Naach Ga Ghuma ESAKAL
Premier

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Naach Ga Ghuma: जाणून घेऊयात या चित्रपटाच्या ओपनिंग-डे कलेक्शनबाबत...

priyanka kulkarni

Naach Ga Ghuma: गेल्या काही दिवसांपासून विविध विषयांवर आधारित असणारे मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्त्रीप्रधान मराठी चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. झिम्मा, बाईपण भारी देवा या चित्रपटानंतर आता नाच गं घुमा (Naach Ga Ghuma) हा महिलांवर आधारित असणारा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट काल (1 मे) रिलीज झाला. या चित्रपटानं पहिल्याचं दिवशी बॉक्स ऑफिसवर दणदणीत सुरुवात केली आहे. जाणून घेऊयात 'नाच गं घुमा' या चित्रपटाच्या ओपनिंग-डे कलेक्शनबाबत...

'नाच गं घुमा'चं कलेक्शन

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'नाच गं घुमा' या चित्रपटानं ओपनिंग-डेला 2.5 कोटींची कमाई केली. वीकेंडला या चित्रपटाच्या कमाईत वाढ होईल, असा अंदाज लावला जात आहे.

नाच गं घुमा या सिनेमाची निर्मिती मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि स्वप्नील जोशी यांनी केली आहे. मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांनी या सिनेमाचं लेखन केलं आहे आणि परेश यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

जॉब करणारी महिला आणि हेल्पर यांच्यातील नाते नाच गं घुमा या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. कौटुंबिक, भावनिक आणि कॉमेडी अशा प्रकारचा हा चित्रपट आहे आणि भावनिक, कॉमेडी हे त्यातले मुख्य रस आहेत. ही अर्थातच प्रत्येक कुटुंबाची गोष्ट आहे.

'नाच गं घुमा'ची स्टार कास्ट

नाच गं घुमा या चित्रपटात  नम्रता संभेराव, मुक्ता बर्वे, सारंग साठ्ये, सुकन्या कुलकर्णी, सुप्रिया पाठारे, शर्मिष्ठा राऊत, मधुगंधा कुलकर्णी, सुनील अभ्यंकर आणि बालकलाकार मायरा वायकुळ यांच्या मुख्य भूमिका आहेत. तसेच या चित्रपटात ललित प्रभाकर आणि कविता मेढेकर यांच्या देखील विशेष भूमिका आहेत. तसेच हास्यजत्रा फेम ईशा सुद्धा या सिनेमात काम करतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farm Loan Waiver: कर्जमाफीचा पहिला हप्ता अखेर वितरीत, नवीन कर्ज लगेच मिळणार का? मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितलं!

Vaibhav Sooryavanshi: भारताच्या कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी वैभव सूर्यवंशी सज्ज; नागपूरात पोहोचला... कोणाची मदत घेतोय?

Abhijeet Dipke: सरकारची अमेरिकन कंपनीच्या मदतीने दिपकेवर पाळत? वैयक्तिक माहिती प्रदर्शित केली?

Marathi News Live Updates : पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; भरधाव वाहन दोन वेळा पलटी

Palghar News: पोषण आहाराला कात्री, डहाणूतील ३५ आश्रमशाळांमध्ये चपातीचा पुरवठा बंद

SCROLL FOR NEXT