Corona-MH 
पुणे

कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढच; पुणे विभागाने ओलांडली शंभरी : डॉ. दीपक म्हैसेकर

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे विभागात कोरोना सांसर्गिक रुग्णसंख्या 3 एप्रिलअखेर 101 झाली आहे. त्यात पुणे 57, पिंपरी चिंचवड 14, सातारा 3, सांगली 25 आणि कोल्हापूर येथील दोन रुग्ण पॉझिटीव्ह असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, तपासणीसाठी 2 हजार 18 संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी 1 हजार 878 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले असून, 140 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहे. प्राप्त अहवालापैकी 1 हजार 777 नमुने निगेटीव्ह आहेत. तर, 101 नमुने पॉझिटीव्ह आहेत. आतापर्यंत 18 रुग्णांना बरे झाल्यामुळे रुग्णालयामधून घरी सोडण्यात आले आहे. 

पुणे विभागामधील 8 हजार 178 प्रवाशांपैकी 3 हजार 996 प्रवाशांबाबत पाठपुरावा सुरू असून, 4 हजार 282 प्रवाशांबाबत पूर्ण झालेला आहे. पुणे विभागात आजपर्यंत 15 लाख 61 हजार 992 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. त्याअंतर्गत 72 लाख 87 हजार 291 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 490 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी सांगण्यात आले आहे.

पुणे विभागात एकूण 88 ठिकाणी क्वारंटाइन सुविधा निर्माण करण्यात आली आहे. या ठिकाणी एकूण 12 हजार 848 बेडस उपलब्ध आहेत. तसेच 52 ठिकाणी आयसोलेशन सुविधा निर्माण करण्यात आली असून, या ठिकाणी एकूण 2 हजार 167 बेडस उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT