Kartik Aaryan Esakal
Premier

Chandu Champion : "मी अजूनही स्ट्रगलर आहे" ; कार्तिकला वाटते 'या' गोष्टीची भीती

Kartik shared his fear : अभिनेता कार्तिक आर्यनने चंदू चॅम्पियन सिनेमाच्या प्रोमोशन निमित्ताने त्याला वाटणारी भीती आणि सिनेइंडस्ट्रीमधील त्याच स्थान यावर भाष्य केलं.

सकाळ डिजिटल टीम

Kartik : बॉलिवूडचा शाहजादा म्हणून ज्याने ओळखलं कमावलेल्या कार्तिक आर्यनला त्याला सध्या भारतातील सगळ्यात तरुण सुपरस्टार म्हणूनही ओळखलं जाऊ लागलं आहे. नुकतंच त्याने दिलेल्या मुलाखतीत इंडस्ट्रीतील त्याचा प्रवास आणि त्याचा स्ट्रगल या बद्दल भाष्य केलं.

काय म्हणाला कार्तिक?

कार्तिकने नुकतीच हिंदुस्थान टाईम्सला त्याच्या लवकरच रिलीज होणाऱ्या 'चंदू चॅम्पियन' सिनेमाबद्दल मुलाखत दिली. मी कायमच या इंडस्ट्रीत बाहेरून येणार व्यक्ती राहणार आहे आणि अजूनही काहीच बदललं नाहीये. आउटसायडर्सना देण्यात येणारी वागणूक याबद्दलही त्याने भाष्य केलं. या मुलाखतीत तो म्हणाला,""जेव्हा मी बॉलिवूडमध्ये आलो तेव्हा मी कोणालाच ओळखत नव्हतो आणि आता जसं मी इथे काम करतोय तेव्हाही काही फार परिस्थिती बदलली नाहीये. ते जस आहे तस आहे. माझ्यासाठी सगळं पूर्वीसारखंच आहे. काही शुक्रवारी तुमचे सिनेमे यशस्वी होतात आणि काही नसतात. पण हे कायमच सत्य राहील कि मी कधीच या इंडस्ट्रीशी संबंधित नव्हतो."

"ही जी माझी मनस्थिती आहे ती कायमच माझ्याबरोबर राहणार आहे. अजूनही मला असं वाटतं कि कोणताही शुक्रवार माझ्या करिअरचा शेवटचा शुक्रवार असू शकतो. हे सतत माझ्या मनात सुरु असतं. माझ्या मनातून सतत आवाज येतो कि, माझा पॅकअप तर होणार नाही ना. मला असं वाटतं कारण कि, माझ्याकडे दुसरा कोणताच प्लॅन नाहीये. मला दुसरी किंवा तिसरी संधी मिळणार नाही ही भीती कायम माझ्या डोक्यात असते." असं पुढे ते म्हणाला.

कार्तिकच्या सिनेमाची चर्चा

कार्तिकचा आगामी सिनेमा चंदू चॅम्पियनची सध्या खूप चर्चा आहे. १४ जूनला रिलीज होणाऱ्या या सिनेमाचं दिग्दर्शन कबीर खान यांनी केलं आहे. या सिनेमासाठी कार्तिकने स्वतःवर बरीच मेहनत घेतली आहे. हा सिनेमा पॅरालिम्पिक विजेते मुरलीकांत पेटकर यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या सिनेमात राजपाल यादव, भुवन अरोरा, हेमांगी कवी, भाग्यश्री बोरसे, यशपाल शर्मा या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar: मूळ टार्गेट वेगळं होतं, आयुष कोमकरला कसं संपवलं? गुन्हेगारांचा संपूर्ण प्लॅन समोर, पुणे पोलिसांनी काय सांगितलं?

Nagpur Railway Update : विदर्भ आणि पंचवेली एक्स्प्रेसला नवीन थांबे, प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेचा निर्णय

Latest Marathi News Updates: मुसळधार पावसामुळे धामणी धरण ओव्हरफ्लो, जवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Koregaon News: 'कोरेगावात नवीन पाच बसचे लोकार्पण'; आगारात मान्यवरांच्या हस्ते पूजन, प्रवाशांसाठी दळणवळण सेवा सुलभ

Education News : दीडशे कोटींच्या थकबाकीने शिक्षक हैराण; सेवानिवृत्त व रात्रशाळा शिक्षकांवर आली उपासमारीची वेळ

SCROLL FOR NEXT