Premier

Nikhil Chavhan: अभिनेता निखिल चव्हाणने स्वीकारले ७५ विद्यार्थ्यांचे पालकत्व, होतोय कौतूकाचा वर्षाव

Marathi Actor Latest Update : या चित्रपटात निखिल पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून, समाजातील नागरिकांना आलेल्या अडचणींवेळी त्यांच्या मदतीला धावून जाताना दिसणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Marathi Serial Actor Doing Good Work: कलाकार मंडळी ही कायमच त्यांच्या भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात; पण अनेकदा याच कलाकारांची वैयक्तिक आयुष्यातील काही कामे मनाला भावतात. काही कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करताना सामाजिक कार्यही करीत असतात. अशाच एका कलाकाराच्या सामाजिक कार्याची सध्या चर्चा होत आहे. हा अभिनेता म्हणजे निखिल चव्हाण.

आजवर अनेक मालिका, चित्रपटांमधून निखिलने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ‘लागीर झालं जी’ या मालिकेमुळे निखिल घराघरांत पोहोचला. ‘डंका’ या आगामी चित्रपटातही निखिल महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात निखिल पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून, समाजातील नागरिकांना आलेल्या अडचणींवेळी त्यांच्या मदतीला धावून जाताना दिसणार आहे.

अशातच त्याने आता तब्बल ७५ विद्यार्थ्यांच्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारली आहे. मांजरी आणि शेवाळवाडी परिसरातील अत्यंत गरीब व होतकरू विद्यार्थ्यांचा संपूर्ण वर्षाचा शैक्षणिक खर्च निखिल चव्हाण आणि अमित अण्णा पवार यांच्या ‘राजे क्लब’ या संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.

यावेळी विद्यार्थ्यांना वर्षभर लागणाऱ्या शालोपयोगी वस्तूंचे वाटपही करण्यात आले. शिवाय त्यांच्या या मदतीचा दर तीन महिन्यांनी आढावाही घेण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे. एक कलाकार असण्याबरोबरच माणुसकी जागवत निखिलने घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI Rankings: ३९ वर्षीय खेळाडू झाला 'नंबर वन' ऑलराऊंडर; टॉप-१० मध्ये केवळ एकच भारतीय

Latest Maharashtra News Updates : जीआर विरोधात ओबीसी समाज कोर्टात जाणार

ChatGpt Down Meme: चॅटजीपीटी डाऊन झाल्याने सोशल मिडियावर मीम्सचा महापूर, पाहा भन्नाट मीम्स

Viral Video : अवघ्या ७ सेकंदांत त्याला मृत्यूने गाठलं, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली हृदयद्रावक घटना

Manoj Jarange: सरकारच्या GR ला विरोध करणारे मराठे कोण? मनोज जरांगेंनी स्पष्ट शब्दात सांगितलं

SCROLL FOR NEXT