10 th exam 10 th exam
पुणे

12th Exam Cancelled : "बरं झालं, पण पुढच्या परिणामांचं काय?"

‘कोविड बॅच’च्या शिक्याची भीती

सम्राट कदम - सकाळ वृत्तसेवा

पुणे : दहावीपर्यंत मराठीतून शिकलो. अकरावीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यामुळे इंग्रजीतून शिक्षण आले. समजायला थोडा उशीर झाल्यामुळे तेव्हा कमी टक्के पडले. यंदा बारावीच्या दृष्टीने चांगला अभ्यास केला होता. पण आता परिक्षाच रद्द झाली आहे. कोरोनाच्या दृष्टीने या निर्णयाचं स्वागत होत असलं तरी यामुळे आमच्या शैक्षणिक कारकिर्दीवर मोठा परिणाम होणार आहे, निखिल पवार या विद्यार्थ्याच्या या मताप्रमाणं अनेक विद्यार्थ्यांनी अशाच संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेतली जाणारी बारावीची परिक्षा रद्द करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर सकाळने परीक्षार्थी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. (12 th exam canceled it is ok but what about the impact students remark)

एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे विद्यार्थी म्हणत होते. त्याचवेळी यामुळे आम्हाला आयुष्यभर 'कोवीड बॅच' म्हणून सामोरे जावे लागले. आमच्या प्रत्येकाच्याच परिश्रमाचे योग्य मूल्यमापन होईलच असे नाही, असेही विद्यार्थी म्हणत होते. अथर्व पाटील म्हणतो,‘‘दीड वर्षापासून अभ्यास करत होतो. पण एक प्रकारे हा निर्णय योग्य आहे. आम्हाला योग्य तो गृहपाठ देऊन गुणांचे मूल्यमापन व्हायला हवं. टक्केवारीच्या दृष्टीने आम्हाला फटका बसणार आहे.’’

सौरभ पिसे हा विद्यार्थी म्हणाला, परिक्षा व्हायला पाहिजे होती. आमचे मूल्यमापन नक्की कसा होणार?, पुढचा प्रवेश कोठे घ्यायचा?, कसा घ्यायचा? याबद्दल अजूनही संभ्रम आहे. कोरोना कमी झाल्यानंतर जुलैमध्येही परिक्षा घेणे शक्य असते. तर बारावी असल्यामुळे खूप अभ्यास केला होता. निश्चितच तो परिक्षा रद्द झाली म्हणून वाया जाणार नाही. पुढले प्रवेश परिक्षांसाठी त्याचा उपयोग होईल. पण ज्या मुलांना अशा प्रवेश परिक्षा नाही त्यांना मात्र समस्या जाणवू शकते, असं निशिगंधा दिवान या विद्यार्थिनीनं सांगितलं. अपेक्षा झनझने ही विद्यार्थिनी म्हणाली, अभ्यास झाला होता. तरी परिक्षा रद्द झाली हे एक प्रकारे बरंच झाले. आमच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य निर्णय आहे. आता मी पुढल्या प्रवेश परिक्षांचा अभ्यास करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar NDA Latest Update : बिहारमध्ये निवडणुकीआधीच ‘NDA’त खेला! नितीश कुमारांनी चिराग पासवान यांच्या जागांवर दिले उमेदवार

Mohammad Shami: 'मी जर रणजी खेळू शकतो, तर वनडे का नाही?' ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीचा थेट प्रश्न

Bomb Threat: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी; तमिळनाडू कनेक्शन?

Maharashtra Politics : विजय वडेट्टीवारांचा आरोप; सत्ताधारी महायुती निवडणुका पुढे ढकलण्याच्या प्रयत्नात; अजित पवारांच्या पक्षाची धर्मनिरपेक्षता खोटी

क्रिकेटला वेस्ट इंडिजची नव्हे, जगाला त्यांची गरज...; गौतम गंभीर स्ट्रेट टू हार्ट, पाहुण्यांच्या ड्रेसिंग रूममधील Video

SCROLL FOR NEXT