Ambani Family Dance Esakal
Premier

Anant & Radhika Sangeet : शाहरुखच्या 'दिवानगी' गाण्यावर थिरकला अंबानी परिवार ; ग्रँड संगीत सोहळ्याची होतेय चर्चा

Anant Ambani & Radhika Merchant Grand Sangeet : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या ग्रँड संगीत सोहळ्याला अंबानी कुटूंबाने शाहरुखच्या गाजलेल्या दिवानगी गाण्यावर डान्स केला.

सकाळ डिजिटल टीम

Ambani Family Dance At Sangeet Ceremony : मुकेश अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या आलिशान विवाहसोहळ्याची चर्चा सगळीकडे आहे. १२ जुलैला पार पडणाऱ्या या विवाहसोहळ्याच्या पूर्व कार्यक्रमांना सुरुवात झाली असून विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. काल ५ जुलैला राधिका आणि अनंतचा संगीतसोहळा थाटात पार पडला. सोशल मीडियावर या संगीत सोहळ्याचे व्हिडीओ चर्चेत असतानाच अंबानी कुटूंबाच्या डान्सचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

'दिवानगी' गाण्यावर डान्स

नव्या सुनेच्या स्वागतासाठी अंबानी कुटूंब जय्यत तयारी करत असून आतापर्यंत प्रत्येक सोहळा शानदार राहावा याकडे त्यांनी वैयक्तिकरित्या लक्ष दिल्याचं दिसून आलं आहे. अशातच आता त्यांच्या नव्या डान्स व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. राधिका आणि अनंत यांच्या संगीत सोहळ्यात संपूर्ण अंबानी कुटूंबाने एकत्र येत शाहरुखच्या ओम शांती ओम सिनेमातील दिवानगी या गाण्यावर भन्नाट डान्स केला. यावेळी अंबानी कुटूंबाचे जावई आनंद पिरामलसुद्धा थिरकले. तर या डान्समध्ये नवी सून राधिकाही सहभागी झाली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांनी कमेंट्स करत अंबानी कुटूंबाच्या डान्सचं कौतुक केलं.

२००७ साली शाहरुखचा 'ओम शांती ओम' हा सिनेमा रिलीज झाला होता. शाहरुख बरोबर दीपिका पदुकोणचीही या सिनेमात मुख्य भूमिका होती. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटीज या गाण्यासाठी एकत्र आले होते तर या गाण्यात सहभागी झालेल्या प्रत्येक सेलिब्रिटीला शाहरुखने एक महागडं गिफ्टही दिलं होतं. शाहरुखचा हा सिनेमा सुपरहिट ठरला होता.

दरम्यान, १२ जुलै २०२४ ला अनंत आणि राधिका लग्नबंधनात अडकणार असून १४ जुलैपर्यंत या विवाहसोहळ्याचे विविध विधी पार पडणार आहेत. या लग्नासाठी फक्त भारतातूनच नाही तर परदेशातूनही अनेक पाहुणे उपस्थित राहणार आहेत. मुंबईच्या बीकेसीमधील जिओ कॉनव्होकेशन सेंटरमध्ये हा लग्नसोहळा पारंपरिक गुजराती पद्धतीने पार पडणार आहे.

शाहरुख खान, सलमान खान, कतरिना कैफ, विकी कौशल, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा, सिद्धार्थ-कियारा, दीपिका-रणवीर , बच्चन कुटूंब अशा दिग्गज बॉलिवूड सेलिब्रिटीजना या लग्नसोहळ्याचं आमंत्रण आहे. या व्यतिरिक्त बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग, लॅरी फिंक, स्टीफन श्वार्झमन, बॉब इगर, इवांका ट्रम्प ही दिग्गज मंडळीही या लग्नसोहळ्याला राहणार असल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Capital IPO: 'टाटा'च्या आयपीओचा धमाका! सामान्यांसाठी खुला होण्यापूर्वीच बड्या कंपन्यांची मोठी गुंतवणूक

Arattai messaging app : स्वदेशी मेसेजिंग ॲप ‘Arattai’ची क्रेझ वाढली! ; आता आनंद महिंद्रांनीही केलंय डाउनलोड

Barshi Crime : बार्शीत एसटी महामंडळ बसच्या महिला वाहकास मारहाण; सहा महिलांविरुद्ध गुन्हा

Akola News : खदान पोलीस स्टेशनमधील नितीन मगर निलंबीत, डीबी स्कॉडवर पुन्हा संशयाची सावली

Latest Marathi News Live Update: कोरडेवाडी साठवण तलावाच्या मंजुरीसाठी राजश्री राठोड यांचे आमरण उपोषण

SCROLL FOR NEXT