Nupur Shikhare reel Esakal
Premier

Nupur Shikhare- Ira Khan : नुपूर शिखरेच्या आईचा बॉसी अंदाज; नवऱ्याची अवस्था पाहून आमिरची लेक म्हणाली...

Nupur Shikhare reel on trending song : आमिर खानचा जावई नुपूर शिखरेचं रील सध्या सोशल मीडियावर गाजतंय.

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानचा मराठी जावई आणि फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे सोशल मीडियावरसुद्धा खूप सक्रिय आहे. त्याचे त्याच्या आईसोबतचे रील्स आणि फोटोंना तो देत असलेले भन्नाट कॅप्शन्स कायमच चर्चेत असतात.

त्याची आई प्रीतमबरोबर तो पोस्ट करत असलेल्या रील्सनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. आई-मुलाची ही भन्नाट केमिस्ट्री नेटकरी सुद्धा एन्जॉय करतात. नुकतंच त्याने त्याच्या आईबरोबर सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत असलेल्या मराठी गाण्यावर एक हटके रील शेअर केलं. त्याचं हे रील चांगलंच व्हायरल झालंय.

सध्या सोशल मीडियावर 'माझ्याशी नीट बोलायचं' हे भाडिपाचं रॅप ट्रेंडिंगमध्ये आहे. या गाण्यावर अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि सेलिब्रिटीज यावर मजेशीर रील्स शेअर करत आहेत. नुपूर आणि त्याची आई प्रीतमने धमाल रील शेअर केलं. प्रीतम यांचा निवांत, कुल आणि बॉसी अंदाज या रीलमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळतोय.

या रीलमध्ये नुपूर घरातील सगळी कामं आवरतोय तर आई निवांत आराम करताना दिसतेय. नुपूरची अवस्था आणि आईचा अंदाज बघून सगळ्यांना हसू अनावर झालं. या व्हिडिओला नुपूरने "आईशी नीटंच बोलायचं!" असं कॅप्शन दिलं आहे.

नुपूरचा हा व्हिडीओ बघून सेलिब्रिटींसोबत नेटकऱ्यांनाही हसू अनावर झालं. अभिनेत्री सुश्मिता सेन, प्रिया बापट, फातिमा सना शेख यांनी कमेंट करत नुपूर आणि आईचा अंदाज आवडल्याचं म्हंटलं. नुपूरची बायको आणि प्रीतम यांच्या सुनबाई आयराने "अरे बापरे! हे खूप भारी आहे" अशी कमेंट करत सासूबाईंचं कौतुक केलं.

तर चाहत्यांनीही शिखरे काकूंचा हा व्हिडीओ आवडल्याचं कमेंट्समध्ये म्हंटलं आहे. "हे तर भारीच जमलय ...... अगदी योग्य जोडी आहे......." अशी कमेंट एकाने केलीये तर एकाने "आई तर भारीच बाबा" असं म्हणत नूपुरच्या आईचं कौतुक केलंय. एका युजरने "आई नाही भाई" अशी कमेंट केलीये.

या आधीही नुपूरने त्याच्या आईसोबत असेच मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि हे व्हिडीओ सगळ्यांनाच खूप आवडले आहेत.

दरम्यान, नुपूरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास त्याने आमिर खानची लेक आयराशी ३ जानेवारी २०२४ रोजी नोंदणी पद्धतीने लग्न केलं आणि नंतर या जोडीने राजस्थानमध्ये मित्र-मैत्रीण आणि कुटूंबाच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली.  

SMAT 2025: इशान किशनच्या झारखंडने जिंकली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी; पुण्यात झालेल्या फायनलमध्ये कर्णधार ठरला हिरो

Nitish Kumar Hijab Incident : हिजाब घटनेनंतर नितीश कुमारांच्या जीवाला धोका? ; यंत्रणांनी सुरक्षा वाढवली!

Crime: भयंकर! ४० वर्षीय प्रेयसीला २७ वर्षीय प्रियकराकडून मूल हवं होतं; तरुणाच्या पत्नीला कळलं अन् भलतंच कांड घडलं!

Latest Marathi News Live Update : ‘जी राम जी’वर लोकसभेची मोहोर ; रोजगारवाढीचा केंद्र सरकारचा दावा

Viral Video Fact Check: बेघर होऊन भीक मागताना सापडलेली महिला खरंच क्रिकेटर सलीम दुर्रानी यांची पत्नी? काय आहे सत्य?

SCROLL FOR NEXT