Sankarshan & Amruta Esakal
Premier

Viral Video : संकर्षण-अमृता करणार 'या' शोचं परीक्षण ; सोशल मीडियावर प्रोमो व्हायरल

Sankarshan & Amruta New Reality Show : संकर्षण कऱ्हाडे आणि अमृता खानविलकर नव्या रिअलिटी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जाणून घेऊया त्यांच्या नव्या कार्यक्रमाबद्दल.

सकाळ डिजिटल टीम

Drama Juniors : काही दिवसांपूर्वी संकर्षण आणि अमृताचं अपहरण झाल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पण हे अपहरण कोण आणि का केलं? ही नेमका कोणत्या शोचा प्रोमो आहे अशी चर्चा बराच काळ रंगली होती पण अखेर हे कोडं सुटलं होतं.

झी मराठी वाहिनीवर 'ड्रामा ज्युनिअर्स' हा नवा कार्यक्रम सुरु होत असून या कार्यक्रमाचे त्यांनी परीक्षक व्हावं म्हणून त्यांचं अपहरण करण्यात आल्याचा खुलासा या प्रोमोमधून करण्यात आला आहे.

शो च्या प्रोमोची होतोय चर्चा

'झी मराठी' च्या सोशल मीडियावर हॅन्डलवर नवा प्रोमो शेअर केला. प्रोमोमध्ये परीक्षकाच्या शोधात असलेली बच्चे कंपनी या दोघांचं अपहरण करते आणि वेगवेगळ्या गाजलेल्या पात्रांच्या रूपात परीक्षक होण्याची मागणी करते आणि त्यांनी श्रेया बुगडेचंही अपहरण केल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळालं आणि अखेर संकर्षण -अमृता बच्चेकंपनीचा हा प्रस्ताव मान्य करतात असं या प्रोमोमध्ये पाहायला मिळालं.

श्रेया बुगडे या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पडली. 'चला हवा येऊ द्या' नंतर बऱ्याच काळाने श्रेया पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

पहा प्रोमो

आता हा कार्यक्रम कधी सुरु होणार ? यात किती लहान मुलं सहभागी झाले आहेत ? कार्यक्रमाची रूपरेषा कशी असणार ? हे अजून चॅनेलने स्पष्ट केलं नाहीये. या कार्यक्रमामुळे कोणता कार्यक्रम प्रेक्षकांचा निरो घेणार याची चर्चाही सोशल मीडियावर रंगलीय.

संकर्षण-अमृताचे प्रोजेक्ट्स

संकर्षणचं सध्या रंगभूमीवर 'तू म्हणशील तसं','नियम व अटी लागू' ही दोन नाटक रंगभूमीवर सुरु आहेत. तर अमृता 'कलावती' ,'ललिता बाबर' ,'पठ्ठे बापूराव' या सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. अमृता बऱ्याच काळानंतर टेलिव्हिजनवर कमबॅक करणार आहे तर संकर्षणची टेलिव्हिजनवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका गाजली होती. या मालिकेतील श्रेयस-संकर्षणच्या मित्राच्या जोडीने सगळ्यांचं मन जिंकलं होतं. अजूनही या जोडीने एकत्र काम करावं अशी अनेकांची इच्छा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: श्रेयस अय्यरचे शतक, जिंकूनही पंजाब किंग्सची प्ले ऑफमधील जागा पक्की नाहीच... जाणून घ्या समीकरण

IPL 2026 KKR Playoff Scenario : कोलकाता नाइट रायडर्ससमोर अवघड गणित! पंजाबला नेट रन रेटमध्ये मागे टाकायचे असेल तर...

थायलंडला जाणं महागणार! भारतीयांसाठी Visa Free Entry रद्द; नवीन नियम लागू, आता प्रवेश कसा मिळणार?

Arjun Tendulkar: अर्जुनसोबत चुकीची वागणुक, त्यात रिषभ पंतने 'पारा' चढवला... सचिनचा मुलगा संतापला; नेमकं काय घडलं?

Monsoon Progress Update : मॉन्सूनची प्रगती हवामान विभागाचा दुजोरा, काही तासात केरळात दाखल; अरबी समुद्राचा भाग व्यापला

SCROLL FOR NEXT