Singer Suchitra made shocking revelation about Karan and Shahrukh  Esakal
Premier

Shahrukh Khan & Karan Johar : "शाहरुख आणि करण आहेत गे ?" दाक्षिणात्य गायिकेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ

Singer Suchitra made shocking revelation about Shahrukh and Karan Johar : दाक्षिणात्य गायिका सुचित्राने शाहरुख आणि करण जोहर गे असल्याचा दावा एका मुलाखतीत केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

दाक्षिणात्य गायिका सुचित्रा रामदुराई जी सुचित्रा या नावाने प्रसिद्ध आहे ती कायमच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. संगीत क्षेत्रातील सहकलाकारांबाबत तिने अनेकदा खळबळजनक खुलासे केले आहेत.

नुकताच तिचा आणि अभिनेता कार्तिक कुमारचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिने केलेल्या खळबळजनक विधानांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तिचा पुर्वश्रमीचा पती कार्तिक, शाहरुख खान आणि करण जोहर हे गे असल्याचा दावा तिने एका मुलाखतीत केला.

शाहरुख आणि करणसोबत कार्तिकचा 'गे एनकाऊंटर' झाल्याचा दावा

नुकतंच सुचित्राने तामिळ चॅनेल कुमदूम मीडियाला मुलाखत दिली. यावेळी तिने बॉलिवूड निर्माता करण जोहर आणि सुपरस्टार शाहरुख खान यांच्यासंबंधी काही धक्कादायक खुलासे केले. नवऱ्यावर आरोप करत असतानाच सुचित्राने बॉलिवूड सेलिब्रिटीजवर सुद्धा यावेळी आरोप केले. सुचित्राने आरोप करताना म्हंटलं कि बॉलिवूड सेलिब्रिटीजमध्येही समलैंगिक संबंध असतात. तिने तिचा तिचा नवरा कार्तिककुमार गे असल्याच्या दावा केला होता आणि यावर तिने असाही आरोप केला कि, लंडनमध्ये शाहरुख आणि करणसोबत कार्तिकचे संबंध आले होते. ती असं म्हणाली कि, बॉलिवूडचे अनेक कलाकार अशा देशांमध्ये सतत प्रवास करतात जिथे समलैंगिक संबंधांना मान्यता आहे.

मुलाखतीची क्लिप झाली व्हायरल

सुचित्राची ही क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये ती असा खुलासा करताना दिसतेय कि,"एकदा जेव्हा कार्तिक लंडनमध्ये होते तेव्हा ते शाहरुख आणि करणला भेटले आणि ते लंडनमधील एका बारच्या गल्लीत फिरत होते. ते सगळे क्रॉस्ड ड्रेस होते. करण आणि शाहरुख बऱ्याचदा परदेशात गेल्यावर असे वावरतात. ते असे कपडे घालून गे एरियात जातात आणि तिकडच्या परिसरात मिसळतात आणि रात्रीचा आनंद घेतात."

कार्तिकने दिलं स्पष्टीकरण म्हणाला...

सुचित्राच्या या मुलाखतीची क्लिप व्हायरल झाल्यानंतर कार्तिकने या व्हिडिओवर स्पष्टीकरण दिलंय. तो म्हणाला," जर मी समलैंगिक असेन तर मी ते आनंदाने स्वीकारेन आणि मला सगळ्या प्रकारच्या लैंगिक संबंधांचा अभिमान आहे. त्यात शरमेची गोष्ट काहीच नाहीये."

कोण आहे कार्तिक कुमार आणि सुचित्रा?

कार्तिक कुमार हा अभिनेता आणि स्टॅन्ड अप कॉमेडियन असून सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. तर त्याची पुर्वश्रमीची पत्नी सुचित्रा ही साऊथ इंडस्ट्रीमधील गायिका आहे. त्या दोघांचं 2005 मध्ये लग्न झालं आणि 2017 साली या जोडीने घटस्फोट घेतला. या आधीही तिने केलेली वादग्रस्त विधान चर्चेत राहिली होती.

Elephant Mahadevi Padayatra : 'महादेवी'साठी हजारो कोल्हापूरकर एकवटले, नेत्यांचा कितपत प्रतिसाद; फलकांनी वेधले लक्ष

Vasai Virar ED Raid : वसई विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार आणि पत्नीला ईडीचे समन्स, ४ ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

Top Asian Student Cities: आशियामधील टॉप शिक्षण शहरे कोणती? पाहा संपूर्ण यादी!

Daibetes Management: मधुमेहाचे व्यवस्थापन करताना हृदय सुध्दा ठेवा निरोगी, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेले प्रभावी उपाय

अमृता सुभाष आणि अनिता दातेचा गाजलेला जारण सिनेमा होणार 'या' दिवशी ओटीटीवर रिलीज

SCROLL FOR NEXT