Rahul Gandhi _ Devendra Fadnavis 
Premier

Swatantraveer Savarkar: "राहुल गांधींनी फक्त हो म्हणावं, मी संपूर्ण..."; फडणवीसांनी केलं महत्वाचं आवाहन

सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळं सर्वच पक्षांचे नेते प्राचारांमध्ये जागा वाटपांमध्ये व्यस्त आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची ऱणधुमाळी सुरु आहे. त्यामुळं सर्वच पक्षांचे नेते प्राचारांमध्ये जागा वाटपांमध्ये व्यस्त आहेत. त्यातच काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाचं आवाहन केलं आहे. राहुल गांधींनी फक्त हो म्हणावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. (Swatantraveer Savarkar Movie Devendra Fadnavis made an important appeal to Rahul Gandhi)

राहुल गांधी आणि देवेंद्र फडणवीस हे खरंतर एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक. पण मग फडणवीसांनी त्यांना असं कुठलं आवाहन केलंय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर फडणवीसांनी राहुल गांधींना नुकताच प्रदर्शित झालेला रणदीप हुड्डा दिग्दर्शित आणि अभिनीत स्वातंत्र्यवीर सावरकर हा सिनेमा पाहण्यासाठी फक्त हो म्हणावं, मी त्यांच्यासाठी माझ्या पैशानं संपूर्ण थिएटर बुक करतो, असं आवाहन केलं आहे. (Marathi Tajya Batmya)

मुंबईत शनिवारी स्वातंत्र्यवीर सावकर हा सिनेमा यातील प्रमुख कलाकारांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहिला. यानंतर थिएटरबाहेर त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रतिक्रियेसाठी घेरलं आणि राहुल गांधींनी सावकरांवर केलेल्या टीकेच्या अनुषंगानं प्रश्न विचारला. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, राहुल गांधींनी कधीही सावरकर वाचलेले नाहीत किंवा त्यांना समजून घेतलेलं नाही. त्यामुळं ते अशा प्रकारची बिनबुडाच्या गोष्टी सावरकरांबाबत करत असतात. (Latest Marathi News)

त्यामुळं मी निश्चितपणे त्यांना आवाहन करतो की राहुल गांधींनी सावरकर हा सिनेमा पाहावा जर त्यांची इच्छा असेल तर मी स्वतः माझ्या खर्चानं संपूर्ण थिएटर बुक करेन त्यानंतर हा सिनेमा पाहिल्यानंतर ज्याप्रकारे गोष्टी सावरकरांबाबत करत आहेत, ते बोलणं बंद करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Cyclone Alert After Motha: मोंथा नंतर नवीन चक्रीवादळाचा इशारा! हवामान परिस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्ह

Sunny Fulmali : झोपडीतून सुवर्णशिखराकडे! लोहगावचा सनी फुलमाळी ठरला खऱ्या अर्थाने ‘गोल्डन बॉय’

Navneet Rana Hospitalized : माजी खासदार नवनीत राणा रूग्णालयात दाखल; २५ दिवस 'बेडरेस्ट' असणार!

Raju Shetty: ''उद्यापासून एकही साखर कारखाना चालवू देणार नाही'' प्रशासनासोबतची शेट्टींची बैठक निष्फळ

PM Modi Meet Indian Women Cricket Team : विश्वविजयी महिला क्रिकेट संघासोबत पंतप्रधान मोदी करणार 'ब्रेकफास्ट'? , भेटीची तारीख ठरली!

SCROLL FOR NEXT