Salman Khan wishes Anant Ambani-Radhika Merchant esakal
Premier

Anant Ambani-Radhika Merchant: "तुम्ही आई-बाबा झाल्यानंतर..."; सलमानने अनंत-राधिकाला दिलेल्या हटके शुभेच्छा वाचा!

Salman Khan wishes Anant Ambani-Radhika Merchant : सलमान खानने अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या विवाहाचा फोटो शेअर करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Sandip Kapde

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या चेअरमन मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या छोटे पुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचा विवाह १२ जुलै रोजी मोठ्या धूमधडाक्यात संपन्न झाला. या विवाह सोहळ्यात देश-विदेशातील मोठमोठे मान्यवर उपस्थित होते. बॉलिवूड, हॉलिवूड, दक्षिण चित्रपटसृष्टी, क्रीडा आणि व्यावसायिक क्षेत्रातील ताऱ्यांनी या विवाह सोहळ्याला शोभा वाढवली.

सेलिब्रिटीजची उपस्थिती-

राधिका मर्चेंट आणि अनंत अंबानी यांच्या विवाह सोहळ्यात सलमान खान, शाहरुख खान, रणवीर सिंग यांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. शनाया कपूर, अनन्या पांडे यांच्यासह रणवीर सिंग, सलमान खान आणि रजनीकांत यांनी जोरदार नृत्य सादर केले होते.

सलमान खानची शुभेच्छा-

सलमान खानने अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या विवाहाचा फोटो शेअर करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सलमान खानने फोटो शेअर करताना लिहिले, "अनंत आणि राधिका, मिस्टर आणि मिसेस अनंत अंबानी. मी तुमच्या डोळ्यांमध्ये एकमेकांसाठी आणि एकमेकांच्या कुटुंबांसाठी प्रेम आणि सन्मान पाहू शकतो. विश्वाने तुम्हाला एकत्र आणले आहे. तुम्हाला खूप-खूप शुभेच्छा. मी तुम्ही पालक झाल्यानंतर आनंदात डान्स करण्याची प्रतीक्षा करू शकत नाही."

ग्रँड फंक्शन आणि रिसेप्शन-

१२ जुलै रोजी ग्रँड फंक्शनमध्ये लग्नानंतर १३ जुलै रोजी शुभ आशीर्वाद आणि १४ जुलै रोजी ग्रँड रिसेप्शन आयोजित केले होते. अनंत राधिकाच्या आनंदात सहभागी होण्यासाठी किम आणि ख्लोए कार्दशियन सुद्धा भारतात आल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT