Shreyas Talpade

 

esakal

Premier

Shreyas Talpade FIR : राजपाल यादवनंतर आता अभिनेता श्रेयस तळपदे अडचणीत ; ‘या’ प्रकरणी दाखल झाला ‘FIR’!

Shreyas Talpade in trouble : श्रेयस तळपदे आणि इतर १२ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे, जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण?

Mayur Ratnaparkhe

FIR Against Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदे  बद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील मणिपूर जिल्ह्यात श्रेयस तळपदे आणि इतर १२ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या सर्वांवर गुंतवणूकीशी संबंधित घोटाळा केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मंगळवारी भोगांव पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, मोहल्ला मिश्रान येथील एका रहिवाशाने अभिनेता श्रेयस तळपदे आणि त्याच्या सहकाऱ्यांवर गुंतवणुकीच्या नावाखाली ग्रामस्थांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

 तक्रारीत म्हटले आहे की, श्रेयस तळपदेने त्याच्या सहकाऱ्यांसह मोहल्ला मिश्रान येथील मुंबई बँकेच्या शाखेत गुंतवणूक योजनेच्या नावाखाली ग्रामस्थांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तथापि, या आरोपांबाबत श्रेयस तळपदेकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. श्रेयस तळपदेबद्दल केवळ अभिनेताच नाही तर दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. बॉलिवूड व्यतिरिक्त, त्याने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT