Ranbir Kapoor And Alia Bhatt 
Premier

Ranbir Kapoor And Alia Bhatt: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट खरेदी केली आलिशान कार; किंमत वाचून थक्क व्हाल

Ranbir Kapoor And Alia Bhatt: रणबीर आणि आलिया यांच्या या नव्या कारची सध्या चर्चा सुरु आहे.

priyanka kulkarni

Ranbir Kapoor And Alia Bhatt New Car: अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट ही जोडी नेहमी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. रणबीर आणि आलिया हे काही दिवसांपूर्वी अनंत अंबानी आणि आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग क्रूझ पार्टीमध्ये सामील झाले होते. रविवारी (2 जून) रात्री आलिया आणि रणबीर अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगमधून त्यांच्या लाडक्या मुलीसह परतले आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी त्यांच्या नव्या कारची डिलिव्हरी घेतली आहे. रणबीर आणि आलिया यांच्या या नव्या कारची सध्या चर्चा सुरु आहे. जाणून घेऊयात रणबीर आणि आलिया यांच्या नव्या आलिशान कारबद्दल...

रणबीर आणि आलियाच्या नव्या कारची किंमत

रणबीरने एप्रिल महिन्यामध्ये निळ्या रंगाची बेंटले कॉन्टिनेंटल जीटी V8 कार खरेदी केली होती, ज्याची बरीच चर्चा झाली होती. आता रणबीर आणि आलिया भट्टने Lexus LM ही कार खरेदी केली आहे. या कारची किंमत जवळपास 2.50 कोटी रुपये आहे, असे म्हटले जाते. रणबीर आणि आलियाच्या नव्या कारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रणबीर आणि आलियाच्या या नव्या कारमध्ये हाय-एंड इंटिरियर्स, हायब्रीड सिस्टीम, अॅडव्हान्स शॉक एब्जॉर्बर्स, अॅडवान्स सेफ्टी इत्यादी अनेक वैशिष्ट्यांनी आहेत.

'Lexus LM' या कारच्या आधी रणबीर आणि आलियाने रेंज रोव्हर आणि बेंटले विकत घेतले होते. बेंटले कारची किंमत सुमारे 6 कोटी रुपये आहे आणि तिची एक्स-शोरूम किंमत 5.2 कोटी रुपये आहे.

रणबीर आणि आलिया यांचे आगामी चित्रपट

रणबीर आणि आलिया यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. रणबीर हा लवकरच रामायण या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर आलियाचे जिगरा आणि लव्ह अँड वॉर हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT