anant and radhika wedding  sakal
Premier

Justin Bieber: राधिका-अनंतच्या संगीत सोहळ्यासाठी आलेल्या जस्टिन बिबरने मुंबईत उतरताच सगळ्यात आधी केली 'ही' गोष्ट

Justin Bieber At Radhika Merchant Anant Ambani Wedding: भारतात आलेल्या जस्टिन बिबरची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

Payal Naik

सध्या सगळीकडे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. ही जोडी १२ जुलै रोजी लग्नगाठ बांधणार आहेत. या लग्नाला अनेक बड्या व्यवसायिकांसह काही बॉलिवूड कलाकारांना देखील आमंत्रित करण्यात आलं आहे. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे या दोघांचा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. लग्नाला अजून ७ दिवस बाकी असले तरी आज ५ जुलै रोजी त्यांच्या लग्नाचा संगीत सोहळा पार पडणार आहे. या संगीत सोहळ्यात जस्टिन बिबरदेखील गाताना दिसणार आहे. त्यासाठी आज सकाळीच तो मुंबईत दाखल झाला. मुंबईत आल्यावर त्याने केलेल्या एका गोष्टीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अनंत- राधिका यांच्या संगीत सोहळ्यासाठी लोकप्रिय आंतरराष्ट्रीय गायक जस्टिन बिबर याला आमंत्रित करण्यात आलं आहे. नुकताच त्याचा मुंबईत आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मुंबईत आल्यावर तो सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात आपल्या हॉटेलवर रवाना झाला. त्यानंतर त्याने सगळ्यात आधी त्याची पत्नी हायली बिबर हिला फोन करत तिच्या आरोग्याची चौकशी केली. जस्टिनची पत्नी हायली ही गरोदर असून लवकरच ते आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत. त्यामुळे जस्टिनने आपल्या पत्नीला व्हिडिओ कॉल करत तिच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यानंतर त्याने रात्रीच्या कार्यक्रमासाठी त्याच्या टीमसोबत साउंडचेक करत आपल्या गाण्याची यादीही दिली. कामामध्ये असूनही आपल्या पत्नीची काळजी करणाऱ्या जस्टिनचं नेटकरी कौतुक करत आहेत.

जस्टिन आज जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथेआपलं गाणं सादर करणार आहे त्यासाठी त्याने तब्बल ८३ कोटी रुपये घेतले आहेत. या सोहळ्यासाठी तो पिचेस आणि बेबी ही त्याची गाजलेली गाणी सादर करणार आहे. सोबतच लव्ह युअर सेल्फ हे गाणंही तो गाणार आहे. जस्टिनला २०२२ मध्ये चेहऱ्याला पॅरालिसिस झाला होता. त्यानंतर त्याने एवढ्या मोठ्या स्टेजवर परफॉर्म केलेलं नाही. आजारपणानंतर तो प्रथमच आपलं गाणं सादर करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकारच्या GR ला विरोध करणारे मराठे कोण? मनोज जरांगेंनी स्पष्ट शब्दात सांगितलं

Latest Maharashtra News Updates : आगामी महापालिका निवडणुकांसाठी सोलापूर महानगरपालिकेकडून प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध

स्वदेशी अॅक्शन, दमदार भावनेने भरलेले आणि पुरेपूर मनोरंजन असणाऱ्या अनुराग कश्यप यांच्या निशानची चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

'आम्हाला माहितीये, शिंदेसाहेब तुमच्यावर ताण पडतो, तेव्हा तुम्ही दरे गावात जाता'; मराठा आरक्षणावरुन ॲड. सदावर्तेंचा निशाणा

Ganesh Visarjan 2025: 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...' गणपती विसर्जन करताना 'या' चुका टाळा, बाप्पाला द्या योग्य निरोप

SCROLL FOR NEXT