kl rahul,suniel shetty esakal
Premier

Kl Rahul Birthday: जावयाच्या वाढदिवसानिमित्त सुनील शेट्टीची खास पोस्ट; हटके फोटो शेअर करत म्हणाला, "हे एक कनेक्शन आहे ..."

Kl Rahul Birthday: अभिनेता सुनील शेट्टीनं (Suniel Shetty) सोशल मीडियावर एक हटके पोस्ट शेअर करुन जावयाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

priyanka kulkarni

Kl Rahul Birthday: प्रसिद्ध क्रिकेटपटू केएल राहुलचा (Kl Rahul) आज (18 एप्रिल) वाढदिवस आहे. अनेक सेलिब्रिटी आणि चाहते केएल राहुलला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. आता अभिनेता सुनील शेट्टीनं (Suniel Shetty) देखील सोशल मीडियावर एक हटके पोस्ट शेअर करुन जावयाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुनील शेट्टीच्या या खास पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

सुनील शेट्टीने शेअर केला हटके फोटो

सुनील शेट्टीने केएल राहुलच्या वाढदिवसानिमित्त इंस्टाग्रामवर एक खास फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये सुनील शेट्टी, त्याचा मुलगा अहान शेट्टी आणि जावई केएल राहुल हे तिघे सोफ्यावर बसलेले दिसत आहेत. या फोटोला सुनील शेट्टीनं कॅप्शन दिलं, "आपल्या आयुष्यात काय आहे ते नाही, तर आपल्या जीवनात कोण आहे हे महत्त्वाचे आहे. आम्हाला धन्यता वाटते कारण तू आमच्या कुटुंबात आहेस, हे एक कनेक्शन आहे जे सांगण्यापलिकडचे आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा राहुल. लव्ह यू बेटा"

अहान शेट्टी शेअर केली खास पोस्ट

अहान शेट्टीनेही देखील एक खास पोस्ट शेअर करुन केएल राहुलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. केएल राहुलसोबतचा फोटो शेअर करुन अहाननं कॅप्शनमध्ये लिहिलं,'हॅप्पी बर्थडे ब्रदर'.अहाननं शेअर केलेल्या फोटोमध्ये तो आणि केएल राहुल कूल लूकमध्ये दिसत आहेत.

Kl Rahul

केएल राहुलनं अथियासोबत बांधली लग्नगाठ

23 जानेवारी 2023 रोजी केएल राहुल आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अथिया शेट्टीचे लग्न झाले. केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 2015 मध्ये रिलीज झालेल्या हिरो या चित्रपटाच्या माध्यमातून अथियानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.मुबारका आणि मोतीचूर चकनाचूर या चित्रपटांमध्ये अथियानं काम केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT