china
china esakal
प्रीमियम ग्लोबल

चीनमधील न्यूमोनिया खरोखरच पालकवर्गाची काळजी वाढविणारा आहे का?

Shraddha Kolekar

पुणे - कोव्हीड सारख्या महामारीने सगळ्या जगाला हादरवून सोडल्यानंतर आता चीनमध्ये आणखी एक आजार आला आहे अशा बातम्यांनी भारतीयांची काळजी वाढवली आहे.

खासकरून पालकवर्गाची. कारण लहान मुलांमध्ये न्यूमोनिया झाल्याच्या केसेस अधिक आढळून आल्याचे वृत्त होते. त्यामुळेच खरोखरच हा प्रकार काळजी वाढविणारा आहे की आपण नको असलेली काळजी उगाचच करत बसतो आहोत. याबाबतची माहिती घेतल्याशिवाय ही काळजी कमी होणार नाही..

चीनमधल्या हॉस्पिटलमधले व्हिडियो काळजी वाढवणारे..

चीन देशातील हॉस्पिटलमधील गर्दीचे व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर फिरत असून यामध्ये गर्दीने हॉस्पिटल अक्षरशः पूर्ण भरलेली आहेत. उभे राहण्यासाठी देखील पुरेशी जागा नाही अशी स्थिती या व्हिडीओमधून समोर आली आहे.

तसेच दिवसाला १० हजारांच्या जवळपास रुग्णसंख्या असल्याच्या बातम्या झळकत आहेत. मुख्य म्हणजे यामध्ये लहान मुलं सर्वाधिक दिसत आहेत. कोविडची ती भयानक वर्ष आठवल्यानंतर अर्थातच लहान मुलांमध्ये झालेल्या या आजाराच्या वाढीने येथील पालकवर्ग चिंतेत आहे.

चीनमध्ये नेमका कोणत्या आजारामुळे रुग्णसंख्या वाढली आहे?

याबाबत चीन या देशाने जागतिक आरोग्य संघटनेकडे याबाबतचा डेटा पाठवला आहे. या डेटाचा अभ्यास करता रुग्णांमध्ये आढळून आलेल्या व्हायरसमध्ये कोणताही नवा व्हायरस आढळून आला नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे डॉक्टर सांगत आहेत.

याबाबत महाराष्ट्र आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, चीनमध्ये न्यूमोनिया , कोविड, इन्फ्लुएंझा,आर.व्ही.एस, मास्कोप्लांझा यांचा संमिश्र संसर्ग आढळून आला आहे. यात कोणताही नवा व्हायरस सापडलेला नाही.

लहान मुलांना न्यूमोनियाची लक्षणे

'मायकल प्लाझ्मा न्यूमोनिया' हा तसा सौम्य लक्षणे असणारा आणि तुलनेने कमी आढळून येणाऱ्या न्यूमोनिया चीनमध्ये आढळून आला आहे.

यामध्ये रुग्णांना खासकरून लहान मुलांना ताप, नाक गळणे, घश्यात खवखव, घरघर, उलट्या, जुलाब, डोळ्यातून पाणी येणे आदी लक्षणे दिसत आहेत. रुग्णांमध्ये काही कोव्हीडच्या केसेस सुद्धा आहेत.

लहान मुले आणि म्हातारी माणसे यांची प्रतिकारशक्ती तुलनेने कमी असल्याने या रुग्णांची संख्या अधिक आढळून येते आहे.

चीनमधल्या कोणत्या ठिकाणी याचा प्रादुर्भाव अधिक?

चीनची राजधानी बीजिंग आणि लेओनिंग या ठिकाणी अधिक रुग्ण आढळून आले आहेत. येथील काही हॉस्पिटलमध्ये दिवसाला दहा हजार पर्यंत केसेसची नोंद झाली आहे.

तर रुग्ण १३ -१३ तास रुग्णालयाचे रांगेत उभे राहत असल्याच्याही बातम्या काही इंग्रजी वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केल्या आहेत.

चीनच्या उत्तरेकडच्या भागात जिथे थंडीचे प्रमाण अधिक आहे अशा ठिकाणी ही रुग्णसंख्या अधिक दिसते आहे.

कोविडचे निर्बंध उठवल्यामुळे आणि थंडीमुळे रुग्णसंख्या वाढते आहे का?

"लहान मुलांमध्ये श्वसनाच्या आजाराच्या नोंदवलेल्या प्रकरणांचा अभ्यास अजूनही करणे आवश्यक असून त्यासाठी आवश्यक तेवढी माहिती आम्हाला मिळालेली नाही.

मात्र, थंडीच्या दिवसांमुळे हे श्वसनाचे आजार वाढल्याची शक्यता आहे. यामुळे श्वसनाच्या विविध आजारांचा परस्पर संबंध येऊन आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढू शकतो." असे आरोग्य संघटनेने त्यांच्या संकेतस्थळावर जाहीर केले आहे. याबाबत डॉ. आवटे म्हणाले, अन्य देशांच्या तुलनेत चीनमध्ये अधिक दिवस कोव्हीड लॉकडाऊन होते.

त्यामुळे अचानक हे लॉकडाऊन उठवल्यानंतर साथरोग वाढले असल्याची शक्यता आहे.

युरोपमधील नेदरलँडमध्ये देखील रुग्णसंख्या आढळून आली आहे

चीननंतर युरोप खंडातील नेदरलँड या देशातही लहान मुलांमध्ये न्यूमोनियाच्या केसेस आढळून आल्या आहे. तेथील आरोग्य संस्थेने केलेल्या सर्व्हेक्षणात आढळून आले आहे की ५ ते १४ वयोगातील ८० मुलांना निमोनिया झालेला आढळून आला आहे.

मात्र १ लाख मुलांच्या सर्व्हेक्षणानंतर हा आकडा आल्यामुळे ही हिवाळी आजारांची आकडेवारी असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे याबाबत काय म्हणाले?

चीनमध्ये वाढत्या रुग्णसंख्येबाबत चीन देशाला याबाबतचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने मागितला होता. त्याचा अभ्यास करता कोणताही नवा व्हायरस आढळून आला नसल्याचे समोर आले असले तरी हा डेटा पुरेसा नाही असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हंटले आहे.

याबाबत अधिक अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून मागील काही वर्षांची हिवाळी आजारातील डेटा तपासणला जाणार आहे. तसेच रुग्णांच्या रिपोर्टनुसार यात आणखी अभ्यास करण्याची गरज असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे

महाराष्ट्रातील आरोग्य विभागाचे अधिकारी काय सांगतात ?

महाराष्ट्र आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी डॉ.प्रदीप आवटे म्हणालेत, जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलं आहे की, या केसमध्ये अद्याप कोणताही नवीन व्हायरस आढळून आलेला नाही. २०१९ साली कोरोनाचा उद्रेक आठ ते दहा दिवसांत झालेला.

ही घटना समोर येऊन आठ दिवस झाले आहेत अजून काही मोठ्या गोष्टी समोर आलेल्या नाहीत. त्यामुळे याबाबत अतिकाळजी न करणेच योग्य आहे. मात्र महाराष्ट्र आरोग्य विभागाने सर्व गोष्टीची शक्यता गृहीत धरत उपाययोजना केलेल्या आहेत.

पण यातून कोव्हीडसारखी परिस्थिती येणार नाही कारण न्यूमोनिया , कोव्हीड हे व्हायरस आपल्याकडे आधीपासून असल्याने त्यांची प्रतिकारशक्ती देखील आहे. त्यामुळे काळजी घ्या मात्र काळजी करू नका असे मी नक्की सांगेन.

महाराष्ट्र शासनाकडून आरोग्य संस्थांना सूचना जारी

(१) आय. एल. आय. / सारी सर्वेक्षण - प्रत्येक जिल्हा आणि महानगरपालिकेने आपल्या क्षेत्रातील श्वसन संस्था आजारांचे ( फ्ल्यू सारखा आजार आणि श्वसन संस्थेचे तीव्र आजार) सर्वेक्षण गांभीर्यपूर्वक करावे. आय एल आय/ सारी संदर्भातील माहिती आय डी एस पी/ आय एच आय पी पोर्टलवर दैनंदिन स्वरुपात अद्ययावत करावी.

(२) प्रयोगशाळा सर्वेक्षण – आपल्या कार्यक्षेत्रातील निदान प्रयोगशाळांना आय एल आय/ सारी रुग्णांचे नमुने नियमित स्वरुपात पाठविण्यात यावेत.

(३) रुग्णालयीन पूर्वतयारी - आपल्या कार्यक्षेत्रातील रुग्णालये या पध्दतीचा उद्रेक हाताळण्यासाठी सुसज्ज ठेवणे गरजेचे आहे. मनुष्यबळ, त्यांचे प्रशिक्षण, ऑक्सिजन उपलब्धता, ऑक्सिजन प्लांट कार्यरत आहेत किंवा कसे, व्हेंटीलेटर उपलब्धता, अति दक्षता विभागातील सिध्दता, रुग्णालयीन संसर्ग प्रतिबंधक यंत्रणा याबाबत आपण जातीने लक्ष घालून खातरजमा करावी.

(४) औषध आणि इतर साधनसामग्री यांचा पुरेसा साठा - आवश्यक औषधांचा पुरेसा साठा, लसी, पी पी ई , निदानासाठी लागणारी किटस, ऑक्सिजन सिलिंडर्स आणि इतर बाबी पुरेशा प्रमाणात आहेत याची शहनिशा करावी. आवश्यक यंत्रसामग्री कार्यरत राहील याची दक्षता घ्यावी. आवश्यक तिथे किरकोळ दुरुस्ती करुन घेण्यात यावी.

(५) आरोग्य शिक्षण – जनतेने कोविड अनुरुप वागणे अंगिकारावे या संदर्भात त्यांचे प्रबोधन करण्यात यावे. विशेषतः श्वसन संसर्ग असणा-या व्यक्तींनी काळजी घेण्याबाबत भर द्यावा तथापी जनतेमध्ये विनाकारण भिती पसरणार नाही याची दक्षता घ्यावी.

डॉ. रवी गोडसे काय म्हणाले?

कोव्हीड काळात भारतीय डॉक्टर रवी गोडसे यांचे व्हिडीओ लोकांनी मोठ्या प्रमाणात फॉलो केले होते. चीनमधील निमोनियाबाबत त्यांनी नुकतीच एक्स वर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हणले आहे की,

"चीनमधील मुलांमध्ये न्यूमोनिया होणारा विषाणू भारतात येऊ शकतो का? तर होय येऊ शकतो. पण त्यामुळे न्यूमोनिया होणार नाही. त्यामुळे आनंद घ्या, आराम करा आणि त्या बातमीवर क्लिक करणे थांबवा."

---------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? बंडखोर ठाकरे-पवारांकडे परतणार?

केदार जाधवने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून केली निवृत्तीची घोषणा

Election Commission : ''सिस्टीममध्ये कुठलीही चूक होऊ शकत नाही'', मतमोजणीच्या तयारीबद्दल मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

Priyanka Chopra Beauty Tips: चमकदार त्वचेसाठी देसी गर्लने शेअर केली बॉडी स्क्रब बनवण्याची सोपी पद्धत

Bengluru Viral Video : बंगळुरूमध्ये कोकोनट अटॅकरची दहशत ; भरदिवसा गाडी फोडली, व्हायरल होतोय व्हिडीओ

SCROLL FOR NEXT