Karisma saved life of actor Harish 
Premier

Karisma Kapoor : "करिश्माने माझा जीव वाचवला"; अभिनेता हरीशने सांगितली 'त्या' अपघाताची आठवण

Actor Harish recalls memory of his first film with Karisma : अभिनेता हरीशने एका मुलाखतीमध्ये करिश्माने त्याचा जीव वाचवल्याचा खुलासा केला. काय घडलं होतं नेमकं जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Karisma Kapoor : सगळ्यांची लाडकी लोलो म्हणजेच अभिनेत्री करिश्मा कपूरने (Karisma Kapoor) १९९० साली 'प्रेम कैदी' या सिनेमातून भारतीय सिनेसृष्टीत पदार्पण केलं. उत्तम अभिनेत्री म्हणून नंतर ओळख बनवलेल्या करिश्माची एक खास आठवण तिचा प्रेम कैदी सिनेमातील सहकलाकार हरीशने (Harish) नुकतीच शेअर केली.

हरीशने (Harish) नुकताच इंस्टाग्रँट बॉलीवूडला मुलाखत दिली. यावेळी त्याने करिश्माने त्याला एका अपघातातून कसं वाचवलं हे सांगितलं. प्रेम कैदी सिनेमात एक सीन आहे ज्यात पूलमध्ये बुडणाऱ्या करिश्माला हरीश वाचवतो पण प्रत्यक्षात उलटं घडलं होतं. तो म्हणाला,"सिनेमात एक सीन आहे ज्यात करिश्मा उडी मारते आणि मी तिला वाचवतो पण खरी गोष्ट मी आज तुम्हाला सांगतो. खरंतर करिश्माने माझा जीव वाचवला आहे कारण मला पोहता येत नाही.जेव्हा मी उडी मारली तेव्हा मी काही वेळाने खरंच बुडायला लागलो होतो आणि सगळ्यांना वाटलं कि मी काहीतरी प्रॅन्क करतोय. अक्षरशः मला करिश्माने पकडलं आणि मी तिचे कपडे घट्ट पकडून होतो आणि तिने मला खरंच वाचवलं."

प्रेम कैदी सिनेमातून पदार्पण आणि करिश्माची यशस्वी कारकीर्द

'प्रेम कैदी' या सिनेमात करिश्मा, हरीश आणि दिलीप ताहिल यांची मुख्य भूमिका होती. या सिनेमाचं लेखन दिग्दर्शन के मुरली मोहना राव यांनी केलं होतं. यासोबतच या सिनेमात भारत भूषण, परेश रावल, शफी इनामदार हे कलाकारही होते. तेलुगू सिनेमा प्रेमा कैदीचा हा हिंदी रिमेक होता. हा सिनेमा रिलीज झाला तेव्हा करिश्मा फक्त १७ वर्षांची होती तर हरीश तिच्याहून लहान होता.

या सिनेमानंतर करिश्माने अनेक सिनेमांमध्ये काम केलं. 'अनारी' आणि 'जिगर' सिनेमातील तिचं काम खूप गाजलं. तिचे हे सिनेमेही हिट ठरले. पण तिला ओळख मिळाली 'अंदाज अपना अपना' या तिच्या सिनेमामुळे. तिचा हा सिनेमा खूप गाजला. कुली नंबर १, झुबेदा, दिल तो पागल है,जुडवा, फिजा हे तिचे सिनेमे सुपरहिट झाले.

करिश्माने आता सिनेविश्वात बऱ्याच काळाने कमबॅक केलं असून नुकताच तिचा नेटफ्लिक्सवर 'मर्डर मुबारक' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला. या सिनेमात तिने सारा अली खान सोबत स्क्रीन शेअर केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT