Laila Khan Murder Case Esakal
Premier

Laila Khan Murder Case : अखेर न्याय मिळाला! अभिनेत्री लैला खान हत्या प्रकरणी सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा

अभिनेत्री लैला खान हत्या प्रकरणाचा निकाल लागला असून खुनी परवेझला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

सकाळ डिजिटल टीम

२०११ साली झालेल्या लैला खान आणि तिच्या कुटूंबाच्या हत्या प्रकरणात न्यायालयाने परवेझ टाकला फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने त्याला दोषी ठरवल्यानंतर निकाल राखून ठेवला होता पण आता आठवड्याभराने निकाल जाहीर केला.

प्रॉपर्टीच्या वादावरून परवेझने नोकराच्या मदतीने लैलाची आई, लैला आणि तिच्या संपूर्ण कुटूंबाची हत्या केली होती. परवेझ हा लैलाचा सावत्र वडील होता. लैलाच्या आईने त्याच्याशी तिसरं लग्न केलं होतं.

२०११ साली परवेझ टाक याने लैला खान आणि तिच्या कुटूंबातील पाच जणांची इगतपुरी येथील फार्महाउसमध्ये हत्या केली होती आणि त्यांचे मृतदेह याच फार्महाऊसमध्ये गाडले होते. परवेझ हा लैलाच्या आईचा तिसरा नवरा होता आणि त्याचं वय त्यावेळी २९ वर्षं इतकं होतं.

लैलाचे पिता नादिरशाह पटेल यांनी लैला आणि तिच्या आईसोबत कुटूंबातील आणखी चार सदस्य बेपत्ता झाल्याची तक्रार ओशिवरा पोलीस स्टेशनला दाखल केली होती. त्यानंतर हा हत्येचा प्रकार उघडकीस आला. परवेझने आपल्या कुटुंबीयांचं अपहरण केल्याचा संशय त्यांनी तक्रारीत व्यक्त केला होता.

हत्येनंतर काही महिन्यांनी परवेझला जम्मू-काश्मीर पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली होती. सुरुवातीला परवेझ लैला आणि तिचे कुटुंबीय दुबईत असल्याचं सांगत होता पण नंतर त्यानेच त्यांची हत्या केल्याची कबुली दिली.

हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?

दुबई येथील व्यावसायिकाशी झालेल्या व्यावसायिक करारात हिस्सा न दिल्याने राग परवेझच्या मनात होता. याशिवाय लैलाच्या आईचे तिचा दुसरा पती आसिफ शेखसोबत जवळीक वाढली होती. ही गोष्ट परवेझला पसंत नव्हती म्हणून त्याने हत्या केली असं आरोपपत्रात नमूद केलं आहे.

टाकने दिलेल्या जबानीत संपूर्ण घटनाक्रम सांगितला होता. ८ फेब्रुवारीला टाक लैलाच्या कुटूंबासहित इगतपुरी येथील फार्महाऊसवर पार्टी करण्यासाठी गेला होता. या दरम्यान मध्यरात्री लैलाची आई आणि टाकमध्ये भांडण झालं. हे भांडण सुरु असतानाच टाकने शेहलीना खानच्या डोक्यात जड वस्तूने प्रहार केला. यामुळे शेहलीना यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा आरडाओरडा ऐकून घरातील इतर लोक जागे झाले आणि ते टाकला मारहाण करू लागले. तेव्हा टाकने मदतीसाठी चौकीदार असलेल्या शाकीर हुसेनला आवाज दिला आणि त्या दोघांनी मिळून संपूर्ण कुटूंबाची हत्या केल्याचं जबानीत कबूल केलं.

शेहलिना खान (59), त्यांची मोठी मुलगी अजमीना पटेल (32), दुसरी मुलगी लैला (30),जुळी मुलं झारा आणि इम्रान (25) आणि अजून एक नातेवाईक रेश्मा सगीर खान उर्फ ​​टल्ली (19) यांची हत्या परवेझने केली होती आणि त्यांचे मृतदेह त्याचं फार्महाऊसमध्ये गाडून टाकले होते.

लैला खान आणि तिच्या कुटूंबाच्या हत्येची केस मुंबई उत्तर-मध्यचे भाजपचे उमेदवार उज्वल निकम यांनी विशेष सरकारी वकील म्हणून लढवली होती. मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना उमेदवारी जाहीर होताच लैला खान हत्या प्रकरणासह एकूण २९ खटल्यांचा निकम यांनी राजीनामा दिला होता.

या चौदा वर्षं जुन्या प्रकरणाचा निकाल आज अखेर लागला आणि लैलाला व तिच्या कुटूंबियांना न्याय मिळाला.

कोण होती लैला खान?

लैला ही बॉलिवूडमधील बी आणि सी ग्रेड सिनेमात काम करणारी अभिनेत्री होती. 2002 मध्ये कन्नड फिल्म 'मेकअप' मधून तिने सिनेविश्वात पदार्पण केलं. पण तिला ओळख मिळाली ते राजेश खन्ना यांची मुख्य भूमिका असलेल्या 'वफा : ए डेडली लव स्टोरी' या सिनेमामुळे. या सिनेमात तिने राजेश खन्ना यांच्यासोबत बोल्ड सीन दिले होते. या सिनेमानंतर तिने सी ग्रेड सिनेमांमध्ये काम करणं सुरु केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI च्या कारवाईचा दणका! Dabur नंतर Zandu सह ५ कंपन्यांवर कडक कारवाई; कारण काय?

Pimpalwandi News : पिंपळवंडी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक गिल यांच्याकडे संतप्त सवाल; पिंपळवंडी येथील पोलीस आऊट पोस्ट दहा वर्षापासून बंद

Shubman Gill: "तो खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!", श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर गिलची मोठी भविष्यवाणी!

Marathi News Live Updates : 'आप' नेते सत्येंद्र जैन आणि इतर ४ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Sangola News : सांगोल्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT