Kim Kardashian out of the box look in met gala 
Premier

Met Gala 2024 : किम कार्देशीयनने मेट गालामध्ये लावली चक्क स्वेटरमध्ये हजेरी ; फॅन्स झाले नाराज

Fans are upset with Kim K Met Gala look : अभिनेत्री किम कार्देशीयनने यंदाच्या मेट गालाला चक्क स्वेटरमध्ये हजेरी लावली. यावरून तिचे फॅन्स तिच्यावर नाराज झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Kim Kardashian : अमेरिकन अभिनेत्री आणि इन्फ्लुएन्सर किम कार्देशीयनने नुकत्याच पार पडलेल्या मेट गाला कार्यक्रमाला हटके लूकमध्ये हजेरी लावली. तिचा हा लूक सोशल मीडियावर बराच काळ चर्चेत होता. किमने या कार्यक्रमाला चक्क हटके स्वेटरमध्ये हजेरी लावली. तिचा हा भन्नाट स्वेटर सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

किमने मेट गालाच्या रेड कार्पेटवर मेसन मार्जेला कोचरचा सिल्व्हर रंगाचा ड्रेस वेअर केला होता आणि या ड्रेसचा टॉप तिने जॉन गॅलियानोचा ग्रे रंगाचा कार्डिगन स्वेटर घालून कव्हर केला होता. तिच्या खांद्याचा काही भाग तिने या स्वेटरमधून रिव्हील केला असला तरीही तो स्वेटर तिने पूर्णवेळ काढला नाही. उलट तिने तो घट्टपणे त्या ड्रेसभोवती आवळून धरला होता. त्यामुळेच सध्या तिचे फॅन्स तिच्या या निवडीबाबत कन्फ्युज आहेत.

तिच्या या ड्रेसबाबत तिने Vogue या मासिकाला मुलाखत दिली. ती म्हणाली,"या थीम गार्डनमधल्या धमाल रात्रीनंतर मी खूपच घाईत आहे असं मला दाखवायचं होतं म्हणून मी हा स्वेटर घातलाय असं म्हंटल. मी आणि माझ्या डिझायनरने यावेळच्या थीमबाबत खूप विचार केला आणि त्यानंतर हा कार्डिगन ड्रेसच्या डिझाईनमध्ये जोडण्याचा निर्णय घेतला." असं ती म्हणाली.

फक्त तिने खांद्याभोवती लपेटलेला कार्डिगनचं नाही तर त्या खाली घातलेला फॉर्मफिटिंग ड्रेसही चर्चेत आहे. या सिल्व्हर रंगाच्या ड्रेसवर पानं आणि फुलांची नक्षी तयारी करण्यात आली असून तिची नाजूक शरीरयष्टी लक्ष वेधून घेत होती. सिल्व्हर रंगाचा हेअरकलर, कॅरमेल रंगाची लीप शेड आणि हाय हिल्स हा लूक तिने केला होता. पण तिच्या ड्रेसबाबत फॅशन एक्स्पर्ट आणि तिच्या फॅन्सनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या आधीही तिने असे ड्रेस घालून मेट गालाला हजेरी लावली आहे. २०१९ सालच्या मेट गालाला तिने केलेला लूक चांगलाच गाजला होता. तिचा त्यावेळचा ड्रेस इतका घट्ट होता कि किमला बसताही येत नव्हतं.

तर २०२२ च्या मेट गालाला तिने मर्लिन मनरोने १९६०मध्ये जॉन एफ केनेडी यांच्या वाढदिवसाला घातलेल्या प्रसिद्ध ड्रेसमध्ये हजेरी लावली होती. हा ड्रेस वेअर करण्यासाठी तिने चक्क १६ पाउंड वजन कमी केलं होतं. तिच्या या लूकची चर्चा बरीच गाजली होती.

Kim Kardashian look in met gala 2019 and 2022

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Retirement Plan : मोठी बातमी! अमित शहांनी सांगितला ‘रिटारयमेंट प्लॅन'

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Bhoom Crime : भूममध्ये कत्तलीसाठी जाणारी १६ जणावरे पकडली, आठ लाखाचा मुद्देमाल जप्त

Lungs Health Tips: थोडं चाललं तरी धाप लागते? श्वास घेताना त्रास होतोय? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेले ५ सोपे घरगुती उपाय!

Bike Accident : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; १ जण ठार, तर ३ जण जखमी

SCROLL FOR NEXT