Babil Khan esakal
Premier

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Babil Khan: नुकताच बाबिल एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये बाबिल हा एका संस्थेला आर्थिक मदत करताना दिसत आहे.

priyanka kulkarni

Babil Khan: दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिल खान (Babil Khan) हा सध्या चर्चेत आहे. नुकताच त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये बाबिल हा एका संस्थेला आर्थिक मदत करताना दिसत आहे. बाबिलच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे.

बाबिलनं केली आर्थिक मदत

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात पाण्याच्या सामस्येचा सामना करणाऱ्यांसाठी काम करणाऱ्या एका युट्यूबरला बाबिलनं 50,000 हजार रुपयांची देणगी दिली. हा युट्यूबर बाबिलला विमानतळावर भेटला. त्यावेळी बाबिलनं त्याला आर्थिक मदत केली.

viralbhayani या इन्स्टाग्राम पेजवरुन बाबिलचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये बाबिल हा युट्यूबरला पैसे पाठवताना दिसत आहे. युट्यूबरला पैसे पाठवून बाबिल म्हणतो, 'मेरा नाम लिखने की जरूरत नहीं है, तू अच्छा काम कर रहा है।' 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओला युट्यूबरनं कमेंट केली, "डियर बाबिल खान, तुझ्या मदतीसाठी मी तुझे आभार मानू शकत नाही. तुझी आर्थिक मदत माझ्यासाठी आणि मुंबईच्या गावातील लोकांसाठी महत्वाची आहे. तुझी 50 हजार रुपयांची देणगीमुळे इथली पाण्याची समस्या सोडवण्यासाठी मदत होईल. या मदतीची लोकांना सर्वात जास्त गरज आहे ."

पाहा व्हिडीओ:

बाबिल हा सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असतो. काही दिवसांपूर्वी बाबिलने इरफानबाबत एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, "कधी कधी मला हार मानावीशी वाटते आणि सगळं सोडून बाबांकडे जावंसं वाटतं". त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधलं. पण नंतर बाबिलनं ही पोस्ट डिलीट केली.

बाबिलनं कला, फ्रायडे नाइट प्लॅन या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच त्यानं द रेल्वे मॅन या वेब सीरिजमध्ये देखील महत्वाची भूमिका साकारली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gudhipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

Latest Marathi News Live Update : पुण्यात पिरंगुट घाटात कार दरीत कोसळली

Kolhapur Headmaster Tragedy : निलंबनाचे नैराश्य मुख्याध्यापकाने थेट आंब्याच्या झाडाला घेतला गळफास, कोल्हापुरातील घटना

Pune News: घरगुती गॅसला स्वदेशी पर्याय; एनसीएल शास्त्रज्ञांचा देशांत पहिले यश, घरगुती एलपीजीसाठी ‘डीएमई’ गॅस तयार

स्टार प्रवाहचा झी मराठीला दणका! कमळी, स्वानंदीने स्थान गमावलं; टीआरपी आपटला, पहिल्या स्थानावर कोण?

SCROLL FOR NEXT