PMPML-Bus 
पुणे

कोरोनाचा फटका 'पीएमपी'लाही; 67 दिवसांत झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान!

मंगेश कोळपकर

पुणे : सलग चौथ्या लॉकडाउनमुळे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये सार्वजनिक वाहतुकीची सेवा पुरविणाऱ्या पीएमपीलाही फटका बसला आहे. परिणामी, गेल्या 67 दिवसांत तब्बल 100 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पीएमपी आता जर्जर अवस्थेत पोचली आहे.

कोरोनाच्या संकटामुळे 17 मार्चपासून पीएमपीची सेवा मर्यादीत करण्यात आली. 22 मार्च रोजी जनता कर्फ्युमुळे पीएमपी बंद होती. तर 25 मार्चपासून राष्ट्रीय स्तरावर लॉकडाउन सुरू करण्यात आला. तेव्हापासून पीएमपीची पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील प्रवासी वाहतूक पूर्णतः बंद आहे. मात्र, दोन्ही शहरांतील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांची वाहतूक पीएमपीकडून सुरू आहे.

असे झाले 100 कोटींचे नुकसान
पीएमपीचे एरवीचे रोजचे सरासरी उत्पन्न 1 कोटी 40 लाख ते 1 कोटी 60 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. मात्र, 17 मार्चपासून पीएमपीची प्रवासी वाहतूक बंद झाली आहे. पीएमपीला दरमहा 45 ते 50 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र, लॉकडाउनमुळे हे उत्पन्न दोन महिन्यांपासून बंद झाले आहे. त्यामुळे गेल्या 67 दिवसांत 100 कोटींपेक्षा जास्त पीएमपीचे नुकसान झाले आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

बसगाड्याही डेपोतच

पीएमपीच्या ताफ्यात सुमारे 2000 हजार बस आहेत. त्यातील सुमारे 1500 बस सरासरी मार्गांवर धावतात. सध्या अत्यावश्यक सेवेतीलच बस सेवा सुरू असल्यामुळे फक्त 100 बस रस्त्यावर आहेत. उर्वरित 1400 बस आगारांत आहेत. या बस भाडेतत्त्वावर देण्याचा पीएमपी प्रशासन प्रयत्न करीत आहेत.

अनेक कारखान्यांनीही बससेवेबाबत चौकशी केली आहे. परंतु, ठोस ऑर्डर पीएमपीला अद्याप मिळालेली नाही.नुकसान भरून कसे काढायचे पीएमपीला पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेकडून अनुक्रमे 60 आणि 40 टक्के निधी दिला जातो. त्यातून पीएमपीचे दैनंदिन कामकाज चालते.

गेले दोन महिने पीएमपीच्या तिजोरीत 100 कोटी आलेले नाहीत. त्यामुळे पुढच्या खर्चांवर ताण आला आहे. कर्मचाऱ्यांचे पगार, बसच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च, इंधन आदींची जुळवाजुळव कशी करायची, असा प्रश्न प्रशासनापुढे आहे. अत्यावश्यक सेवेतून पीएमपीला गेल्या 60 दिवसांत फक्त 1 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

पीएमपीची कर्मचारी संख्या - 10 हजार 500
पीएमपीकडील बसची संख्या - सुमारे 2000
पीएमपीचे मार्ग - 300
पीएमपीची लॉकडाउनपूर्वीची सरासरी संख्या - 11 ते 11 लाख 50 हजार
पीएमपीचे दैनंदिन सरासरी उत्पन्न - 1 कोटी 40 ते 1 कोटी 60 लाख

लॉकडाउनमुळे पीएमपीवर संकट आले आहे. आता 26 मे पासून पिंपरी चिंचवडमध्ये वाहतूक सुरू होऊ शकते. त्यामुळे काही प्रमाणात आर्थिक संकट कमी होईल, अशी आशा आहे. उत्पन्न वाढीसाठी आणि खर्च कमी करण्यासाठी प्रशासन विविध स्तरावर प्रयत्नशील आहे.

- अनंत वाघमारे (वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी)

- पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 Price : आला रे आला, आयफोन आला! iPhone 17, 17 Pro अन् Pro Max स्मार्टफोन भारतात कितीला? किंमत पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone Air Price : कागदासारखा पातळ मोबाईल! iPhone Air लाँच; बघाल तर प्रेमात पडाल, किंमत फक्त...

Apple Watch Series 11 : हे घड्याळ आहे की फीचर्सचा खजिना! Apple Watch Series 11 लाँच, किंमतीपासून अपडेट्स पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT