Nach Ga Ghuma Teaser esakal
Premier

Nach Ga Ghuma Teaser: "प्रत्येक यशस्वी बाईमागे एक कामवाली बाई असते"; 'नाच गं घुमा' चा टीझर, प्रेक्षक म्हणाले....

Nach Ga Ghuma Teaser: नुकताच 'नाच गं घुमा' या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आणि अल्पावधीतच प्रेक्षकांना हा टीझर खूप आवडला आहे.

priyanka kulkarni

Nach Ga Ghuma Teaser: सध्या मराठी सिनेइंडस्ट्रीत स्त्री प्रधान सिनेमांची चलती आहे. 'झिम्मा', 'बाईपण भारी देवा' या सिनेमांनी बॉक्स ऑफिस गाजवलं आणि आता सगळीकडे चर्चा आहे ती लवकरच रिलीज होणाऱ्या परेश मोकाशी दिग्दर्शित 'नाच गं घुमा' या सिनेमाची. करिअर सांभाळून संसार करणारी स्त्री आणि तिला हातभार लावणारी कामवाली बाई यांची धमाल गोष्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आणि अल्पावधीतच प्रेक्षकांना हा टीझर खूप आवडला आहे. मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांची या सिनेमात मुख्य भूमिका असणार आहे. टीझरमधील त्यांच्या जुगलबंदीची झलक पाहून प्रेक्षक खुश झाले आहेत. १ मे २०२४ ला हा सिनेमा महाराष्ट्रातील सर्व सिनेमागृहात रिलीज होणार आहे.

'नाच गं घुमा' ची स्टार कास्ट

नम्रता आणि मुक्ता बरोबरच सारंग साठ्ये, सुकन्या कुलकर्णी, सुप्रिया पाठारे, शर्मिष्ठा राऊत, मधुगंधा कुलकर्णी, सुनील अभ्यंकर आणि बालकलाकार मायरा वायकुळ यांच्या मुख्य भूमिका आहेत.

पहा टीझर:

प्रेक्षकांना असा वाटला टीझर?

सोशल मीडियावर टीझर रिलीज होताच प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. अनेकांनी कमेंट्समध्ये टीझर आवडल्याचं म्हंटल. अनेकांनी 'आता आम्हाला ट्रेलर पाहण्याची अधिक उत्सुकता आहे' अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी कमेंट्सच्या माध्यमातून मुक्ता आणि नम्रताच्या अभिनयाचं कौतुक केलं आणि सिनेमात त्यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला उत्सुक असल्याचं म्हंटलं. तर बालकलाकार मायराची झलक पाहून तिचे चाहतेही खुश झाले.

सिनेमाची हटके कथा आणि स्वप्नील जोशीचं निर्माता म्हणून पदार्पण

मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांनी या सिनेमाचं लेखन केलंय तर परेश मोकाशी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन सुद्धा केलंय. सिनेमाचा टीझर अतिशय कमाल असून कामवाली आणि गृहिणी यांचं नातं, रोजच्या आयुष्यात त्यांच्यात सतत रंगणाऱ्या जुगलबंदीची झलक या टीझरमध्ये पाहायला मिळतेय. नम्रताचा कमाल कॉमेडी सेन्स, मुक्ताचा तितकाच जबरदस्त अभिनय, सारंग आणि मायराने त्यांना दिलेली साथ यातूनच हा सिनेमा धमाल असणार हे लक्षात येतंय. विशेष म्हणजे या सिनेमाची निर्मिती केलीये अभिनेता स्वप्नील जोशीने. स्वप्नील सोबतच परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, तृप्ती पाटील या सिनेमाची हिरण्यगर्भ प्रॉडक्शन या बॅनरअंतर्गत सहनिर्मिती करत आहेत.

सिनेमाचं प्रोमोशनल गाणं इंटरनेटवर व्हायरल

सिनेमाच्या टीझर सोबतच सिनेमाचं प्रोमोशनल गाणं 'नाच गं घुमा' सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय. मुक्ता आणि नम्रतासोबतच सगळ्या कलाकारांचा धमाल डान्स आणि तितक्याच भन्नाट गाण्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. तर नाच गं घुमा च्या हुक स्टेप असलेल्या रील्स सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 Asia Cup: भारताचा सलग तिसरा विजय! आधी अभिज्ञान कुंडूने द्विशतक करत चोपलं अन् मग दीपेशने ५ विकेट्स घेत मलेशियाचा उडवला धुव्वा

SSC And HSC Board Exam: महत्त्वाची बातमी! डिजिटल मार्कशीटसाठी दहावी-बारावी विद्यार्थ्यांना 'APAAR ID' नोंदणी करणं बंधनकारक

Palghar Bribery Case : नवापूरचा ग्रामसेवक लाच घेताना अटकेत; कृषी पर्यटन परवान्यासाठी २० हजारांची मागणी!

Latest Marathi News Live Update : मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन

Buldhana Accident : लेकीनं डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहिलं, पण अपघाताने होत्याचं नव्हतं केलं; आई-बाबांना करावे लागले अंत्यसंस्कार...

SCROLL FOR NEXT