Premier

Coldplay मध्ये नेमके कोण-कोण आहेत? त्यांची इतकी क्रेझ का? 'ही' आहेत त्यांची सर्वाधिक गाजलेली गाणी

What Is Coldplay : सध्या सोशल मीडियावर सर्वत्र 'कोल्डप्ले'ची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात 'कोल्डप्ले'चे चाहते दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहेत.

रोहित कणसे

Entertainment News Updates in Marathi: सध्या सोशल मीडियावर सर्वत्र 'कोल्डप्ले'ची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात 'कोल्डप्ले'चे चाहते दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहेत. त्यांच्या मुंबई कॉन्सर्टची तिकीटे मिळवण्यासाठी लोक तासंतास वाट पाहताना दिसून आले. इतकेच नाही तर ऑनलाइन तिकीट बुकिंगसाठी लोकांच्या उड्या पडल्याचे पाहायला मिळाले.

'म्यूझीक ऑफ द स्फीयर्स' या वर्ल्ड टूरसाठी 'कोल्डप्ले' जानेवारी 2025 मध्ये मुंबईत तीन शो करणार आहे. ज्याचे तिकीट मिळवण्यासाठी चाहत्यांची धावपळ सुरू आहे.

कोल्डप्ले हा एक ग्रॅमी अवॉर्ड विजेचा ब्रिटीश रॉक बँड आहे. भारतात या बँडच्या तिकीटांची मागणी इतकी जास्त होती की १८ आणि १९ जानेवारीसोबतच आता २१ जानेवारी रोजी तिसरा शो देखील वाढवण्यात आला आला आहे. तिसरा शो घोषित केल्यानंतर देखील कोल्डप्लेच्या हजारो चाहत्यांना त्यांच्या शोची तिकीटे मिळू शकलेले नाहीयेत. तिकीटाची विक्री केली जात असलेला एकमेव अधिकृत प्लॅटफॉर्म बुक माय शोवर कोल्डप्लेचे सर्व तिकीटे विकले गेले आहेत. इतकेच नाही तर अनेक री-सेलिंग प्लॅटफॉर्मवर देखील तिकीटांची विक्री होत असून ते जास्तीच्या किमतीत विकले जात आहेत.

नेमकं कोल्डप्ले काय आहे?

कोल्डप्ले एक ब्रिटिश रॉक बँड आहे. या बँडची स्थापना १९९७ मध्ये करण्यात आली होती. यामध्ये पाच सदस्यांचा समावेश आहे ज्यामध्ये गायक आणि पियानोवादक क्रिस मार्टिन, गिटारवादक जॉनी बकलँड. बासिस्ट गाय बेरीमॅन, ड्रमर आणि पर्क्युसिनिस्ट विल चॅम्पियन आणि मॅनेजर फिल हार्वे यांचा समावेश आहे. यापैकी चौघे स्टेजवर परफॉर्म करताना पाहायला मिळतात.

या बँडचे जगभरात चाहते आहेत आणि यांच्या कुठल्याही कॉन्सर्टला तुफान गर्दी होते. यांचा परफॉर्मन्स इतर रॉक बँडपेक्षा खूप वेगळा असतो. जगातील सध्याचा सर्वात प्रभावशाली आणि यशस्वी बँड म्हणून कोल्डप्लेची ओळख आहे. मनाला साद घालणाऱ्या संगिताचे जगभरात चाहते आहेत.

विषेश म्हणजे या रॉक बँडची सुरूवात कॉलेजच्या दिवसात सुरू केली होती आणि या बँडला यांच्या गाण्यांमुळे इतर अनेक पुरस्कारांसह संगीत श्रेत्रात मानाचा मानला जाणारा ग्रॅमी अवॉर्ड देखील त्यांना मिळाला आहे. युट्यूबवर यांच्या गाण्यांना कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत.

सर्वात प्रसिद्ध 10 गाणी कुठली आहेत?

1) फिक्स यू (Fix You) - कोल्डप्ले बँडचे सर्वात प्रसिद्ध गाणे कोणते असे म्हटले तर सर्वांचे उत्तर फिक्स यू हेच असेल. या गाण्याचे जगभरात चाहते आहेत. या गाण्याच्या ऑफिशीयल व्हिडीओला यूट्यूबवर ६५० मिलीयन व्ह्यूज आहेत. युट्यूबवर हे गाणे १३ वर्षांपूर्वी अपलोड करण्यात आले होते.

2) क्लॉक्स (Clocks)

3) व्हिवा ला व्हिडा (Viva La Vida)

4) ट्रबल (Trouble)

5) येलो (Yellow)

6) मॅजिक (Magic)

7) द साइंटीस्ट (The Scientist)

8) पॅराडाईज (Paradise)

9) स्पीड ऑफ साऊंड (Speed of Sound)

10) इन माय प्लेस (In My Place)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Western Railway: पश्चिम रेल्वेकडून गुडन्यूज! दिवाळी-छठपूजेसाठी विशेष गाड्यांची घोषणा; पाहा वेळापत्रक

PMC Bonus Scam : सुरक्षा रक्षकांना ना बोनस ना वेतन, ऐन दिवाळीत कर्मचारी हवालदिल; ठेकेदार महापालिकेला देईना दाद

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये कोणाच्याही प्रवासावर कोणतेही बंधन नाही - राम कदम

Dhaka Airport Fire Video : ढाका आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण आग ; सर्व विमानांचे लँडिंग अन् टेकऑफ तातडीने थांबवले गेले!

New Year Horoscope Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी ! 2026 मध्ये 'या' 5 राशी होणार मालामाल

SCROLL FOR NEXT