Shah Rukh Khan esakal
Premier

Shah Rukh Khan: केकेआर मॅच हरल्यानंतर किंग खानच्या डोळ्यात पाणी; शाहरुखचे फोटो पाहून चाहते म्हणतात, "पाहवत नाही"

Shah Rukh Khan: शाहरुख त्याच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये आला होता. यावेळी टीम हरल्यामुळे शाहरुख इमोशनल झाला.

priyanka kulkarni

Shah Rukh Khan: सध्या आयपीएलची (IPL 2024) क्रेझ देशभरात बघायला मिळत आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानची (Shah Rukh Khan) आयपीएल टीम कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात काल मॅच झाली. या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्स ही टीम जिंकली. त्यामुळे केकेआर टीमचे चाहते नाराज झाले. शाहरुख त्याच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये आला होता. यावेळी टीम हरल्यामुळे शाहरुख इमोशनल झाला.

किंग खान झाला इमोशनल

केकेआरच्या पराभवानंतर शाहरुख खानचे स्टेडियममधील अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामधील एका फोटोत किंग खानच्या डोळ्यात अश्रू दिसले. शाहरुखला इमोशन झालेलं पाहून चाहते नाराज झाले. एका नेटकऱ्यानं शाहरुखचा स्टेडियममधील फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "तू निराश झालेला पाहवत नाही"

मॅचदरम्यान शाहरुख त्याच्या टीमला चेअर करत होता. तसेच मॅच सुरु असताना शाहरुखच्या डॉन या चित्रपटातील गाणं लावण्यात आलं होतं. या गाण्यावर शाहरुख थिरकला देखील.

पाहा व्हिडीओ:

मॅच संपल्यानंतर शाहरुख खान विजेत्या टीमचे अभिनंदन करण्यासाठी मैदानात उतरला. यावेळी त्यानं त्याच्या केकेआर या संघातील खेळाडूंना प्रोत्साहन दिले. "सर्वजण खूप चांगले खेळले आहेत, कृपया वाईट वाटून घेऊ नका", असं ड्रेसिंग रुममध्ये शाहरुखनं सर्व केकेआरच्या खेळाडूंना सांगितलं.

शाहरुखचे चित्रपट

2023 हे वर्ष शाहरुखसाठी खास ठरलं. गेल्या वर्षी रिलीज झालेले त्याचे पठाण, जवान आणि डंकी हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. शाहरुख हा लवकरच किंग या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, असं म्हटलं जात आहे. या चित्रपटात त्याची मुलगी सुहाना खान देखील काम करणार आहे. आता शाहरुखच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Expressway Toll System : आता ‘एक्स्प्रेसवे’वर टोल भरण्यासाठी गाडी थांबवून वाट पाहण्याची गरज नसणार!

Ichalkaranji Election : इचलकरंजी महापालिका निवडणुकीत उमेदवारीचा तिढा कायम; भाजप-महाविकास आघाडीत इच्छुकांची धावपळ आणि राजकीय अस्वस्थता वाढली

Jalgaon Municipal Election : आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर कडक नियम; उमेदवारांना खर्च मर्यादेचा इशारा

BMC Election: आचारसंहितेवरून तंबी भंग केल्यास ४ तासांत कारवाई, महापालिकेचा इशारा

Chenpi : संत्र्याची साल विकून लोक बनतायत लखपती; 1 किलोची किंमत वाचून व्हाल शॉक, तुम्ही कसा करू हा शकता बिझनेस? पाहा

SCROLL FOR NEXT