Madhuri's family give her special surprise on her b'day 
Premier

Madhuri Dixit : माधुरीसारखीच सुंदर दिसते तिची मोठी बहीण ! खास सरप्राईजमुळे माधुरीला अश्रू अनावर

Madhuri Dixit's special birthday celebration on set : अभिनेत्री माधुरी दीक्षितचा वाढदिवस डान्स दिवानेच्या सेटवर थाटात साजरा करण्यात आला. यावेळी तिच्या मोठ्या बहिणीने दिलेल्या सरप्राइजने माधुरी भारावली.

सकाळ डिजिटल टीम

15 मेला सगळ्यांची लाडकी अभिनेत्री माधुरी दीक्षितचा वाढदिवस आहे. यानिमित्त डान्स दिवाने या रिअलिटी शोच्या सेटवर खास सेलिब्रेशन करण्यात येणार आहे. माधुरीचा वाढदिवस संपूर्ण टीमने हटके सेलिब्रेट केला. माधुरीच्या वाढदिवसाचं हे सेलिब्रेशन लवकरच सगळ्यांना टेलिव्हिजव्हनवर पाहायला मिळेल.

तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माधुरीचे पती श्रीराम नेने आणि त्यांचा पेट डॉग कार्मेलोने खास हजेरी लावली. माधुरी आणि श्रीराम यांनी एकत्र रोमँटिक डान्स केला. त्यांचा हा डान्स सोशल मीडियावर चर्चेत असतानाच डान्स दिवानेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला. या प्रोमोमध्ये माधुरीच्या बहीण आणि मुलांनी तिला सरप्राईज देत त्यांचं प्रेम व्यक्त केलं.

बहिणीच्या आणि मुलांच्या माधुरीला खास शुभेच्छा

माधुरीची मोठी बहीण रूपा दीक्षित दांडेकर आणि माधुरीची दोन्ही मुलं अरिन आणि रियान यांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. रूपा माधुरीला शुभेच्छा देताना त्यांच्या लहानपणीच्या आठवणीत रमल्या. त्या म्हणाल्या,"माधुरी… मी एका लहानशा मुलीला मोठी व्यक्ती होताना पाहिलंय, जिचं कौतुक संपूर्ण जग करतंय. मी जेव्हा तुझ्याबरोबर वेळ घालवते, गप्पा मारते तेव्हा मला वाटतं की मी किती नशीबवान आहे की तू माझी लहान बहीण आहेस. तुझा चांगुलपणा, दयाळूपणा कायम मला आकर्षित करतो. मला आपलं लहानपण आठवतं.. गप्पा मारणं, शाळेतून येताना पावसात भिजणं, खेळणं, रॉकस्टार नाटकाचे सीन करणं, अनेक डान्स प्रॅक्टिस आणि परफॉर्मन्सेस, सगळं जादुई होतं. तुझ्या वाढदिवसानिमित्त मी प्रार्थना करते की तू सदैव हसत राहो, मस्ती करत राहो, डान्स प्रॅक्टिस करत राहो आणि परफॉर्म करत राहो. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माधुरी"

तर तिच्या दोन्ही मुलांनीही तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.  “आई तू आमची आदर्श आहेस, तू आम्हाला प्रत्येक गोष्टीत मदतकरतेस, तू आम्हाला आयुष्यात यशस्वी होण्यास प्रोत्साहित करतेस, तू शिकवलेल्या गोष्टींचं पालन आम्ही अमेरिकेत करतोय, आम्हाला तुझी खूप आठवण येते, लवकरच भेटू.” असं ते दोघे म्हणाले.

बहीण रूपा आणि दोन्ही मुलांचा व्हिडीओ बघून माधुरीला अश्रू अनावर झाले.

पहा प्रोमो:

प्रेक्षकांना हा खास एपिसोड आज ११ मे आणि उद्या १२ मेला पाहता येणार आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत माधुरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Tejashwi Yadav FIR : तेजस्वी यादवसह चौघांविरोधात 'FIR' दाखल; जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Photography Competition : पर्यटनस्थळे ‘क्लिक’ करा, पाच लाखांचे बक्षीस मिळवा; शंभूराज देसाई यांची माहिती

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

SCROLL FOR NEXT