Heeramandi Trailer eSakal
Premier

Heeramandi Trailer : सोनाक्षी-मनीषाची जुगलबंदी अन् झगमगणारी हिरामंडी, संजय लीला भन्साळीच्या नव्या सीरीजचा ट्रेलर समोर

Sanjay Leela Bhansali : ट्रेलरमध्ये मनीषा कोईराला ही मल्लिकाजन ही भूमिका साकारताना दिसतेय. मल्लिकाजन ही उच्च वर्गातील वेश्यांची प्रमुख आहे, जी त्या सगळ्यांवर सत्ता चालवते.

सकाळ डिजिटल टीम

Heeramandi Trailer released : 'गंगुबाई काठियावाडी' या गाजलेल्या सिनेमानंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आता चर्चेत आहेत ते त्यांच्या लवकरच रिलीज होणाऱ्या भव्यदिव्य वेबसिरीजमुळे. 'हिरामंडी- द डायमंड बाझार' असं या वेबसिरीजचं नाव असून नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या वेबसिरीजचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आणि या ट्रेलरने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

प्रेम, सत्तेची चढाओढ, स्वातंत्र्यलढा यावर या वेबसिरीजची कथा आधारित आहे. स्वातंत्र्यपूर्व भारतातील हिरामंडी या ठिकाणी चालणार वेश्याव्यवसाय, तेथील बायकांचं आयुष्य, त्यांचा स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग, वेश्या व्यवसायातील सत्तेसाठी सुरू असणारी चढाओढ, श्रीमंत लोक आणि ब्रिटिशांकडून केलं जाणारं शोषण यावर ही वेबसिरीज भाष्य करते.

ट्रेलरमध्ये मनीषा कोईराला (Manisha Koirala) ही मल्लिकाजन ही भूमिका साकारताना दिसतेय. मल्लिकाजन ही उच्च वर्गातील वेश्यांची प्रमुख आहे, जी त्या सगळ्यांवर सत्ता चालवते. सारं काही नीट सुरू असताना तिच्या शत्रूची मुलगी फरदीन परत येते आणि मल्लिकाजनच्या सत्तेला आव्हान देते. यातच तिची एक मुलगी बिब्बोजन स्वातंत्र्यलढ्यात सामील होते तर धाकटी मुलगी आलमजेब ताजदार या नवाबाच्या मुलाच्या प्रेमात पडते. यातून सुरू होणारा संघर्ष या वेबसिरीजमध्ये पाहायला मिळणार आहे.

शेखर सुमन आणि फरदिन खानसुद्धा त्यांच्या भूमिकांची प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला, अदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, संजीदा शेख, फरदिन खान, शेखर सुमन, फरीदा जलाल यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Maharashtra Latest News Update: राज्यासह देशात आज दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT