

SCROLL FOR NEXT