Shehzada Dhami Esakal
Premier

Shehzada Dhami : सेटवर सगळ्यांसमोर बेइज्जती केली, अवॉर्ड फंक्शनमधून हाकललं ; शहजादाचे 'ये रिश्ता...'च्या निर्मात्यांवर आरोप

Shehzada Dhami denied all allegations about him : अभिनेता शहजादा धामीने त्याच्यावर निर्माता राजन शाहींनी लावलेले आरोप नाकारले असून 'त्यांनी मला काम मिळून नये' असा प्रयत्न केल्याचा आरोप केलाय.

सकाळ डिजिटल टीम

Shehzada Dhami on YRKKH : हिंदी टेलिव्हिजनवरील सगळ्यात जास्त गाजलेली मालिका म्हणजे 'ये रिश्ता क्या कहलाता है'. या मालिकेचे अनेक सीजन गेल्या काही वर्षात प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. मध्यंतरी या मालिकेच्या सेटवर झालेला वाद बराच काळ चर्चेत होता.

या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारे कलाकार शहजादा धामी आणि प्रतीक्षा होनमुखे यांना तडकाफडकी मालिकेतून काढण्यातून आलं आणि त्यांच्यावर अनप्रोफेशन असल्याचा ठपका ठेवण्यात आला. या घटनेनंतर बऱ्याच काळानंतर शाहजादा धामीने एका मुलाखतीत त्याची बाजू मांडली आहे आणि निर्माते राजन शाही त्याला काम मिळू देत नसल्याचा आरोप केला आहे.

काय म्हणाला शहजादा ?

नुकतीच शहजादाने सिद्धार्थ कननच्या युट्युब चॅनेलच्या शोमध्ये हजेरी लावली. यावेळी सिद्धार्थने त्याला मालिकेतून का काढून टाकलं असा प्रश्न विचारला. त्यावर शहजादाने बऱ्याच गोष्टींबाबत खुलासा केला आणि निर्मात्यांनी त्याच्यावर केलेल्या बऱ्याच आरोपांचं खंडन केलं. महाबळेश्वर मध्ये झालेल्या वादाबद्दल तो म्हणाला कि, "आमचा पहिला सीन खूप चांगला शूट झाला त्यानंतरच्या सीनला मला हातात कडे घालायचे होते. मी वकिलाची भूमिका साकारत होतो त्यामुळे मला सांगण्यात आलं कि एकाच सीनमध्ये घालायचे आहेत मग काढून टाक. सीन पूर्ण झाला आणि नंतर मी कडे हातातून काढत असताना मालिकेचा दिग्दर्शक तिथे आला आणि मला ओरडू लागला कि माझी हिंमत कशी झाली कडे हातातून काढून टाकण्याची जेव्हा कि माहित आहे कि पुढे त्यावरील सीन आहे. मी त्याच वागणं बघून घाबरलो आणि काही बोललो नाही. त्यानंतरही काही गोष्टी घडल्या आणि मग राजन सर तिथे आले त्यांनी संपूर्ण टीमला एकत्र बोलवलं आणि आम्ही कसं वागलं पाहिजे यावर ते बोलले. त्यानंतर रात्री दिग्दर्शक मी जेवत असताना माझ्याजवळ आला. तो थोडा दारूच्या नशेत होता. त्याने मला सांगितलं कि, राजन सर आले तेव्हा मी त्यांना भेटलो नाही, त्यांच्या पाया पडलो नाही हे मी खूप चुकीचं वागलो. तेव्हा मी त्याला म्हंटलं कि पुढे असं माझ्याकडून होणार नाही. त्याने मला सांगितलं कि यापुढे त्याला मी सर म्हंटलं पाहिजे. मी तेही मान्य केलं. पण जस मी सर म्हणायला सुरुवात केली तसं तो माझ्यावर अरेरावी करायला लागला. याने मी खूप दुःखी झालो."

अफवा आणि मालिकेतून काढले तो दिवस

हे सगळं सांगताना शहजादा पुढे म्हणाला कि,"दिग्दर्शकाकडूनच सेटवर सांगण्यात आलं होत कि मला नावाने हाक मारायची नाही त्यामुळे मला डिपार्टमेंटची माणसं कोणत्याही नावाने हाक मारायचे. जेव्हा मी गोष्ट बोललो तेव्हा सगळेजण मला 'भाई' म्हणून हाक मारायला लागले पण दिग्दर्शक कधीच माझ्याशी नीट बोलला नाही. एकदा माझा एक सीन सुरु होता आणि माझ्यासमोर जी अभिनेत्री होती तिला फिंगर्स क्रॉस करायला सांगण्यात आलं होतं. सीन व्यवस्थित झाला आणि तिने फिंगर्स क्रॉस केले होते पण दिग्दर्शक त्यावरून तिच्यावर खूप ओरडला आणि आरोप केला कि तिने ते केलंच नव्हतं. त्यामुळे तिला खूप वाईट वाटलं त्यानंतर तिने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हाही तो तिच्यावर ओरडला. मी जेव्हा तिची बाजू घेऊन बोललो तेव्हा माझ्यावरही आरडाओरडा झाला आणि इथूनच गोष्टी बिघडल्या."

पुढे तो म्हणाला कि,"एके दिवशी मला सांगण्यात आलं कि इमर्जन्सी मिटिंग बोलावली आहे सेटवर लवकर ये. मी गेलो तेव्हा स्पॉटबॉय पासून सगळी टीम सेटवर मीटिंगला हजर होती. त्या मिटिंगमध्ये खूप काही बोलण्यात आलं. माझ्या संस्कारांवर, माझ्या आई-बाबांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आणि नंतर मला तिथून जायला सांगण्यात आलं. मी माझं एकही सामान घेतलं नाही मी तसाच घरी निघून गेलो. जर ते प्रोफेशनल असते तर त्यांनी मला योग्य पद्धतीने टर्मिनेट केलं असतं आणि काढून टाकलं अस्त पण मला संपूर्ण युनिटसमोर बेईज्जत केलं नसतं."

अवॉर्ड फंक्शनमधून हाकललं

"एका अवॉर्ड फंक्शनला मी हजेरी लावली होती. त्यावेळी माझ्या त्या मालिकेतील काही कलाकार तिथे आले. ते मला भेटले आम्ही छान बोललो. त्यानंतर राजन शाही तिथे आले आणि ते आल्यावर मला शोच्या आयोजकांनी मागे जाऊन बसायला सांगितलं. मी माझी जागा सोडली आणि मागे जाऊन बसलो. नंतर थोड्यावेळाने सांगितलं कि, तू बॅकस्टेजला ये. तेव्हा माझ्या लक्षात आलं त्यांना मी नकोय तेव्हा मी उठलो आणि घरी निघून गेलो. इतकंच नाही तर राजन यांनी त्यांच्या निर्मात्यांच्या ग्रुपवर मला मालिकांमध्ये घेऊ नका असा मेसेजही टाकल्याचं मी ऐकलं आहे. जी गोष्ट बोलून सोडवली गेली असती त्यासाठी त्यांनी इतकं सगळं का केलं हे मला अजून समजलं नाहीये." असा खुलासा शहजादाने केला.

शहजादाच्या या मुलाखतीवर राजन शाही आता काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. मध्यंतरी हिना खाननेही राजन शाही यांची कलाकारांबाबतीतील वागणूक योग्य नसल्याचा आरोप केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs SA : नुसता धुरळा... Phil Salt चे वेगवान T20I शतक अन् जॉस बटलरच्या १५ चेंडूंत ७४ धावा; इंग्लंडचा रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर, मोडला भारताचा विश्वविक्रम

Elphinstone Bridge : मुंबईतील एलफिस्टन पुलावर अखेर हातोडा

Pune ZP : राज्यामध्ये ३४ ठिकाणी अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर; पुणे ‘झेडपी’साठी खुला प्रवर्ग, सतरा ठिकाणी महिलांसाठी आरक्षण

Karnataka accident during Ganesh Visarjan: कर्नाटकात भीषण दुर्घटना! गणेश विसर्जन मिरवणुकीत भरधाव ट्रक घुसला; आठ जणांचा मृत्यू

Rafale fighter jets India: आता शत्रूच्या उरात धडकी भरवणाऱ्या 'राफेल' लढाऊ विमानांची भारतात निर्मिती होणार!

SCROLL FOR NEXT