Nilu Phule ESAKAL
Premier

Nilu Phule: निळू फुलेंच्या जन्मदिनी गार्गी फुलेंची खास पोस्ट; म्हणाल्या, "तू जिथे असशील तिथे..."

Nilu Phule: निळू फुले यांची मुलगी गार्गी फुले-थत्ते यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

priyanka kulkarni

Nilu Phule: "बाई वाड्यावर या..." हा डायलॉग आठवला की डोळ्यासमोर येतात ज्येष्ठ अभिनेते निळू फुले. दिवंगत अभिनेते निळू फुले (Nilu Phule) यांचे चित्रपट आजही लोक आवडीनं बघतात. निळू फुले यांनी त्यांच्या जबरदस्त अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं. निळू फुले यांनी अनेक नाटकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. निळू फुळे यांचा आज जन्मदिन आहे. याचनिमित्तानं निळू फुले यांची मुलगी गार्गी फुले-थत्ते यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

गार्गी फुले यांची पोस्ट

गार्गी फुले यांनी निळू फुलेंचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, "जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा, तू जिथे असशील तिथे खूप खूप प्रेम" गार्गी यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

निळू फुले यांचे चित्रपट

अजब तुझे सरकार,जैत रे जैत, पिंजरा, सिंहासन या निळू फुले यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. निळू फुले यांनी जवळपास  250 हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. कथा अकलेचा कांद्याची, सखाराम बाईंडर या नाटकामधील निळू फुले यांच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं.

गार्गी फुले यांनी 'या' मालिकांमध्ये काम केलं

नवरदेव Bsc. Agri (2024) आणि मसाला (2012) या चित्रपटांमध्ये गार्गी फुले यांनी काम केलं आहे. तुला पाहते रे ,सुंदरा मनामध्ये भरली या मालिकांमुळे गार्गी यांना विशेष लोकप्रियता मिळाली. गार्गी या त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांना देत असतात. त्यांना इन्स्टाग्रामवर 9 हजारपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : सहकार क्षेत्राला शैक्षणिक बळ देणारा ऐतिहासिक टप्पा : केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT