Aamna Sharif and Rajiv Khandelwal Esakal
Premier

Aamna Sharif : 'राजीव आणि आमना रिलेशनशिपमध्ये...' ; टेलिव्हिजन गाजवणाऱ्या कशिश-सुजलच्या कथित लव्हस्टोरीवर अभिनेत्याने केलं भाष्य

Tv actor opens up about Aamna & Rajiv relationship rumors : अभिनेत्री आमना शरीफ आणि अभिनेता राजीव खंडेलवाल यांच्या रिलेशनशिपबाबत त्यांच्या सहकलाकाराने महत्त्वाचा खुलासा केला.

सकाळ डिजिटल टीम

Aamna Sharif & Rajiv Khandelwal : २००० च्या दशकात टेलिव्हिजनवर आलेल्या अनेक मालिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकांमधील काही जोड्या अजूनही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. यातीलच एक टेलिव्हिजनवर गाजलेली रील लाईफ जोडी म्हणजे सुजल आणि कशिश. एकता कपूरच्या 'कही तो होगा' या मलिकेतील या सुपरहिट जोडीचे आजही अनेकजण फॅन आहेत. राजीव खंडेलवाल याने सुजल आणि आमना शरीफ हिने कशिश ही भूमिका या मालिकेत साकारली होती. आज १६ जुलैला आमनाचा वाढदिवस आहे.

२००३ मध्ये ही मालिका स्टार प्लस या चॅनेलवर सुरु झाली. सुजल आणि कशिशची मालिकेतील लव्हस्टोरी सगळ्यांनाच आवडत होती आणि या दोघांनी खऱ्या आयुष्यातही एकत्र यावं अशी अनेक चाहत्यांची इच्छा होती. हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा त्या काळी रंगल्या होत्या ,मात्र त्याबाबत कोणतीही निश्चित माहिती त्यावेळी समजू शकली नव्हती. काही काळाने राजीवने ही मालिका सोडली आणि त्यानंतर गुरप्रीत सिंहने या मालिकेत सुजलची भूमिका साकारली.

नुकतंच टाईम्स नाऊच्या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये गुरप्रीतने आमना आणि राजीवच्या रिलेशनशिपबाबतच्या चर्चांवर भाष्य केलं. तो म्हणाला,"खरंतर ही त्यांची वैयक्तिक गोष्ट आहे. मी याबाबत बऱ्याच उडत्या खबरी ऐकल्या आहेत पण कुणीच कधी स्पष्ट याविषयी बोललं नाही कि ते दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत. हो पण मला याची जाणीव होती कि त्यांचं एकमेकांशी चांगलं नातं आहे. "

तर आमना आणि त्याच्यातील प्रोफेशनल नात्याविषयी तो म्हणाला कि,"पहिल्यापासूनच आमना खूप स्पष्टवक्ती होती आणि ती तिच्या कामाशी काम ठेवायची. मलाही वाटलं या सेटवर असंच काम होत असावं त्यामुळे मी सुद्धा तसाच वागू लागलो."

आमना आणि राजीवची या मालिकेतील जोडी खूप गाजली पण त्यानंतर या दोघांनी कधीच एकत्र काम केलं नाही. आमनाने अमित कपूरबरोबर लग्न केलं असून तिला एक मुलगा आहे. २०२२ मध्ये तिची आधा इष्क ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. तर कसौटी जिंदगी कि मालिकेत तिने कोमोलिका ही निगेटिव्ह भूमिका साकारली होती. या भूमिकेने सगळ्यांचंच मन जिंकलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India suspends postal service to US: भारताने घेतला मोठा निर्णय! आता अमेरिकेसाठी ‘पोस्टल सर्विस’ बंद

National Space Day : भारताची भविष्यातली अंतराळ झेप कशी असेल? इस्रोच्या महत्वाकांक्षी मोहिमांची A टू Z माहिती, वाचा एका क्लिकवर

Latest Marathi News Updates : मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या तयारीसाठी आज जालन्यात मराठा समाजाची महत्वाची बैठक

BEST Bus: गणेशोत्सवासाठी बेस्टची मोठी घोषणा, रात्री चालणार विशेष गाड्या; कधी आणि कुठे? जाणून घ्या

ODI World Cup 2027 साठी ठिकाणं ठरली! 'या' शहरांमध्ये खेळवले जाणार सामने

SCROLL FOR NEXT