Janata-Vasahat-Canal
Janata-Vasahat-Canal 
पुणे

पुणे : कालव्यात पोहताना 12 वर्षीय मुलगा गेला वाहून; शोधकार्य थांबवले!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मित्रांसमवेत कालव्यातील पाण्यामध्ये पोहताना 12 वर्षांचा मुलगा वाहून गेला. ही घटना शुक्रवारी (ता.२१) दुपारी साडे बारा वाजता जनता वसाहतीमधील लोखंडी पुलाजवळ घडली. दरम्यान, अग्निशामक दलाच्या जवानांनी सायंकाळी 6 पर्यंत शोध घेतला. मात्र, अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. 

सुरेश राहुल बांगर (वय 12, रा. लोखंडी पुलाजवळ, जनता वसाहत) असे पाण्यात वाहून गेलेल्या मुलाचे नाव आहे. राहुल हा सातवीमध्ये शिकत होता. शुक्रवारी दुपारी साडे बारा वाजता सुरेश त्याच्या दोन मित्रांसमवेत विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरासमोरील लोखंडी पुलाजवळील कालव्यामध्ये पोहत होता. त्याचवेळी अचानक सुरेश पाण्यामध्ये वाहून जाऊ लागला.

तेव्हा स्थानिक नागरिकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सापडला नाही. अखेर नागरिकांनी अग्निशामक दलास खबर दिली. त्यानंतर जनता वसाहत अग्निशाम केंद्राचे अधिकारी अविनाश आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली 10 ते 15 जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लोखंडी पुल ते सावरकर पुतळ्याच्या पाठीमागील बाजुपर्यंत शोध घेतला.

सायंकाळी पावणे सहापर्यंत शोधकार्य सुरू होते; परंतु अंधार पडू लागल्याने अग्निशामक दलाने शोधकार्य थांबविले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागांवर विजय मिळेल; संजय राऊत यांचा दावा

Fact Check: भाजप एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण रद्द करेल, असा दावा करणारा अमित शहांचा व्हायरल व्हिडिओ एडिटेड

Pakistan Team coach : मोठी बातमी! भारताला World Cup मिळवून देणारा गुरू बनला पाकिस्तानचा कोच, PCB ने दिले अपडेट

Latest Marathi News Live Update : कल्याणमध्ये होणार नरेंद्र मोदींची जाहीर सभा

संतापजनक! वन-वे रोडवर रिक्षा चालकाने अचानक यू-टर्न घेतला अन् तरुणाचा जीव गेला; पाहा धक्कादायक व्हिडिओ

SCROLL FOR NEXT