Buy Flat  esakal
Home Loan

Buy Flat : तूम्हीही Flat खरेदी करताना ‘या’ गोष्टी तपासल्या का?, लगेच बघा नाहीतर...

फ्लॅट घेताना काळजी घ्या, नाहीतर स्वप्नातलं सुंदर घर घेण्याचं स्वप्न भंगेल!

Pooja Karande-Kadam

नवीन घर खरेदी करणे हा जीवनातील सर्वात महत्त्वाचा निर्णय आहे. हे खरोखर तुमच्यासाठी एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. नोकरीच्या सुरुवातीपासूनच तरुण आपले स्वप्नातील घर विकत घेण्याचा प्रयत्न करू लागतात. वर्षानुवर्षे बचत आणि नियोजन केल्यानंतर, तुमचा प्रयत्न योग्य निर्णय घेण्याचा असायला हवा, जेणेकरून तुम्हाला नंतर पश्चात्ताप होऊ नये.

येथे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जे लक्षात घेऊन तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता. घर खरेदी करताना, तुमच्या बचतीसोबत, गृहकर्जाच्या रूपातही भरपूर पैसे गुंतवले जातात त्यामुळे तुम्हाला अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

मालमत्तेची किंमत

तुम्ही घर खरेदीसाठी बजेट तयार केले पाहिजे. घर खरेदीसाठी तुम्ही किती खर्च करू शकता हे तुम्हाला माहीत असेल, तर घर निवडणे सोपे होते. मग तुमच्या मालमत्तेची आसपासच्या परिसरात उपलब्ध असलेल्या मालमत्तांशी तुलना करा. यावरून तुम्हाला कळेल की बिल्डरने तुम्हाला योग्य किंमत दिली आहे की नाही.

फ्लॅटचा कार्पेट एरिया

एखाद्या मालमत्तेची जाहिरात पाहता, त्यात सुपर बिल्ट अप एरिया लिहिलेला असतो. यात शाफ्ट, लिफ्टची जागा, जिने, भिंतीची जाडी यासारख्या गोष्टींचाही समावेश आहे. तुम्ही अंदाज लावलात तर फ्लॅट पाहून तुमची निराशा होईल, कारण प्रत्यक्षात तुमचे कार्पेट एरिया कमी असेल.

जमिनीची नोंद

ज्या जमिनीवर तुमचे घर बांधले आहे. ती खूप महत्त्वाची आहे. त्या जमिनीच्या मातीची तूम्हाला माहिती हवी. यासोबतच ही जमीन सर्व प्रकारच्या सरकारी थकबाकीतून मुक्त होऊन त्याची नोंदणी करण्यात यावी.

कायदेशीर माहिती

मालमत्तेबद्दल कायदेशीर माहिती मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी तुम्ही काही गोष्टी तपासल्या पाहिजेत. इमारत ज्या जमिनीवर बांधली आहे. ती कायदेशीर बंधनांपासून मुक्त आहे. विकसकाला सर्व मंजुऱ्या मिळाल्या आहेत की नाही हे कसे शोधायचे?. यामध्ये निबंधक क्षेत्र विकास प्राधिकरण, पाणीपुरवठा, वीज मंडळ आणि महापालिका इत्यादींचा समावेश आहे.

ताबा घेण्याची तारीख

देशातील मोठ्या शहरांमध्ये मालमत्ता खरेदी करताना, तुम्हाला ताबा मिळण्याच्या तारखेची देखील काळजी घेणे आवश्यक आहे. आता बांधकाम व्यावसायिकांना इमारती उभ्या करण्यात बराच वेळ लागत आहे. खरेदीदार या नात्याने ताबा देण्यास विलंब झाल्यास नुकसान भरपाईच्या रकमेबाबत तुम्ही करारातील कलमाकडे लक्ष दिले पाहिजे.

कर्ज देणाऱ्या बॅंका

कर्ज देणार्‍या बँका त्या बिल्डरच्या प्रकल्पात कोणत्या बँका कर्ज देत आहेत. एखाद्या बिल्डरची प्रतिष्ठा खराब असेल, तर साधारणपणे मोठ्या बँका त्याच्या प्रकल्पात मालमत्ता खरेदी करण्यासाठी कर्ज देत नाहीत. प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला याची नीट माहिती असायला हवी.

बिल्डरकडून फ्लॅट खरेदी

जेव्हा तुम्ही बिल्डरकडून फ्लॅट खरेदी करायला जाता. टोकन रक्कम देऊन फ्लॅट बुक करता. तेव्हा तुम्हाला अलॉटमेंट लेटर मिळते. त्यानंतर बँकेकडून कर्जासाठी अर्ज केला तर तो त्रिपक्षीय करार आहे. तो वाचून समजून घ्यावा. तुम्हाला काही समजत नसेल तर तुम्ही बँकेकडून किंवा बिल्डरशी चर्चा करून शंकांचे निसरन करून क्लिअर करून घ्या.

फ्लॅट कसा निवडावा

प्रॉपर्टी खरेदी करणे ही दीर्घकालीन गुंतवणूक असल्याने त्यानुसार प्रॉपर्टीच्या ठिकाणाची विशेष काळजी घ्यावी. परिसरात उपलब्ध असलेल्या सुविधा, पायाभूत सुविधा आणि अत्यावश्यक सेवांचा प्रवेश या गोष्टींची खूप काळजी घेणे आवश्यक आहे. तुमचा फ्लॅट सुद्धा सुरक्षित परिसरात असावा जेणेकरून तुम्ही आणि तुमचे कुटुंब सुरक्षित राहू शकाल.

एक्स्ट्रा चार्जेस

अतिरिक्त आणि छुपे शुल्क तुम्ही मालमत्ता खरेदीशी संबंधित प्रत्येक गोष्टीचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. तुमच्या उशिरा देयकावर किती दंड आकारला जातो आणि बिल्डरला उशिरा ताबा दिल्याबद्दल किती दंड आकारला जातो हे लक्षात ठेवा. तुम्हाला फ्लॅट वेळेवर मिळाला नाही तर बिल्डर तुम्हाला दंड म्हणून दरमहा ठराविक रक्कम देतो.

या गोष्टींची काळजीही घ्या

  • ज्या प्लॉटवर इमारत बांधण्यात येणार आहेत, त्याचा ७/१२ उतारा अगर प्रॉपर्टी कार्ड अगर बी फॉर्म यावर धारक म्हणून नावे असलेल्या सर्व व्यक्तींनी, विकसकास कुलमुखत्यारपत्र दिले आहे का, हे पाहावे.

  • वकिलांनी या जागेचा सर्च घेतला आहे का, व सर्च रिपोर्ट तपासावा.

  • विकसकास दिलेले अधिकारपत्र पाहावे.

  • प्लॉटचे पूर्ण अधिकार/ पार्ट अधिकार आहेत का, ते तपासावे.

  • जागा विकसकाच्या प्रत्यक्ष ताब्यात आहे का, हे पाहावे.

  • बांधकामाचे नकाशे महापालिका किंवा जिल्हाधिकारी यांनी मंजूर केले आहेत का, हे पाहावे.

  • मान्य नकाशामध्ये विकत घेण्यात येणारा फ्लॅट आहे का, हे पाहावे.

  • फ्लॅटचा मजला व क्रमांक यांची खात्री करावी.

  • विभागणी केलेला फ्लॅट नाही ना याची खात्री करावी.

  • एन.ए. परवानगी घेतली आहे का, हे पाहावे. गावठाणास आवश्यक नाही.

  • यू.एल.सी. ऑर्डर असल्यास व त्यावरील अटी तपासाव्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Election 2025 : बिहारमध्ये निवडणुकीआधी 'I.N.D.I.A' आघाडीला मोठा झटका!, आता ‘या’ मित्रपक्षाचाही स्वबळाचा नारा

Crime: पतीचा अश्लील व्हिडिओ बनवला; नंतर पत्नीनं धमकावलं अन्...; जे घडलं त्यानं सर्वच हादरले, प्रकरण काय?

WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅपवर आता अनलिमिटेड मेसेज पाठवता येणार नाहीत; कंपनी आणतेय 'मंथली लिमिट'

AFG vs PAK: पाकड्यांचे शेपूट वाकडे! अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंना मारल्यानंतरही मालिका खेळणवण्यार ठाम; म्हणतात...

Vashi Farmers Protest : पवनचक्कीच्या अधिका-यांना काम करण्यास मज्जाव करुन रोखुण धरणा-या ७० शेतक-यावर गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT