10th Geography paper marks will obtained by averaging
10th Geography paper marks will obtained by averaging 
पुणे

दहावीच्या विद्यार्थ्यांनो, भूगोलाचे गुण 'असे' मिळणार;शिक्षण मंडळाने केले स्पष्ट

ब्रिजमोहन पाटील

पुणे : 'कोरोना'मुळे रद्द झालेल्या इयत्ता १०वीचा भूगोलाच्या पेपरला कसे गुण मिळणार याकडे पालक, विद्यार्थ्यांचे  लक्ष लागले होते. त्यावर निर्णय घेण्यात आला आहे. १०वीच्या बाकीच्या विषयांना लेखी परीक्षेत किती गुण मिळाले आहेत, त्याची सरासरी काढून भूगोलाला गुण दिले जाणार आहेत, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

राज्य शिक्षण मंडळातर्फे ३ मार्च ते २३ मार्च या कालावधीत इयत्ता १०वीची परीक्षा घेण्यात आली होती. महाराष्ट्रात कोरोना'चा पहिला रुग्ण पुण्यात ९ मार्च रोजी सापडला, त्यानंतर भितीचे वातावरण निर्माण होत असल्याने व व्यवहार ठप्प होत असल्याने १४ मार्च पासून शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर इयत्ता १०वी व १२वीचे पेपर सुरू होते. १८ मार्च रोजी १२वीची परीक्षा संपली, त्यानंतर ही १०वीचे तीन पेपर शिल्लक होते. पण परीक्षा घेण्याच्या भूमिकेवर शिक्षण मंडळ ठाम होते. २१ मार्च रोजी १०वीचा इतिहासाचा पेपर  झाला. त्यानंतर मात्र २३ मार्च रोजीचा भूगोलाचा पेपर पुढे ढकलण्यात आला असल्याचे शिक्षण मंडळाने जाहीर केले. दरम्यान, लाॅकडाऊन वाढत चालल्याने अखेर १२ एप्रिल रोजी भूगोलाचा पेपर रद्द केला असल्याचे जाहीर करण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. 

दिलीप बंड म्हणतात, विद्यापीठ रस्त्यावरील तीनही पूल पाडणे योग्यच

भूगोलाचा पेपर रद्द झाला तरी गुण कशा पद्धतीने मिळणार याबद्दल पालकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. यामध्ये तीन प्रकारे गुण देण्याची पद्धत होती. पहिल्या पद्धतीत सहा विषयांच्या गुणांमध्ये भूगोलाचे ४० गुण वजा करून ५६० गुण उरतात. या ५६० वर आधारीत गुणांच्या आधारे ४० पैकी गुण देता येऊ शकतात.  दुसऱ्या पद्धतीत इतिहास व भूगोलाचा पेपर १०० गुणांचा असतो, त्यापैकी भूगोल व इतिहासाची प्रत्येकी १० गुण ताेंडी किंवा प्रात्यक्षीकांचे असतात. उरलेल्या ४० गुणांची परीक्षा होते, यावेळी इतिहासाचा ४० गुणांचा पेपर झाला आहे, त्यावर आधारीत भूगोलाचे गुण देता येऊ शकतात. तर तिसऱ्या पर्यायात सर्व परीक्षेत विद्यार्थ्यांला मिळालेल्या गुणांची सरासरी काढून भूगोलाचे गुण देता येतात. यामध्ये शिक्षण मंडळाने तिसऱ्या पद्धतीचा वापर करून विद्यार्थ्यांना भूगोलाचे गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. 

 Big Breaking : पुणे विद्यापीठ चाैकातील ते दोन पूल पाडण्याबाबत झाला मोठा निर्णय

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डाॅ. शकुंतला काळे म्हणाल्या, "मंडळाने कोरोना मुळे १०वीचा भूगोलाचा पेपर रद्द केला होता.  त्याचे गुण देण्यासाठी अन्य विषयांना लेखी परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणांची सरासरी काढली जाईल, त्यानुसार गुण दिले जातील. तसेच दिव्यांगासाठी असणाऱ्या कार्यशिक्षण विषयाचे गुण ही सरासरी पद्धतीने दिले जाणार आहेत. या बाबत मंडळाच्या सक्षम समितीने शासन मान्यतेने निर्णय घेतला आहे.

रेल्वेच्या जागेवरील झोपडीधारकांसाठी महत्त्वाची बातमी; मध्य रेल्वेने 'एसआरए' दिल्या 'या' सुचना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2024: केएल राहुलला डच्चू, तर हार्दिक उपकर्णधार; वर्ल्ड कपसाठी कसं भारतीय संघात कसं आहे खेळाडूंचं संमिश्रण

Latest Marathi News Live Update : मनीष सिसोदियांना झटका! कोर्टानं दुसऱ्यांदा नाकारला नियमित जामीन

Dombivli News : डोंबिवलीत महाविकास आघाडीचे शक्तिप्रदर्शन; उमेदवार वैशाली दरेकर यांनी भरला उमेदवारी अर्ज

Kiran Mane: उज्ज्वल निकम अन् एस.एम. मुश्रीफांच्या पुस्तकातले सिक्रेट्स; मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत किरण मानेंनी शेअर केली पोस्ट

Rajan Patil : मोहोळ तालुक्याचा दुष्काळ हटविण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला ज्यादा मताधिक्य देण्याचा निर्धार - राजन पाटील

SCROLL FOR NEXT