Junaid Khan Esakal
Premier

Maharaj Junaid Khan: आमिर खानच्या मुलाच्या 'महाराज' सिनेमाच्या प्रदर्शनाला हायकोर्टाची स्थगिती! हिंदू गटानं घेतला होता आक्षेप

आमिरचा मुलगा जुनैद खान याचा हा पहिलाच सिनेमा असून गुजरात हायकोर्टानं त्याच्या प्रदर्शनाला स्थिगिती दिली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद खान याचा हा पहिलाच सिनेमा 'महाराज' असून गुजरात हायकोर्टानं या सिनेमाच्या प्रदर्शनाला गुरुवारी स्थिगिती दिली. या सिनेमाविरोधात हिंदू गटांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. याचिकेत त्यांनी दावा केला होता की, या सिनेमात हिंदू वर्गाविरोधात काही गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. (Gujrat High Court stays release of Aamir Khan son Junaid Khan first film Maharaj which is going to release on netflix)

भगवान कृष्णाचे भक्त आणि वल्लभाचार्यांच्या अनुयायांच्यावतीनं (पुष्टीमार्ग संप्रदाय) दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टानं ही स्थगिती दिली आहे. सन 1862च्या महाराज बदनाम प्रकरणावर आधारित हा चित्रपट कायदा-सुव्यवस्था बिघडवेल. तसेच हिंदू धर्माच्या अनुयायांविरुद्ध हिंसाचार भडकवेल असा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे.

चित्रपटाची कथा काय?

याचिकेतील दाव्यानुसार, सन 1862 मध्ये एका प्रतिष्ठित महाराजानं केलेल्या कथित गैरवर्तणुकीमुळं हे प्रकरण पेटलं होतं. त्यावर तत्कालीन मुंबईच्या कोर्टातील इंग्लिश न्यायाधीशांनी यावर निकाल दिला होता. यामध्ये हिंदू धर्माविरोधात आणि भगवान श्रीकृष्णाविरोधात टिप्पणी केली होती. त्यामुळं याला विरोध होऊ नये म्हणून हा सिनेमा गुप्तपणे प्रदर्शित केला जात आहे. जर या चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी दिल्यास हिदूंच्या धार्मिक भावना गंभीरपणे दुखावल्या जातील, त्यामुळं कधीही भरून न येणारं नुकसान होईल, असा युक्तिवादही करण्यात आला.

यावर गुजरात हायकोर्टाच्या न्यायमूर्ती संगीता विषेन यांनी याचिकाकर्त्यांच्या याचिकेची दखल घेतली आणि कोणत्याही प्रकारे चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याचा अंतरिम आदेश दिला. आता या प्रकरणाची 18 जून रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे.

'बॉयकॉट नेटफ्लिक्स' ट्रेंड

दरम्यान, सोशल मीडियावर 'बॉयकॉट नेटफ्लिक्स' ट्रेंड सुरु होता. नेटफ्लिक्स 'हिंदूविरोधी' कन्टेंटचा प्रचार करत असल्याचा आरोपही सोशल मीडियातून केला आहे. पण नेटफ्लिक्सनं गेल्या महिन्यात या सिनेमाबाबत काढलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, महाराज चित्रपट हा पत्रकार आणि समाजसुधारक करसनदास मुलजी यांच्यावर आधारित आहे. महिलांच्या हक्कांसाठी आणि सामाजिक सुधारणांसाठी काम करणारे ते अग्रगण्य वकील होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Survey 2025: महायुती सरकारची वर्षपूर्ती! मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांची कामगिरी कशी होती?

Latest Marathi News Live Update : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी घेतली संजय राऊत यांची भेट

Redmi 15C 5G मोबाईल लॉन्च! 'या' तारखेपासून विक्री सुरू; 12 हजारात बेस्ट कॅमेरा अन् 6300 mAh मोठी बॅटरी, 50 हजारच्या फोनचे फीचर्स

Indigo Issues: मतभेद, अंतर्गत अस्थिरता अन्... देशातील सर्वात मोठी एअरलाइन संकटात! इंडिगोचा मालक कोण? समस्यांनी का वेढलं? वाचा...

Digital Banking : डिजिटल बँकिंगचे नवे नियम 1 जानेवारीपासून लागू! तुमच्या ऑनलाइन बँकिंगमध्ये काय बदलणार?

SCROLL FOR NEXT