Gulabi Sadi Song esakal
Premier

Gulabi Sadi Song: जळगावच्या धानवड तांड्यातून आला अन् गुलाबी साडीला जगभरात फेमस केलं, कोण आहे संजू राठोड?

Gulabi Sadi Song: आता गुलाबी साडी हे हिट गाणी बनवणारा संजू हा सध्या सोशल मीडिया गाजवत आहे. पण संजूचा खडतर प्रवास मात्र अनेकांना माहित नसेल.

priyanka kulkarni

Gulabi Sadi Song: सोशल मीडियावर अनेक गाणी ट्रेंड होत असतात. या गाण्यांवरील रिल्स सेलिब्रिटी शेअर करतात. अशातच सध्या सोशल मीडियावर फक्त एकाच गाण्याची चर्चा आहे. "गुलाबी साडी" (Gulabi Sadi Song) हे गाणं गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तुम्ही ऐकत असाल. माधुरी दीक्षित (Madhuri Dixit Nene), रेमो डिसूजा (Remo D'Souza) यांनाच नाही तर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) टीममधील खेळडूंना देखील या गाण्यावर रिल तयार करण्याचा मोह आवरला नाही. सध्या गुलाबी साडीची प्रचंड क्रेझ सोशल मीडियावर बघायला मिळत आहे, या गाण्याच्या गायकाची देखील चर्चा होत आहे. गुलाबी साडी हे गाणं गायक संजू राठोडनं गायलं आहे. संजूच्या "नऊवारी साडी पाहिजे", या गाण्यानं देखील धुमाकूळ घातला.

आता गुलाबी साडी हे हिट गाणी बनवणारा संजू हा सध्या सोशल मीडिया गाजवत आहे. पण संजूचा खडतर प्रवास मात्र अनेकांना माहित नसेल. जाणून घेऊयात गायक संजू राठोडच्या स्ट्रगल स्टोरीबाबत...

जळगावच्या धानवड तांड्यात राहणारा संजू

गुलाबी साडी या गाण्यातून घराघरात पोहोचणारा संजू हा जळगावच्या धानवड तांड्यात राहणारा आहे. कॉलेजमध्ये संजूला संगीताची आवड निर्माण झाली. संजूनं सुरुवातीला हिंदी गाणी गायली. पण संजूच्या हिंदी गाण्यांना प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही.

गाणी फ्लॉप ठरत होती पण आईनं दिलेल्या सल्ल्यानं नशीब बदललं

सुरुवातीला संजूनं गायलेल्या हिंदी गाण्यांना प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. पण संजूच्या आईनं त्याला दिलेल्या एका सल्ल्यामुळे त्याचं नशीब बदललं. संजूच्या आईनं त्याला मराठी गाणं गायचा सल्ला दिला आणि तिनं संजूला सांगितलं की, "तू एक बाप्पाचं गाणं तयार कर". त्यानंतर संजूचं "बाप्पा वाला गाना" हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली. हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंड देखील झालं. त्यानंतर संजूनं मागे वळून पाहिले नाही. संजूची गाणी हिट ठरु लागली.

संजूच्या गाण्यांना मिळाली पसंती

नऊवारी पाहिजे, बाप्पा वाला गाना, बुलेट वाली, गुलाबी साडी, झुमका,डिंपल या संजू राठोडच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate Video : शेतकरी दररोज जीवन संपवतोय अन् कृषीमंत्री विधिमंडळात रमी खेळताहेत; रोहित पवारांकडून व्हिडिओ ट्विट

'स्लीपिंग प्रिन्स' अल-वलीद बिन खालेद यांचं निधन; सौदी अरेबियातील राजघराण्यावर शोककळा, 20 वर्षे होते कोमात, असं काय घडलं त्यांच्याबाबतीत?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात दोन पीएमपी बसच्या अपघातानंतर वाहतूक कोंडी

Nanded News: नांदेडमध्ये साडेतीन एकरांवर ‘किन्नर भवन’; निवास व्यवस्था, स्मशानभूमीसह मिळणार अन्य सुविधा

Video: हत्तीच्या बाळाची टरबूज मागण्याची क्यूट अदा, हृदयस्पर्शी व्हिडिओने जिंकली नेटकऱ्यांची मने

SCROLL FOR NEXT