Mukesh Ambani Music Video Esakal
Premier

Anant & Radhika Sangeet : अनंत-राधिकाच्या संगीतसाठी मुकेश आणि नीता अंबानी यांचा नातवंडांबरोबर खास music Video, इंटरनेटवर होतंय कौतुक

Mukesh & Neeta Ambani Special Video With Grandchildren : राधिका आणि अनंत अंबानीच्या संगीत सोहळ्यानिमित्त मुकेश आणि नीता अंबानी यांनी एक खास म्युझिक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओचं सोशल मीडियावर कौतुक होतंय.

सकाळ डिजिटल टीम

Neeta and Mukesh Ambani Video : सध्या सगळीकडे चर्चा आहे ती अनंत आणि राधिका यांच्या लग्न सोहळ्याची. 12 जुलैला पार पडणाऱ्या या आलिशान लग्न सोहळ्यात अनेक दिग्गज लोक उपस्थित राहणार आहेत. सोशल मीडियावर या लग्नापूर्वीचे कार्यक्रम हे चांगले चर्चेत आहेत. नुकताच राधिका आणि अनंत यांचा संगीत सोहळा पार पडला आणि यानिमित्त अनंतचेआई-वडील मुकेश आणि नीता अंबानी यांनी एक खास म्युझिक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ सध्या चांगलाच गाजतोय.

अनंत आणि राधिका यांच्या संगीत सोहळ्यानिमित्त मुकेश आणि नीता यांनी 1968 साली गाजलेल्या 'ब्रम्हचारी' सिनेमातील 'चक्के पे चक्का' या गाजलेल्या गाण्यावर एक व्हिडिओ बनवला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. या व्हिडिओमध्ये एकेकाळी गाजलेलं हे गाणं पुन्हा एकदा रीक्रिएट करण्यात आलंय. मुकेश आणि नीता यांचा रोमँटिक अंदाज दिसत असून अगदी फिल्मी स्टाईल मध्ये या दोघांनी गाण्यासोबत लिप सिंंक्रोनाइज सुद्धा केले आहेत. त्यांच्याबरोबर त्यांची नातवंड आदिया, वेदा, कृष्णा आणि पृथ्वी दिसत आहेत.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच वायरल झाला असून अनेक आणि अंबानी दांपत्याच्या या प्रयत्नाचे कौतुक केलंय. या सहा जणांनी या व्हिडिओच्या माध्यमातून अनंत आणि राधिका च्या संगीत सोहळ्याचा मूड सेट केला असं म्हणायला हरकत नाही.

अनंत आणि राधिकाच्या सांगितला बॉलीवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटीजनी हजेरी लावली. माधुरी दीक्षित आणि तिचे पती श्रीराम नेने, महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षी, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग, रणबिर कपूर, आलिया भट यांसारख्या अनेक दिग्गज सेलिब्रिटीजनी या संगीत सोहळ्याला हजेरी लावली होती तर सुप्रसिद्ध हॉलिवूड गायक जस्टिन बीबरने या संगीत सोहळ्याला परफॉर्मन्स सादर केला. सोशल मीडियावर या आलिशान संगीत सोहळ्याचे सगळेच व्हिडिओ चांगलेच गाजत आहेत तर सेलिब्रिटीच्या लुकची ही चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Capital IPO: 'टाटा'च्या आयपीओचा धमाका! सामान्यांसाठी खुला होण्यापूर्वीच बड्या कंपन्यांची मोठी गुंतवणूक

Ambad News : अंबड तालुक्यातील लालवाडी तांडा नंबर 1 वर घडली दुर्दैवी घटना; तलावात पाय घसरून अकरा वर्षीय राजवीर राठोड याचा बुडून मृत्यू

Arattai messaging app : स्वदेशी मेसेजिंग ॲप ‘Arattai’ची क्रेझ वाढली! ; आता आनंद महिंद्रांनीही केलंय डाउनलोड

Barshi Crime : बार्शीत एसटी महामंडळ बसच्या महिला वाहकास मारहाण; सहा महिलांविरुद्ध गुन्हा

Latest Marathi News Live Update: कोरडेवाडी साठवण तलावाच्या मंजुरीसाठी राजश्री राठोड यांचे आमरण उपोषण

SCROLL FOR NEXT