Shweta Chaudhary talks about Divorce Esakal
Premier

Shweta Tiwari : म्हणून, श्वेताला राजा चौधरीपासून घटस्फोट घ्यायला लागली ९ वर्षं ; "मला माझ्या मुलीची..."

Shweta Chaudhary talked about divorce with Raja Chaudhary : अभिनेत्री श्वेता चौधरीने तिच्या पहिल्या घटस्फोटाविषयी एका मुलाखतीमध्ये खुलासा केला.

सकाळ डिजिटल टीम

Shweta Tiwari Interview : हिंदी टेलिव्हिजनवरील प्रथितयश अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या प्रोफेशनल आयुष्याबरोबरच पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत राहिली आहे. नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या पहिल्या घटस्फोटाबाबत भाष्य केलं. तिला तिचा पहिला पती राजा चौधरीपासून घटस्फोट घ्यायला नऊ वर्षं का लागली याची कारणं तिने यावेळी तिने सांगितली.

गॅलाटा इंडियाला दिलेल्या मुलाखतीत श्वेता म्हणाली कि,"माझ्या मुलीला मोठे होत असताना वडील नसल्याची मला काळजी वाटत होती. नंतर मला समजले की, तुम्ही मानसिकदृष्ट्या आनंदी असाल तेव्हाच तुमचं आनंदी कुटुंब होऊ शकेल. तुमच्या मुलाचे संगोपन करणे चांगले नाही. एखाद्या कुटूंबात जर दोन लोक एकत्र राहू शकत नाहीत, तर त्यातून वेगळं होणं चांगलं आहे."

तिने तिच्या पूर्वायुष्याबद्दल बोलताना दावा केला कि, राजा चौधरी तिला नेहमी मारहाण करत असे. तिने असंही उघड केलं की राजा तिच्या मालिकेच्या सेटवर गोंधळ घालत असे. पण हा सगळं त्रास होऊनही ती राजाला घटस्फोट द्यायला तयार नव्हती.

तिने तिचं लग्न वाचवण्याचा प्रयत्न का केला याविषयी सांगताना ती म्हणाली कि,"माझ्या संपूर्ण कुटुंबात कोणीही प्रेमविवाह केला नव्हता, मी केला होता. आमच्या कुटुंबात या गोष्टीला विरोध होता तरीही मी त्यांच्या विरोधात जाऊन हे लग्न केलं होतं. आणि मला माझ्या लग्नाबद्दल टोमणे मारायला सुरुवात झाली होती. मी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नव्हते असं नाही पण ती एक भावनिक गोष्ट होती."

१९९८ मध्ये राजा चौधरी आणि श्वेता तिवारीने लग्न केलं. त्या दोघांना पलक तिवारी नावाची मुलगी आहे. त्या दोघांनी नच बलिये या रिऍलिटी शोमध्येही भाग घेतला होता. पण त्यानंतर २००७ मध्ये श्वेताने राजा चौधरी विरोधात घरगुती हिंसाचार आणि मद्यपान करण्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करत घटस्फोटाची मागणी केली. त्यांचा घटस्फोट झाल्यानंतर ते बराच काळ एकमेकांच्या संपर्कात नव्हते.

त्यानंतर २०१३ मध्ये श्वेता अभिनव कोहलीशी लग्नगाठ बांधली. त्यांना रेयांश कोहली नावाचा मुलगा आहे पण त्याच्यापासूनही श्वेताने घटस्फोट घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 विश्वचषक 2026 प्रसारणावरून गोंधळ; ICCचा मोठा खुलासा, JioStar करार मोडल्याच्या अफवा फेटाळल्या

UPSC Exam: ‘यूपीएससी’चा मोठा निर्णय! 'या' उमेदवारांना मिळणार सोयीनुसार परीक्षा केंद्र

Pune Marathon : मॅरेथॉन दिवशी विद्यापीठात वाहनबंधी; धावपटूंसाठी विशेष शटल बस व पार्किंगची स्वतंत्र सोय!

Santosh Deshmukh Case: मारहाणीचे २३ व्हिडीओ अन् संतोष देशमुखांच्या पत्नी कोर्टाबाहेर धावल्या; वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी

Hadapsar Accident : पुणे–सोलापूर महामार्गावर भरधाव वाहनाची धडक; दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन बळी

SCROLL FOR NEXT