Adhyayan Suman shares his struggle experience 
Premier

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

Adhyayan Suman shares his experience during his struggle days : अभिनेता अध्ययन सुमनने त्याच्या स्ट्रगलच्या काळातील अनुभव शेअर केला. हिरामंडी वेबसिरीजमधील त्याची भूमिका खूप गाजतेय.

सकाळ डिजिटल टीम

Adhyayan Suman : सध्या सगळीकडे संजय लीला भन्साळी यांच्या 'हिरामंडी: द डायमंड बझार' या वेबसिरीजची चर्चा आहे. या वेबसिरीजमध्ये शेखर सुमन आणि अध्ययन सुमन ही पिता-पुत्राची जोडी पहिल्यांदाच एकत्र काम करतेय. या सिरीजमध्ये अध्ययन झोरावर अली खान ही भूमिका साकारतोय.

बऱ्याच काळाने अध्ययन प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. नुकत्याच एका दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने जेव्हा त्याच्याकडे कोणताही सिनेमा नसताना त्याची अवस्था कशी होती हे शेअर केलं.

नुकतीच अध्ययनने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये अध्ययनने त्याला आलेले अनुभव शेअर केले. आपल्या करिअरमधील कठीण काळ सांगताना तो म्हणाला कि, त्याला त्याच्या करिअरच्या सुरुवातीला खूप यश मिळालं पण त्यानंतर बराच काळ त्याच्या हातात कोणतंही काम नव्हतं. तो एक असा काळ होता ज्यावेळी तो स्वतःला खूप कमजोर समजत होता. काम मिळत नसल्यामुळे त्याने जवळजवळ हार मानली होती.

संजय लीला भन्साळी यांच्या वेबसिरीजमध्ये काम केल्यानंतर तो खूप खुश असून यानंतर त्याला आणखी काम मिळेल आणि अभिनेता म्हणून त्याला प्रेक्षक ओळखतील अशी आशा त्याने यावेळी व्यक्त केली.

"ड्रग्ज आणि दारूच्या व्यसनापासून स्वतःला वाचवलं"

ज्यावेळी अध्ययनच्या हातात काम नव्हतं त्यावेळी तो पूर्णवेळ घरी बसून होता. हा अनुभव सांगताना तो म्हणाला कि, "मला असं वाटायचं कि मी माझ्या चार मजली आलिशान पेंटहाऊसमध्ये कैद आहे. मला उत्तम काम करून स्वतःच्या आणि आई-बाबांच्या डोळ्यात त्याच्याविषयी अभिमान दिसेल असं माझं स्वप्नं होतं. पण असं होत नव्हतं. एक अशी वाईट वेळ माझ्या आयुष्यात आली होती कि, मी ड्रग्जच्या आहारी गेलो असतो आणि दारूचं व्यसनही मला लागलं असतं पण मी स्वतःला त्यापासून वाचवलं. मी माझ्या घरातील एकुलता एक मुलगा आहे. माझा भाऊ आता या जगात नाहीये त्यामुळे मला कोणतंही वाईट काम करून त्यांच्या नजरेतून खाली पडायचं नाहीये."

शेखर सुमन यांना अध्ययन आणि आयुष ही दोन मुलं आहेत. आयुषचं लहान वयातच आजारपणामुळे निधन झालं. याचा खूप मोठा धक्का शेखर सुमन आणि त्यांच्या कुटूंबाला बसला होता. यातून त्यांना सावरायला बरीच वर्षं लागली.

अध्ययनने केलंय 'या' आधी या प्रोजेक्टमध्ये काम

हाल ए दिल या सिनेमातून अध्ययनने सिनेविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर त्याने 'राज:द मिस्ट्री कंटिन्यू', जश्न, चूप: द रिव्हेंज ऑफ आर्टिस्ट या सिनेमातही काम केलं. पण त्याला अपेक्षित यश बॉलिवूडमध्ये मिळू शकलं नाही. 'राज' व्यतिरिक्त त्याचे कोणतेही सिनेमे बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकले नाहीत. त्याचं आणि कंगना रनौतचं अफेअर देखील बरंच गाजलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: एरंडोल येथे पोलीस स्टेशनच्यावतीने दादासाहेब पाटील महाविद्यालयात गुरु गौरव कार्यक्रमाचे आयोजन

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

'या' नक्षत्रांमध्ये जन्मलेली मुलं असतात अतिशय भाग्यशाली; सौंदर्य, यश आणि धनसंपत्तीने होतात समृद्ध

SCROLL FOR NEXT