Nagraj Manjule House esakal
Residential

Nagraj Manjule House : मराठी चित्रपट गाजवणारा डायरेक्टर, वडिलांची ही आठवण आजही जपून ठेवलीय

गाडी, बंगला सगळं जवळ आलं म्हणून गावची आठवण त्यांनी सोडली नाही. वडिलांचं राहातं घर आजही तसंच आहे

साक्षी राऊत

Nagraj Manjule House : पिस्तुल्या, फँड्री, सैराट यांसारख्या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टी गाजवणारं मराठी व्यक्तीमत्व नागराज मंजुळे. मूळचे सोलापूरकर असलेले करमाळा तालुक्यात नागराज यांचे गावातले लहानसे घर. आज व्यक्तीमत्वं उंचावलं. गाडी, बंगला सगळं जवळ आलं म्हणून गावची आठवण त्यांनी सोडली नाही. वडिलांचं राहातं घर आजही तसंच आहे. एवढेच नव्हे तर आजही गावी गेल्यावर नागराज मंजुळे याच घरात राहातात.

सर्व मराठी चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणारा सैराट हा मूव्ही नागराज यांनी तयार केलाय. झुंड या हिंदी चित्रपटातून त्यांनी बॉलीवूडमध्येही एन्ट्री केलीय. अनेक कलाकारांची त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. इतके यश मिळूनही या व्यक्तीचे पाय मात्र आजही जमिनीवर आहेत.

नागराज मंजुळे हे मुळचे सोलापूरकर असून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जेऊर या गावात ते लहानाचे मोठे झाले. त्यांच्या आईवडिलांची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. त्यामुळे त्यांचे वडील पोपटराव यांच्याकडून त्यांचा भाऊ बाबूराव यांनी नागराजला दत्तक घेतले.

नागराज यांच्या वडिलांनी बांधलेले घर आजही तेथेच आहे. नागराज आज कितीही श्रीमंत झाले असले तरी गावी गेल्यावर ते याच घरी राहातात. नागराज यांचे हे घर पूर्वी फारच साधे होते. पण सैराटच्या यशानंतर त्याला रंग देऊन त्याची डागडुजी करून या घराला त्यांनी नवीन रूप दिलं. (Marathi Movies)

नागराज हे अत्यंत साधारण कुटुंबातून आलेले असताना या साध्या माणसाने त्याच्या चित्रपटातून संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. एकामागे एक त्यांचे मराठी चित्रपट मोठ्या पडद्यावर गाजले. मोठ्या पदावर पोहोचूनसुद्धा या व्यक्तीचे विचार आणि राहाणी अगदी साधी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT