Hina Khan Post Esakal
Premier

Hina Khan : "तुम्हाला काय दिसतं ? माझ्या शरीरावरील व्रण कि डोळ्यातील आशा ?"; केमोथेरपी नंतर हिनाचा चाहत्यांना सवाल !

Hina Khan Post After Chemotherapy : अभिनेत्री हिना खानला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. केमोथेरपीनंतर हिनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या चाहत्यांना एक प्रश्न विचारला.

सकाळ डिजिटल टीम

Hina Khan Post : अभिनेत्री हिना खान सध्या कॅन्सर या आजाराशी लढतेय. काही दिवसांपूर्वीच हिना खानला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने याबाबत माहिती दिली तर तिने तिचे केस कापल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यातच तिने नुकत्याच केलेल्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

हिना खानची पोस्ट

हिना सध्या ब्रेस्ट कॅन्सरवर उपचार घेत असून तिला केमोथेरपी सुद्धा घ्यावी लागत आहे. केमोथेरपी नंतर तिने सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो आणि एक पोस्ट शेअर केली. त्यात ती म्हणते,"या फोटोमध्ये तुम्हाला काय दिसतं ? माझ्या शरीरावरील व्रण कि माझ्या डोळ्यात दिसणारी आशा ? हे व्रण माझे आहेत. मी त्यांना खूप प्रेमाने स्वीकारलं आहे. ते मी यातून बरी होत असल्याची पहिली खूण आहे. माझ्या डोळ्यात दिसणारी आशा हे माझ्या आत्म्याचं प्रतिबिंब आहे. या अंधाऱ्या गुहेच्या दुसऱ्या टोकाला असणारा प्रकाश मी पाहू शकतेय. मी लवकर बरी व्हावी अशी इच्छा आता व्यक्त करतेय आणि तुमचीही तब्येत कायम बारी राहावी अशी प्रार्थना करतेय. "

हिनाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिच्या गळ्यावर आणि काखेत असलेल्या व्रणांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिला प्रेरणा दिली आणि तिच्या जिद्दीचं कौतुक केलं. तिच्या सेलिब्रिटी मित्रांनी कमेंट करत तिला धीर दिला आणि ती नक्कीच यातून बाहेर पडणार आहे अशी खात्री व्यक्त केली. मराठी अभिनेत्री अक्षया नाईकने हिनाच्या पोस्टवर कमेंट करत "तुला खूप खूप प्रेम आणि आशीर्वाद मिळो" अशी प्रार्थना केली. तर तिचे सेलिब्रिटी मित्र अर्जुन बिजलानी, जुही परमार यांनीही कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या.

Comments On Hina Post

काही दिवसांपूर्वीच हिनाने तिचे केस कापतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. केस कापतेवेळी तिच्या डोळ्यात पाणीही आलं. तिने या व्हिडिओला "तुम्ही माझ्या आईची प्रार्थना ऐकत असाल, ती स्वतःला अशा गोष्टीसाठी तयार करत आहे ज्याचा विचार करण्याचे धाडस तिच्यात कधीच नव्हते. जेव्हा आपले हृदय तुटते तेव्हा आपल्या सर्वांकडे स्वतःला हाताळण्याचे साधन नसते.माझ्यासारख्या या आजाराशी झुंजणाऱ्या सर्व महिलांना मी हे सांगू इच्छिते की, 'मला माहित आहे की हे खूप कठीण आहे, कारण आपले केस हे आपल्या डोक्यावरचा मुकुट असतात. जो आपण कधीच काढत नाही." असं कॅप्शन दिलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT