बाल्कनीतली बाग
बाल्कनीतली बाग Esakal
Residential

घराला मिळेल निसर्गाची साथ ; तुमच्या Balcony मध्ये असे करा बागेचे नियोजन

सकाळ डिजिटल टीम

ग्रीन बिल्डिंग या संकल्पनेत केवळ इमारतीच्या गच्चीतच बाग करण्यावर भर नाही, तर प्रत्येक फ्लॅटमधल्या बाल्कनीतही गार्डन Balcony Garden करून घेतली, तर झाडांपासून मिळणारे फायदे हे प्रत्येक घराला मिळू शकतात. इमारती बांधतानाच Construction बाल्कनीच्या स्लॅब डिझाईन करण्यापासूनच त्याची तयारी करावी लागेल. Home Decor Marathi Tips Plan your Balcony Garden from Slab Construction Stage

कारण अशा बगीचाचं Garden येणारं जास्तीचं वजन पेलण्याची क्षमता या स्लॅबमध्ये असणं गरजेचं आहे. त्याशिवाय या स्लॅबचं वॉटरप्रुफिंगही अत्यंत काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. हे सगळं केलं, तरीही ज्यांना आपल्या घराच्या Home बाल्कनीत बाग करायची आहे, त्यांनी आधीच नियोजन करणे गरजेचे आहे.

असे करा तुमच्या बागेचे नियोजन

१) प्रथम आपल्या बाल्कनीचा आराखडा तयार करून घ्यावा. दरवाजे, खिडक्या, बाल्कनीचा कठडा, भिंती या सगळ्या गोष्टी प्रमाणबद्ध रीतीने त्या आराखड्यात दाखवाव्यात. बागेसाठी लागणारी अवजारं, रसायनं, माती किंवा इतर संबंधित वस्तू यांची यादी करून त्या वस्तूंना बाल्कनीत जागा कुठे असणार तेही या आराखड्यात दाखवावं. हे सगळं ठेवूनही बाल्कनीत वावरायला पुरेशी मोकळी जागा असायला हवी.

२) प्लॅस्टिकची भांडी, प्लॅस्टिकच्याच वजनाने हलक्या असलेल्या चौकोनी, गोल कुंड्या अशा कमी वजनाच्या वस्तूंचा उपयोग झाडं लावण्यासाठी करावा. त्यात नेहमीच्या बागेत वापरल्या जाणाऱ्या जड वजनाच्या मातीऐवजी वजनाला हलकी असलेली जैविक स्वरूपात समृद्ध असलेली अशी शेवाळयुक्त माती घालावी.

३) आपल्याला ही बाग घराच्या आत बसल्यानंतर कशी दिसायला हवी ते ठरवून त्याप्रमाणे कुठल्या रंगाची पानं आणि फुलं असलेली झाडं लावायचीत ते ठरवावं. उदाहरणार्थ पिवळा, गुलाब, केशरी रंगाची फुलं देणारी झेंडूची रोपं, पांढऱ्या रंगाची फुलं देणारा सोनटक्का याशिवाय हिरव्यागार पाती असलेला गवती चहा, तुळस अशी विविध प्रकारची झाडं जर आपण निवडली, तर आपल्या बाल्कनीत निसर्गानं केलेली रंगाची मुक्त उधळण पाहताना आपलं मन उंबळून आल्याशिवाय राहणार नाही.

शिवाय आपल्याच बाल्कनीतल्या फुलांनी देवाची पूजा करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. तसंच स्वतःच्या बाल्कनीतल्या झाडावरचं फूल डोक्यात माळून नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी जाणाऱ्या महिलांना जेव्हा इतकी छान छान फुलं तू नेहमी कुठून आणतेस, असं जेव्हा मैत्रिणी विचारतात, तेव्हा, ही माझ्या बागेतली आहेत, हे सांगताना एक वेगळंच सुख त्यांच्या मनाला लाभत असतं.

हे देखिल वाचा-

४) या मानसिक फायद्यांव्यतिरिक्त आपल्या शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने घरात झाडं असणं हेही आवश्यक असतं. कारण झाडं सूर्यप्रकाशात प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेतून स्वतःसाठी अन्न तयार करताना दिवसा कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेऊन ऑक्सिजन सोडतात, हे आपण शाळेपासूनच शिकत आलेलो आहोत. त्यामुळे प्रदूषण कमी व्हायला आणि घरात ताजी स्वच्छ हवा खेळती राहायलाही मदत होते.

रात्री जरी ती कार्बनडाय ऑक्साईड सोडत असली तरी आपण बाल्कनीची दारं रात्री बंद करून घेत असल्यामुळे ती हवा घरात येत नाही. तसंच तुळस ही दिवसरात्र ओझोन सोडत असते. त्यामुळे वातावरणात ताजेपणा येतो. या अशा गुणधर्मांमुळेच तर झाडांना माणसांचे मित्र असं म्हटलं जातं. अशाप्रकारे निसर्गसान्निध्याचा वापर करून प्रदूषणमुक्त हवा घरात खेळती ठेवणं हाच ग्रीन बिल्डिंग या संकल्पनेतला मुख्य उद्देश आहे.

५) झाडांची निवड करताना त्यांच्या गुणधर्मांचा अभ्यास करून निवड करावी. तसंच उन्हात वाढणारी झाडं कुठली, सावलीत वाढणारी झाडं कुठली याचा अभ्यास करण्याबरोबरच आपल्या बाल्कनीत येणारी सूर्याची उन्हें दिवसाच्या कुठल्या वेळी आणि किती वेळ येत असतात याचाही अभ्यास अशी बाग बाल्कनीत करण्या आधी करावा आणि त्यानुसार झाडांची निवड करावी. नाहीतर पुरेशा उन्हाअभावी किंवा अती उन्हामुळे झाडं जगणार नाहीत आणि आपण लावलेली झाडं जगत नाहीत असा गैरसमज करून घेऊन आपण हा बाग करण्याचा विचारच रहित करू शकतो, असं होऊ नये याकरिता हा अभ्यास काळजीपूर्वक करावा.

६) झाडांना पाणी घालण्यासाठी पाण्याच्या पाईपची जोडणी बाल्कनीत करून घ्यावी. नाहीतर प्रत्येक वेळी बादलीने पाणी घरातून बाल्कनीत घेऊन जावे लागेल.

७) पाणी वाहून जाण्यासाठी योग्य उतार आणि पुरेशी ड्रेनेज होल्स यांची सोय असावी.

८) टांगलेल्या कुंड्यांचा आणि भांड्यांचा झाड लावण्यासाठी वापर करता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Exit Poll: 'एक्झिट पोलवर अजिबात विश्वास नाही'; महाराष्ट्र, यूपी, बिहारमध्ये किती जागा मिळतील? ठाकरे गटाचा काय आहे अंदाज?

Assembly Election Result 2024: सिक्कीम, अरुणाचलमध्ये 'या' पक्षांचे सरकार पक्कं, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाही जलवा

Viral Video: रवीना टंडनचा दारु पिऊन धिंगाणा? वृद्ध महिलेला मारहाण केल्याचा आरोप; व्हिडिओ होतोय व्हायरल

Assembly Election Result: टीम इंडियाच्या माजी कर्णधाराच्या पदरी निराशा, 10 वर्षात पराभवाची डबल हॅट्रिक

Arunachal Pradesh Election Result Live: अरुणाचलमध्ये भाजप एकतर्फी विजयाकडे, राष्ट्रवादी देखील आघाडीवर

SCROLL FOR NEXT