Mitali Mayekar 
Premier

Video : मिताली रील शूट करायला गेली आणि धडपडली.. ; मित्रांना हसू आवरेना, बीटीएस व्हिडीओ व्हायरल

Mitali Mayekar Viral Video : अभिनेत्री मिताली मयेकरने शेअर केलेला व्हिडीओ पाहून तिच्या मित्रांना हसू अनावर झालं.

सकाळ डिजिटल टीम

Mitali Mayekar : अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची बायको आणि अभिनेत्री मिताली मयेकर कायमच तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. तिचे ग्लॅमरस फोटोशूट्स, भन्नाट रील्स कायमच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. पण नुकतंच तिने शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे सगळ्यांना हसू अनावर झालं.

मिताली नुकतीच सिद्धार्थबरोबर परदेशात फिरायला गेली होती. यावेळी तिने अनेक देशांना भेट दिली. यावेळी तिने काढलेले बरेच फोटोजही सोशल मीडियावर शेअर केले. तर नुकतंच तिने तिचं एक रील शेअर केलं आणि ते पाहून सगळ्यांनाच हसू अनावर झालं. मिताली तिचं गवतावर चालतानाचं रील शूट करायला गेली पण सुरुवातीलाच तिचा तोल गेला आणि ती जमिनीवर पडली. सोशल मीडियावर तिने शेअर केलेला हा व्हिडीओ गाजतोय.

मितालीने या व्हिडिओला "मला गवतावर फिल्मी पद्धतीने धावतानाचा व्हिडीओ शूट करायचा होता जे माझं स्वप्न होतं पण मी काही फार मोठं स्वप्न पाहिलं का ? " असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलं आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून तिच्या अनेक सेलिब्रिटी मित्रांना हसू अनावर झालं. तर अनेकांनी आम्हाला हे बघून अजिबात आश्चर्य वाटलं नाही अशी कमेंट केली आहे.

Comments

मिताली आणि सिद्धार्थने यावेळी २३ दिवसांमध्ये ४ देश पालथे घातले. त्यांनी १६ पर्यटन स्थळांना यावेळी भेट दिली. या व्हेकेशनचे खास फोटोजही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे फिटनेस ट्रेनर ब्रायन आणि रीमासुद्धा होते.

याबरोबरच मितालीचं बिकिनी फोटोशूटही सोशल मीडियावर व्हायरल झालं. ब्लॅक रंगाची बिकिनी घालून तिने बाथटबमध्ये काढलेले फोटोज चांगलेच चर्चेत आहेत. तिच्या या सिझलिंग लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तिच्या अनेक सेलिब्रिटी मित्रांनी तिच्या या फोटोवर कमेंट करत तिच्या ग्लॅमरस लूकचं कौतुक केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

IPL 2026 Marathi News: हा जोकर... मी याच्यावर बंदी घातली असती! संजीव गोएंका यांचा Video अन् ललित मोदीचा चढला पारा

इराणला मोठा धक्का! ३७ हजार कोटी खर्चून मध्य-पूर्वेत सर्वात ऊंच पूल बांधला, अमेरिकेनं उडवला; वीज पुरवठाही खंडित

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT