Savaniee With Daughter Esakal
Premier

Video : “आई मला ढग उघडून देवाला हाय करायचंय ” ; लेकीच्या क्युट मागणीमुळे सावनी झाली चकीत

Savaniee Ravindra Daughter's Cute Video : गायिका सावनी रवींद्रची लेक शार्वीने केलेल्या क्युट मागणीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

सकाळ डिजिटल टीम

Savaniee Ravindra's Daughter : राष्ट्रीय पुरस्कार विजेती मराठी गायिका सावनी रवींद्र सोशल मीडियावर सुद्धा खूप अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर ती बर्‍याचदा तिच्या गाण्यांचे आणि तिची लेक शार्वीचे क्युट व्हिडिओज शेअर करत असते. सावनीने नुकताच शार्वीचा एकक्युट व्हिडिओ शेअर केला आणि यावेळी तिने केलेल्या निरागस मागणीमुळे सावनीसकट नेटकर्‍यांनाही शार्वीचं कौतुक वाटलं

सावनीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं की, शार्वी बाल्कनीतून बाहेरचं दृश्य बघतेय आणि ती आईला म्हणते कि, "आई माझा एक मुद्दा आहे." ते ऐकून सावनीला हसू अनावर झालं. मग ती म्हणाली की, "सगळ्या देवांना आकाशात का ठेवलय?" त्यावर सावनीने तिला सांगितलं की, "त्यांना ठेवलं नाहीये ते तिथे राहतात." त्यावर शार्वीने म्हणाली की, "मला ढग उघडून देवबाप्पाला हाय करायचंय." तेव्हा सावनीला हसू आल तिने शार्विला सांगितलं की, "देवबाप्पा आपल्या मनात राहतात. सगळ्या लहान मुलांमध्ये देव असतो."

सावनी आणि शार्वीचा हा संवाद सोशल मीडियावर चर्चेत असून अनेकांनी कमेंट करत शार्वीच्या निरागसतेचं कौतुक केलं.

पहा व्हिडीओ

फॅन्सच्या कमेंट्स

या व्हिडिओवर सावनीच्या चाहत्यांनी कमेंट्स करत शार्वीच्या निरागसतेचं कौतुक केल. “Wow.. किती cute आहे पिल्लू. मला ढग उघडून त्यांना hi करायचंय..” अशी कमेंट एकाने केली तर अनेकांनी त्यांना जमेल तशी शार्वीच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला.

सावनीची गाणी

सावनीने आजवर अनेक मराठी गाणी गायली आहेत. 'बाईपण भारी देवा' मधील शेवटचं तिच मंगळागौरीचं गाणं असो किंवा 'बार्डो' सिनेमातील 'रान पेटलं' तिच्या गाण्यांच खूप कौतुक झालं आहे. बार्डो सिनेमात गायलेल्या गाण्यासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तर अनेक अल्बम्ससाठीही तिने गाणी गायली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT